
Leopard Attack: पुण्यातील 233 गावांना बिबट्याचा धोका; मानव-बिबट संघर्ष रोखण्याचा...
मानव-बिबट संघर्ष टाळण्याचा कृती आराखडा कागदावरच
चार तालुक्यांतील २३३ गावांत बिबट्याचा धोका
विभागनिहाय उपाययोजना करण्याची गरज
शेरखान शेख/शिक्रापूर: बिबट्यांच्या हल्ल्याने हादरलेला असताना शिरूर, आंबेगाव, जुन्नर व खेड तालुक्यांतील गावकऱ्यांना प्रशासनाच्या कागदी उपाययोजनांचा काहीही उपयोग झाला नसून मानव बिबट संघर्ष रोखण्यासाठी तयार करण्यात आलेला जिल्हास्तरीय सर्व विभागनिहाय कृती आराखडा लाल फितीत धूळ खात पडला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मानव बिबट संघर्ष लक्षात घेऊन जुलै २०२४ मध्ये तत्कालीन उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सर्व विभागांचा समन्वय साधून मानव बिबट संघर्ष टाळण्यासाठी सविस्तर कृती आराखडा तयार केला होता. त्यावर तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी २४ जुलै २०२४ रोजी शिक्कामोर्तब करत बिबट आपत्ती प्रवण क्षेत्रातील २३३ गावांमध्ये कृती आराखड्यातील उपाययोजनांच्या अंमलबजावणीचे आदेश
देत प्रत्येक विभागाला जबाबदारी ठरवून दिली. मात्र सोळा महिने उलटले तरी याकृती आराखड्याची अंमलबजावणी होताना दिसत नसून काही कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना या आराखड्याची कल्पनाच नसल्याचे दिसत आहे.
Pune Leopard Attack: तीन जणांचा जीव घेणारा नरभक्षक बिबट्या ठार; शार्प शूटर पथकाने थेट…
पुणे जिल्ह्यात दररोज बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटना घडत असताना प्रशासन मात्र फक्त कागदी घोडे नाचवत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. बिबट्या हा गावकऱ्यांच्या भीतीचा विषय होता मात्र आता तो थेट जीवनमरणाचा प्रश्न होऊन देखील बहुतांश उपाययोजना केवळ कागदांवरच व जबाबदाऱ्या हवेतच विरल्या आहेत. तर शासनाच्या विभागांकडून उपाययोजनांची अंमलबजावणी होत नसून प्र भावी अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सार्वजनिक चांधकाम विभाग: रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले मोठे गवत, धाणेरी आणि तत्सम झाडे झुडपे साफसफाई करणे, त्यामुळे मनुष्य व वन्य प्राणी यांच्यासाठी दृश्यमानता वाढून वन्य प्राण्यांना रस्ता सहज दिसेल, तसेच आवश्यक ठिकाणी गतिरोधक व माहिती फलक बसवणे. यामुळे मनुष्यावरील बिबट हल्ल्याच्या घटना, वन्यप्राणी व दुचाकी अपघात कमी होण्यास मदत होईल.
पोलिस प्रशासन
ग्रामपंचायतमार्फत नोंद झालेल्या इतर राज्यातील व जिल्ह्यातील मजूर, मेढपाळ, नव्याने रहिवासी व्यक्तीबाबत वनविभागास अवगत करणे व त्यांच्या नोंदी ठेवणे या नोंदीमुळे नव्याने बिबट प्रवण क्षेत्रात कामाला आलेल्या लोकामध्ये जनजागृती करता येईल. तसेच गर्दीच्या ठिकाणी बिबट रेस्क्यू करत असताना गर्दीला नियंत्रित करणे व मनुष्यावर हल्ला झाल्यास व त्याचा त्यात मृत्यू झाल्यास वन कर्मचा-यांना तत्काल संरक्षण देऊन मृत व्यक्तींचा पंचनामा, शवविच्छेदन, इन्कवेस्ट रिपोर्ट करण्यासाठी सहकार्य करणे.
Pune Leopard Attack: दैव बलवत्तर! दबा धरून बसलेल्या बिबट्याने थेट…; पारगावमध्ये महिलेसोबत घडले काय?
विद्युत वितरण विभाग
विद्युत वितरण विभागामार्फत बिबट प्रवण क्षेत्रात शेतीसाठी दिवसा विद्युत पुरवठा करणे, जेणे करून शेतकऱ्यांचे रात्री शेतात जाणे टळून मानव बिबट संघर्ष कमी होण्यास मदत होईल.
आरोग्य विभाग
आरोग्य विभागाने सर्वे औषध उपचारांची व इतर सोयीची व्यवस्था स्थानिक पातळीवर तयार ठेवणे, त्यामुळे हल्ला झालेल्या व्यक्तीवर तत्काळ उपचार करणे शक्य होईल, तसेच रेबीज व सिरम उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी ठेवणे आणि बिबट प्रवण क्षेत्रातील गावांतील डॉक्टरांना वन्यप्राणी हल्ला झाल्यावर करण्यात येणाऱ्या उपचाराचे प्रशिक्षण देणे.
पशुसंवर्धन विभाग
पशुधन हानी प्रकरणांमध्ये वेळेत योग्य शवविच्छेदन अहवाल सादर करणे, जेणेकरून नुकसान भरपाई प्रकरणे मुदतीत पारित करणे शक्य होईल.