PMC Pune: पुणे महापालिकेत 'शस्त्र संस्कृती'ला लगाम; नवल किशोर राम यांचा ऐतिहासिक निर्णय
PMC Pune : पुणे महानगरपालिकेत शस्त्रांसह वावरणाऱ्या लोकप्रतिनिधींविरोधात प्रशासनाने आता अत्यंत कठोर पवित्रा घेतला आहे. महापालिका आयुक्तांनी स्पष्ट आदेश दिले आहेत की, परवानाधारक पिस्तूल असले तरीही ते पालिकेच्या आवारात आणता येणार नाही. महापालिकेत पिस्तूल घेऊन येणाऱ्या नगरसेवकांवर आता थेट अपात्रतेची कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे. आयुक्तांच्या या निर्णयामुळे पालिकेत शस्त्र मिरवणाऱ्या लोकप्रतिनिधींचे धाबे दणाणले आहेत.
चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महापालिका निवडणुका झाल्याने सध्या पालिकेत नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते.अनेक नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते स्वतःकडे असलेले परवानाधारक पिस्तूल पालिकेच्या आवारात उघडपणे सोबत घेऊन येत असल्याचे निदर्शनास आले आहे. अलीकडेच एका नगरसेवकाने चक्क मुख्य सभेला (General Body Meeting) जाताना पिस्तूल सोबत नेण्याचा प्रयत्न केला होता, या प्रकारामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महानगरपालिकेच्या नियमावलीनुसार, सभागृहाच्या किंवा पालिकेच्या कामकाजात अडथळा ठरेल किंवा सुरक्षेला धोका निर्माण होईल असे कृत्य केल्यास नगरसेवकावर कठोर कारवाईची तरतूद आहे. आता थेट सदस्यत्व रद्द (अपात्रता) करण्याची तंबीच आयुक्तांनी दिल्याने पालिकेतील ‘शस्त्र संस्कृती’ला लगाम बसण्याची शक्यता आहे. “महापालिका हे लोकशाहीचे मंदिर आहे, तिथे शस्त्रांना स्थान नाही. यापुढे पिस्तूल घेऊन येणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”
— नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महानगरपालिका
मेटल डिटेक्टरची एन्ट्री: म
नवे नगरसेवक रडारवर: महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधून निवडून आलेल्या अनेक नगरसेवकांकडे परवानाधारक शस्त्रे आहेत. हे नगरसेवक कमरेला पिस्तूल लावून पालिकेत फिरत असल्याचे प्रकार वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
सुरक्षेचा प्रश्न: नगरसेवक संरक्षणासाठी पिस्तूल बाळगत असले, तरी सर्वसामान्य नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचा मुद्दा प्रशासनाने उपस्थित केला आहे.
“येत्या काळात जर कोणताही नगरसेवक पिस्तूल घेऊन महापालिकेत आला, तर त्याच्यावर थेट अपात्रतेची कारवाई केली जाईल. परवाना असला तरीही पालिकेत शस्त्र आणण्यास सक्त मनाई आहे.”
— नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महानगरपालिका






