Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hinjawadi Shivaji Nagar Metro Line 3: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो १५ जुलैला धावणार!

पुणे शहरात महामेट्रो आणि पीएमआरडीए अशा दोन यंत्रणांकडून काम सुरू असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. ही अडचण दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुण्यासाठी 'एकात्मिक तिकीट व्यवस्था' तातडीने लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

  • By अनुराधा धावडे
Updated On: Jun 05, 2026 | 05:55 PM
Pune Metro, Hinjawadi Metro, Metro Line 3, Devendra Fadnavis,

Pune Metro, Hinjawadi Metro, Metro Line 3, Devendra Fadnavis,

Follow Us
Follow Us:

Hinjawadi Shivaji Nagar Metro Line 3: पुणेकर आणि विशेषतः हिंजवडी आयटी पार्कमधील लाखो नोकरदार ज्या बहुप्रतीक्षित मेट्रो मार्गिकेची गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत, त्या हिंजवडी ते शिवाजीनगर (मेट्रो लाईन ३) प्रकल्पाच्या उद्घाटनाचा पेच अखेर सुटला आहे. वारंवार बदलणाऱ्या तारखा आणि प्रशासकीय तांत्रिक अडथळ्यांमुळे रखडलेला हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या उच्चस्तरीय ‘वॉर रूम’ बैठकीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला सर्वोच्च प्राधान्य देत, येत्या १५ जुलैपर्यंत पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवा कार्यान्वित करण्याचे अत्यंत स्पष्ट आणि कडक निर्देश प्रशासनाला दिले आहेत. प्रशासनाने यापूर्वी दिलेली ३० जूनची डेडलाईन तांत्रिक आणि आचारसंहितेच्या कचाट्यात सापडल्याने हुकली होती, मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या प्रत्यक्ष हस्तक्षेपाने मेट्रोच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होण्याचे संकेत मिळाले आहेत.

Vasant More on Vidhan Parishad: महाविकास आघाडीतून बाहेर पडा, मी वरिष्ठांना सांगितलंय: वसंत मोरेंचा संताप

३० जूनची डेडलाईन हुकली, आता १५ जुलैवर नजर

सुरवातीला मेट्रो सेवा ३० जूनपर्यंत सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते. मात्र, सुरक्षा तपासणी, तांत्रिक परवानग्या आणि विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडथळा यामुळे ही तारीख पाळणे अशक्य झाले. या पार्श्वभूमीवर, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे वस्तुस्थिती मांडली. आता सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून १५ जुलैपर्यंत पहिल्या टप्प्यातील १२ स्थानकांवरून मेट्रो धावेल, अशी खात्री प्रशासनाने दिली आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांची ‘वॉर रूम’मध्ये कडक भूमिका

सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकल्पांच्या विलंबामुळे व्यक्त होणारी नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली. “पायाभूत प्रकल्पांसाठी ३ ते साडेतीन वर्षांची मुदत पुरेशी आहे. कंत्राटदारांच्या दिरंगाईमुळे होणारे आर्थिक नुकसान सहन केले जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच, कामे रेंगाळणाऱ्या कंत्राटदारांना यापुढे नवीन कामे दिली जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

CJP प्रमुख अभिजीत दीपकेंचा नवा व्हिडिओ; ‘विमानतळाऐवजी थेट पोलीस ठाण्यात’ येण्याचे आवाहन

प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये:

एकूण मार्गिका: २३.२ किलोमीटर (संपूर्ण उन्नत मार्ग).
भागीदारी: देशातील पहिला सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावरील मेट्रो प्रकल्प (टाटा-टीआरआयआयएल आणि सीमेन्स).
एकूण खर्च: ८ हजार ३१३ कोटी रुपये.
टप्पे: पहिल्या टप्प्यात १२ स्थानके, त्यानंतर पुढील दोन महिन्यांत उर्वरित ११ स्थानके कार्यान्वित होणार.

पुणेकरांना मिळणार ‘एकात्मिक तिकीट’

पुणे शहरात महामेट्रो आणि पीएमआरडीए अशा दोन यंत्रणांकडून काम सुरू असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. ही अडचण दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुण्यासाठी ‘एकात्मिक तिकीट व्यवस्था’ तातडीने लागू करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे दोन्ही मेट्रो नेटवर्कसाठी प्रवाशांना एकाच तिकिटावर प्रवास करणे शक्य होणार आहे.

इतर महत्त्वाच्या प्रकल्पांनाही ‘बूस्टर’

हिंजवडी मेट्रोसोबतच पुण्यातील इतर प्रमुख प्रकल्पांनाही गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत:
पुणे रिंग रोड: भूसंपादनाची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यावर भर.
मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन: प्रकल्पासाठी आवश्यक जमीन तातडीने हस्तांतरित करण्याचे आदेश.
पिंपरी-चिंचवड ते निगडी मेट्रो: या मार्गाचे काम विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजन.

 

 

 

Web Title: Pune metro line 3 big update hinjawadi shivajinagar metro set to roll out by july 15

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • PMRDA
  • Pune Metro
  • pune news

संबंधित बातम्या

मनोज जरांगे पाटलांची मोठी मागणी राज्य सरकारकडून मान्य, आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर
1

मनोज जरांगे पाटलांची मोठी मागणी राज्य सरकारकडून मान्य, आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर

Shivajinagar ST Stand: ६ वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पासाठी शिवाजीनगर एसटी प्रशासनाचा नवा प्लॅन; आरे’च्या जागेची मागणी
2

Shivajinagar ST Stand: ६ वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पासाठी शिवाजीनगर एसटी प्रशासनाचा नवा प्लॅन; आरे’च्या जागेची मागणी

नागपूर कृषी उत्पन्न बाजाराला राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा दर्जा, पणन मंत्री जयकुमार रावल यांनी स्वीकारला पदभार
3

नागपूर कृषी उत्पन्न बाजाराला राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा दर्जा, पणन मंत्री जयकुमार रावल यांनी स्वीकारला पदभार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला वॉर रूम बैठकीत पायाभूत सुविधा, विविध प्रकल्पांचा आढावा
4

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला वॉर रूम बैठकीत पायाभूत सुविधा, विविध प्रकल्पांचा आढावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.