Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे मेट्रो लाईन-2 च्या रामवाडी-वाघोली विस्ताराला गती; आता 4.7 किमीचा सहापदरी एलिव्हेटेड रस्ता उभारणार

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा मेट्रो)ने या बहुउद्देशीय प्रकल्पासाठी डिझाइन व बांधकामाची निविदा प्रसिद्ध केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 25, 2026 | 01:04 PM
पुणे मेट्रो लाईन-2 च्या रामवाडी-वाघोली विस्ताराला गती

पुणे मेट्रो लाईन-2 च्या रामवाडी-वाघोली विस्ताराला गती

Follow Us
Follow Us:

पुणे / दीपक मुनोत : पूर्व पुण्याच्या दळणवळणाच्या कोंडीवर उतारा ठरणाऱ्या पुणे मेट्रो लाईन २ च्या रामवाडी–वाघोली (विठ्ठलवाडी) विस्तार प्रकल्पाला गती मिळाली आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा मेट्रो)ने या बहुउद्देशीय प्रकल्पासाठी डिझाइन व बांधकामाची निविदा प्रसिद्ध केली आहे. या अंतर्गत ४.८ किलोमीटर लांबीचा उन्नत मेट्रो व्हायाडक्ट आणि त्याच संरचनेवर पहिल्या स्तरावर ४.७ किलोमीटरचा सहापदरी एलिव्हेटेड रस्ता उभारण्यात येणार आहे.

या निविदेत चार उन्नत मेट्रो स्थानकांच्या संरचनात्मक कामांचा समावेश असून विमाननगर, सोमनाथनगर, खराडी बायपास आणि तुळजाभवानी ही स्थानके प्रस्तावित आहेत. विमाननगर–खराडी–वाघोली पट्ट्यातील वाढती लोकवस्ती, आयटी पार्क्स, व्यावसायिक संकुले आणि निवासी भागांना या स्थानकांमुळे थेट मेट्रो जोडणी मिळणार आहे. परिणामी, दैनंदिन प्रवासाचा वेळ कमी होऊन प्रवाशांचा त्रास घटणार आहे.

महा मेट्रोच्या माहितीनुसार, ‘लेटर ऑफ अवॉर्ड’ जारी झाल्यापासून ४२ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. निविदा ५ मार्च २०२६ रोजी उघडल्या जाणार असून त्यानंतर कंत्राटदाराची निवड प्रक्रिया पूर्ण होईल.

मेट्रो आणि सहापदरी रस्ता एकाच उन्नत संरचनेत उभारण्याचा निर्णय हा या प्रकल्पाचा विशेष ठरणार आहे. यामुळे जागेचा कार्यक्षम वापर होणार असून भूसंपादनाची गरज कमी राहील. नगर रोडवरील वाहतूक भार कमी होण्यास सहापदरी एलिव्हेटेड रस्ता मदत करेल, तर मेट्रोमुळे सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य मिळेल.

पूर्व पुण्याचा वेगाने होत असलेला विस्तार लक्षात घेता, हा प्रकल्प दीर्घकालीन दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. विमाननगर, खराडी आणि वाघोली परिसरातील नागरिक, नोकरदार व विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. मेट्रो नेटवर्क विस्तारासोबतच रस्ते पायाभूत सुविधा बळकट झाल्याने पुणे शहराच्या सर्वांगीण शहरी विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

हेदेखील वाचा : पुणे महामेट्रोकडून प्रवाशांसाठी ऑनलाईन ‘लॉस्ट अँड फाउंड’ सुविधा सुरू; मेट्रो स्टेशनवर विसरलेली वस्तू ऑनलाईन पाहता येणार

पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेलाही या प्रकल्पातून हातभार लागणार आहे. मेट्रोमुळे खासगी वाहनांचा वापर कमी होऊन इंधन बचत, प्रदूषणात घट आणि कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण मिळण्यास मदत होईल. बांधकामात आधुनिक तंत्रज्ञान, प्रीकास्ट घटक आणि सुरक्षिततेचे कडक निकष राबवले जाणार आहेत.

स्थानकांवर लिफ्ट, एस्केलेटर, दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा, स्मार्ट तिकीट प्रणाली आणि एकात्मिक फीडर सेवा प्रस्तावित असून, एलिव्हेटेड रस्त्यामुळे आपत्कालीन सेवांसाठी वेगवान मार्ग उपलब्ध होणार आहे. एकूणच, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पूर्व पुण्यातील प्रवास अधिक सुकर, सुरक्षित आणि वेळेत होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Web Title: Pune metro line 2 ramwadi wagholi extension gains momentum

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • Metro Rail
  • pune news

संबंधित बातम्या

MPSC Protest : आंदोलनात संजय राऊतांची एन्ट्री; ‘जंतर-मंतर जिल्ह्या-जिल्ह्यात उभं राहिलं तर मंत्रालयाबाहेर पडता येणार नाही’
1

MPSC Protest : आंदोलनात संजय राऊतांची एन्ट्री; ‘जंतर-मंतर जिल्ह्या-जिल्ह्यात उभं राहिलं तर मंत्रालयाबाहेर पडता येणार नाही’

जेजुरीत भाजप युवा मोर्चाचे शक्तिप्रदर्शन; ‘युवाशक्तीला संघटनेत व्यासपीठ द्या’, गोपीचंद पडळकरांचे आवाहन
2

जेजुरीत भाजप युवा मोर्चाचे शक्तिप्रदर्शन; ‘युवाशक्तीला संघटनेत व्यासपीठ द्या’, गोपीचंद पडळकरांचे आवाहन

हवेली-७ कार्यालयाच्या तपासणीत २१ दस्तांवर आक्षेप; संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची रोहन सुरवसे पाटलांची मागणी
3

हवेली-७ कार्यालयाच्या तपासणीत २१ दस्तांवर आक्षेप; संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची रोहन सुरवसे पाटलांची मागणी

कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल
4

कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.