Railway News : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; वाराणसीसाठी ‘अमृत भारत’ एक्सप्रेसला मंजूरी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पुणे (Pune) आणि परिसरातून मोठ्या संख्येने भाविक काशी,वाराणसी आणि प्रयागराजला जात असतात. प्रवाशांची ही गरज ओळखून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हडपसर ते बनारस दरम्यान नवीन रेल्वे सुरू करण्याची मागणी केली होती. रेल्वे मंत्रालयाने याला सकारात्मक प्रतिसाद देत ‘अमृत भारत’ या रेल्वेला मंजुरी दिली आहे. ही गाडी हडपसर टर्मिनलवरून सुटणार असून, यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी होण्यास मदत होईल.तसेच प्रवाशांना थेट वाराणसीपर्यंत जलद सेवा मिळेल.
या गाड्यांमुळे फक्त पर्यटनच नाही तर व्यापार आणि रोजगाराच्या संधींनाही चालना मिळणार आहे. लवकरच या दोन्ही गाड्यांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर होऊन त्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. त्यामुळे आगामी सुट्ट्यांच्या काळात पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
पुणे आणि जबलपूर दरम्यान धावणारी विशेष गाडी (०२१३१/०२१३२) आता कायमस्वरूपी नियमित करण्यात आली आहे. यापुढे ही गाडी गाडी संख्या २०१६१/२०१६२ ‘पुणे-जबलपूर एक्सप्रेस’ म्हणून ओळखली जाईल. ही गाडी नियमित झाल्यामुळे प्रवाशांना आता वर्षभर आगाऊ आरक्षण करणे सोपे होणार असून, विशेष गाड्यांचे जास्त तिकीट दरही कमी होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
केंद्रीय राज्यमंत्री, मुरलीधर मोहोळ यांनी पुणे आणि उत्तर भारताला जोडणाऱ्या रेल्वे गाड्यांची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना काशी-प्रयागराजच्या तीर्थयात्रेसाठी थेट आणि आरामदायी रेल्वे हवी होती.अमृत भारत एक्सप्रेसच्या मंजुरीमुळे आणि पुणे-जबलपूर गाडी नियमित झाल्यामुळे लाखो प्रवाशांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
हे देखील वाचा : Crime News : तळेगावात गुन्हेगारीचा सुळसुळाट; कोयत्याच्या धाकाने लूट, तरुणाचे अपहरण






