एक महिन्यापूर्वी यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेमध्ये सोलापूरच्या मनोज पाटील यांनी परीक्षा उत्तीर्ण करत 493 रँक मिळवली तर बाबासाहेब गायकवाड यांनी 561 रँक मिळवली. विशेष म्हणजे हे दोन्ही मित्र एकाच रूममध्ये राहत होते. दिल्लीमध्ये एकाच रूममध्ये राहणे सोबत अभ्यास आणि अपयशाचा देखील सोबतच या दोन मित्रांनी सामना केला. मागच्या वर्षीच्या यूपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेमध्ये दोघांनाही अपयश आले. या भयंकर मानसिक स्थिती मधून दोघांनीही एकमेकांना मानसिक आधार देत वाट काढली. आणि 2025 मध्ये झालेल्या यूपीएससीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवले. विशेष म्हणजे वयाच्या 35 वर्षी शेवटची परीक्षा देत असताना या दोन्ही मित्रांपुढे आपल्या संघर्षाची मालिका उभी होती. परंतु जर तर चा विचार न करता दोघांनीही कसून तयारी केली आणि मार्चमध्ये आलेल्या UPSC नागरी सेवा परीक्षेमध्ये यश मिळवून मैत्रीचा नवा अध्याय लिहिला.