Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माळीण दुर्घटनेनंतरही प्रशासन सुस्त? ७२ पैकी २८ गावांचे पुनर्वसन प्रस्ताव प्रलंबित; मावळ दुर्घटनेनंतर प्रश्न ऐरणीवर

Maval Landslide: मावळ तालुक्यातील विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाटण गावात झालेल्या भूस्खलनात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले की, पाटण गावाचा यापूर्वी भूस्खलनप्रवण गावांच्या यादीत समावेश नव्हता.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 11, 2026 | 03:13 PM
Pune News, Maval Landslide, Patan Village, Disaster Management Pune

Pune News, Maval Landslide, Patan Village, Disaster Management Pune

Follow Us
Follow Us:
  • पुणे जिल्ह्यातील भूस्खलनप्रवण गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
  • ४४ गावापैकीही केवळ २२ गावांत प्रत्यक्ष पुनर्वसन व संरक्षणाची कामे सुरू
  • पाटण गावात झालेल्या भूस्खलनात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
 

Pune News: माळीण दुर्घटनेनंतर पुणे जिल्ह्यातील भूस्खलनप्रवण गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मावळ तालुक्यातील पाटण येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या पुनर्वसन प्रक्रियेतील विलंब समोर आला आहे. जिल्हा प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाकडे पाठविलेल्या ७२ गावांच्या प्रस्तावांपैकी केवळ ४४ गावांच्या प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, उर्वरित २८ गावांचे प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत.

म्हणजे मंजूर झालेल्या ४४ गावापैकीही केवळ २२ गावांत प्रत्यक्ष पुनर्वसन व संरक्षणाची कामे सुरू झाली आहेत. केंद्र व राज्य शासनाने १५व्या वित्त आयोगांतर्गत आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. त्याअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील ७२ भूस्खलनप्रवण गावांसाठी सुमारे ४१२ कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाचे १६० प्रस्ताव तयार केले. त्यापैकी ६५ प्रस्ताव अंतिम प्रशासकीय मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आले होते. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) आणि भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील ७२ गावे भूस्खलनाच्या उच्च जोखमीच्या क्षेत्रात आहेत. यामध्ये मावळमधील १५. राजगडमधील १०, मुळशीतील ८, खेडमधील ६, जुन्नरमधील ५, भोरमधील ५ तसेच इतर तालुक्यांतील गावांचा समावेश आहे.

‘आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी’; पक्षांतराच्या अफवांवर सुप्रिया सुळे संतापल्या

 

पाटण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

दरम्यान, मावळ तालुक्यातील विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाटण गावात झालेल्या भूस्खलनात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले की, पाटण गावाचा यापूर्वी भूस्खलनप्रवण गावांच्या यादीत समावेश नव्हता. मात्र, यंदाचा पावसाळा संपल्यानंतर जीएसआयमार्फत नव्याने संवेदनशील ठिकाणांचे व्यापक सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्व तहसीलदारांना अतिधोकादायक भागातील कुटुंबांची ओळख पटवून आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्या तात्पुरत्या स्थलांतराची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पालखी मार्गाची अवघ्या दोन तासांत स्वच्छता; प्रभावी मोहिम

जगदुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने पालखी मार्गावर विशेष स्वच्छता मोहीम राबवून अवघ्या दोन तासांत संपूर्ण मार्ग आणि परिसर स्वच्छ केला, पालखीचे आगमन होण्यापूर्वी तसेच प्रस्थानानंतर युद्धपातळीवर स्वच्छता करण्यात आल्याने शहरातील स्वच्छता व्यवस्था तातडीने पूर्ववत करण्यात आली.

प्रलंबित प्रस्तावांचे होणार फेरसर्वेक्षण

अधिका-यांध्या माहितीनुसार, प्रलंबित २८ गावांचे प्रस्ताव पुन्हा तपासले जात आहेत, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संबंधित गावांमध्ये सध्या मानवी वरती आहे का. तसेच जीवित व वित्तहानीचा किती धोका आहे, याचे फेरसर्वेक्षण सुरू आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर है प्रस्ताव पुन्हा शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत, दरम्यान, मंजूर गावांमध्ये जमीन संपादन, पुनर्वसनासाठी जागा निश्चित करणे आणि पुनर्वसन पॅकेज निश्चित करण्याची प्रक्रिया विविध टप्प्यांत सुरू आहे.

 

Web Title: Pune district 72 landslide villages list maval mulshi rajgad khed junnar bhor gsi survey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • Landslide
  • maval news
  • Patan News
  • pune news

संबंधित बातम्या

मोठी बातमी! कोकण अन् पश्चिम महाराष्ट्राचा संपर्क तुटला? ताम्हिणी घाट बंद अन् ‘लालपरी’ची सेवा ठप्प
1

मोठी बातमी! कोकण अन् पश्चिम महाराष्ट्राचा संपर्क तुटला? ताम्हिणी घाट बंद अन् ‘लालपरी’ची सेवा ठप्प

संकटाच्या काळात ‘AFMS’ चे वैद्यकीय कवच; ‘एअरबॉर्न हॉस्पिटल’ची तत्पर सेवा
2

संकटाच्या काळात ‘AFMS’ चे वैद्यकीय कवच; ‘एअरबॉर्न हॉस्पिटल’ची तत्पर सेवा

लाखो पाऊले पुण्यात विसावली! शनिवारवाडा ते लक्ष्मी रोड; अवघी पुण्यनगरी झाली ‘वारकरीमय’
3

लाखो पाऊले पुण्यात विसावली! शनिवारवाडा ते लक्ष्मी रोड; अवघी पुण्यनगरी झाली ‘वारकरीमय’

राष्ट्रहित सर्वोपरी! AFMC चा दिमाखदार सोहळा; १४१ वैद्यकीय अधिकारी सशस्त्र दलात दाखल
4

राष्ट्रहित सर्वोपरी! AFMC चा दिमाखदार सोहळा; १४१ वैद्यकीय अधिकारी सशस्त्र दलात दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.