Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivajinagar ST Stand: ६ वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पासाठी शिवाजीनगर एसटी प्रशासनाचा नवा प्लॅन; आरे’च्या जागेची मागणी

वाकडेवाडी आगार हे राज्यातील सर्वाधिक वर्दळीच्या एसटी आगारांपैकी एक मानले जाते. येथून दररोज २०० हून अधिक बस विविध मार्गांवर धावतात. तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या मिळून सुमारे १,२०० बस फेऱ्यांचे संचालन या आगारातून केले जाते.

  • By अनुराधा धावडे
Updated On: Jun 05, 2026 | 01:11 PM
Pune News, MSRTC, Shivajinagar ST Stand, Wakdewadi,

Pune News, MSRTC, Shivajinagar ST Stand, Wakdewadi,

Follow Us
Follow Us:
  • आरे डेअरीची जागा आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) हस्तांतरित करण्याची मागणी
  • सध्या शिवाजीनगर एसटी आगार वाकडेवाडी येथील भाडेतत्त्वावरील जागेतून कार्यरत
  • शिवाजीनगर येथील मूळ एसटी स्थानकाची जागा पूर्वी मेट्रो प्रकल्पासाठी देण्यात आली होती
Shivajinagar ST stand Redevelopment: शिवाजीनगर एसटी स्थानकाचा रखडेलेल्या पुनर्विकास प्रकल्पाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. वाकडेवाडी येथील आरे डेअरीची जागा आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (ST) हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात आली आहे. आरे डेअरची ही जागा एसटी महामंडळासाठी उपलब्ध झाल्यास पुण्यासह राज्यातील सर्वात आधुनिक आणि सुसज्ज एसटी स्थानक उभारणे शक्य होईल, असा दावा एसटी प्रशासनाकडून करण्यत आला आहे.

सध्या शिवाजीनगर एसटी आगार वाकडेवाडी येथील भाडेतत्त्वावरील जागेतून कार्यरत आहे. दरम्यान, मूळ शिवाजीनगर येथील जागेवर नवीन बस स्थानक उभारण्याचा प्रकल्प गेल्या सहा वर्षांहून अधिक काळापासून प्रलंबित आहे. त्यामुळे पर्यायी उपाय म्हणून वाकडेवाडी परिसरातील आरे डेअरीची संपूर्ण जागा एसटी महामंडळाकडे हस्तांतरित करण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.

इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला; जुन्नर तालुक्यातील शेतकरी, व्यापाऱ्यांना आर्थिक भुर्दंड

मेट्रो प्रकल्पामुळे बदलले चित्र

शिवाजीनगर येथील मूळ एसटी स्थानकाची जागा पूर्वी मेट्रो प्रकल्पासाठी देण्यात आली होती. त्या जागेत मेट्रो स्थानकासह अत्याधुनिक एसटी टर्मिनल उभारण्याचे नियोजनही करण्यात आले होते. मात्र विविध प्रशासकीय आणि तांत्रिक कारणांमुळे हा प्रकल्प रखडला गेला. परिणामी, एसटी स्थानकाचा प्रश्न अद्याप कायम आहे.

प्रवाशांची वाढती गर्दी

दरम्यान, शिवाजीनगर एसटीस स्थानकाचे वाकडेवारी येथे स्थलांतर झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागला. पण आता मात्र हे स्थाकात पूर्ण क्षमतेने कार्यरत झाले असून गेल्या काही महिन्यात प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे भविष्यात अधिक जागेची आवश्यकता भासणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पण सध्या जुन्या शिवाजीनगर स्थानकाच्या जागेत एसटी महामंडळाकडे मर्यादित जागा उपलब्ध आहे. त्यामुळे बस स्थानक, कार्यशाळा, पार्किंग आणि इतर सुविधा उभारण्यासाठी याठिकाणी जागेची कमतरता भासू शकते. याउलट वाकडेवाडीतील एसटी स्थानकाच्या बाजूला असलेली सुमारे दोन हेक्टर आरे डेअरीची जागा एसटी स्थानकासाठी उपलब्ध झाल्यास मोठे बस टर्मिनल, विस्तृत पार्किंग, चालक-वाहकांसाठी निवास व्यवस्था तसेच प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा विकसित करता येतील.

Pune Airport News: पुण्याहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाला उशीर; प्रवासी ९ तास खोळंबले

राज्यातील सर्वाधिक वर्दळीच्या आगारांपैकी एक

वाकडेवाडी आगार हे राज्यातील सर्वाधिक वर्दळीच्या एसटी आगारांपैकी एक मानले जाते. येथून दररोज २०० हून अधिक बस विविध मार्गांवर धावतात. तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या मिळून सुमारे १,२०० बस फेऱ्यांचे संचालन या आगारातून केले जाते.

दररोज जवळपास २० हजार प्रवासी या आगाराचा वापर करतात, तर बस सुमारे ५४ ते ५५ हजार किलोमीटरचा प्रवास करतात. त्यामुळे वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करता अधिक विस्तीर्ण आणि सुसज्ज स्थानकाची गरज अधोरेखित होत आहे.

 

आधुनिक बस स्थानकाची संधी

आरे डेअरीची जागा एसटी महामंडळाला मिळाल्यास पुण्याला अत्याधुनिक बस टर्मिनल मिळू शकते. यामुळे प्रवाशांच्या सुविधा वाढण्याबरोबरच वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम होईल. तसेच राज्यातील सर्वात आधुनिक एसटी स्थानक उभारण्याचा मार्गही मोकळा होऊ शकतो.

Web Title: Shivajinagar st stand redevelopment for msrtc aarey dairy land wakdewadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • msrtc
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Airport News: पुण्याहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाला उशीर; प्रवासी ९ तास खोळंबले
1

Pune Airport News: पुण्याहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाला उशीर; प्रवासी ९ तास खोळंबले

Vidhan Parishad Election 2026: सुनेत्रा पवारांचा शरद पवारांना फोन; नेमकं घडलं काय?
2

Vidhan Parishad Election 2026: सुनेत्रा पवारांचा शरद पवारांना फोन; नेमकं घडलं काय?

दौंड उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची चोरटी वाहतूक उघड
3

दौंड उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची चोरटी वाहतूक उघड

आधी प्रेमविवाह केला अन् नंतर हुंड्यासाठी छळ झाला; अखेर नवविवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या
4

आधी प्रेमविवाह केला अन् नंतर हुंड्यासाठी छळ झाला; अखेर नवविवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.