Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMC News: न्यायालयाचे आदेश अन् बेलीफ पालिकेत! पुणे पालिका आयुक्तांची खुर्ची जाता जाता राहिली

Naval Kishor Ram: कचरा डेपोसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला वेळेत न दिल्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांची खुर्ची आणि कार्यालयातील इतर साहित्य जप्त करण्याचे कडक आदेश न्यायालयाने दिले आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 04, 2026 | 10:00 AM
PMC Commissioner Chair Seizure Court Order,

PMC Commissioner Chair Seizure Court Order,

Follow Us
Follow Us:
  • भूसंपादनामुळे अनेक शेतकरी पूर्णपणे भूमिहीन झाले आहेत.
  • वेळेत मोबदला न मिळाल्यामुळे बाधित शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे.
  • या संपूर्ण हलगर्जीपणाला महापालिका आणि संबंधित शासकीय यंत्रणाच थेट जबाबदार आहेत.
PMC News Update: पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांची खुर्ची आणि इतर साहीत्य जप्त करा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. कचरा डेपोसाठी संपादित केलेल्या जमीनीचा संबंधित शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे आदेश असतानाही त्याची अंमलबजावणी न झाल्याने हा आदेश न्यायालयाने दिला. प्रशासनाने तातडीने हालचाली केल्याने महापालिकेची नामुष्की टळली.

न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात जमिनीच्या मोबदल्यापोटी सुमारे १२ कोटी रुपये ११ ऑगस्टपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात येतील. त्यामुळे जप्तीची कारवाई होणार नाही. – निशा चव्हाण, मुख्य विधी अधिकारी, पुणे मनपा

PMC Employee Transfer Controversy: पुणे पालिकेत मध्यरात्री ४०७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या; प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!

अन् प्रशासन हालले

न्यायालयाने आयुक्तांच्या कार्यालयातील खुर्ची आणि अन्य साहित्य जप्त करण्याच्या दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी बेलिफ पोलिसांसह सोमवारी महापालिका मुख्यालयात पोहोचले. मात्र, आयुक्त कार्यालयाचे कुलूप उघडण्यात आले नाही. त्याच वेळी महापालिकेच्या विधी विभागाने न्यायालयात धाव घेत प्रतिज्ञापत्र सादर केल्याचे फडके यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या परिस्थितीला पालिकाच जबाबदार

भूसंपादनामुळे अनेक शेतकरी भूमिहीन झाले असून, त्यांना वेळेत मोबदला न मिळाल्याने त्याची आर्थिक परिस्थिती गंभीर बनली आहे.
यासाठी महापालिका आणि संबंधित
शासकीय यंत्रणाच जबाबदार असल्याचा आरोप फडके यांनी केला.
पत्रकार परिषदेला लीलाबाई हरपळे, हरिश्चंद्र हरपळे, विनायक हरपळे आणि कांता हरपळे उपस्थित होते.

Baramati News: बारामतीतील नियमबाह्य कत्तलखान्यांची उच्चस्तरीय चौकशी करा; नेरा फाउंडेशनची मागणी

गेल्या २० वर्षांपासून हतबल शेतकरी होता तटकळत

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, महापालिकेने देवाची उरुळी व फुरसुंगी येथील जागा कचरा डेपोसाठी संपादित केली होती. या जमिनीचा मोचदला तब्बल दोन दशकाहून अधिक काळ शेतक-यांना मिळालेला नाही, मोबदल्याची रक्कम न दिल्याने लघुवाद न्यायालयाने (स्मॉल कॉज कोर्ट) महापालिका आयुक्ताच्या कार्यालयातील खुर्चीसह अन्य साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले. या कारवाईची वेळ येताच महापालिका प्रशासनाने तातडीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून ११ ऑगस्टपर्यंत सुमारे १२ कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याचे आश्वासन दिल्याने जातीची कारवाई टळली.

या प्रकरणाची माहिती शेतकऱ्यांचे वकील अशोक फडके यांनी पत्रकार परिषदेत दिली, ते म्हणाले, २००२ मध्ये देवाची उरुळी आणि फुरसुंगी परिसरातील शेकडो एकर जमीन वीज मंडळ, रेल्वे, रस्ते प्रकल्प आणि महापालिकेच्या कचरा डेपोसाठी संपादित करण्यात आली. त्यानंतर २००५ मध्ये महापालिकेने संपादित केलेल्या सुमारे १०० एकर जमिनीचा पुरस्कार (अवॉर्ड) जाहीर झाला. मात्र, काही शेतकऱ्यांना आजतागायत मोबदला मिळालेला नाही.

न्यायालयाच्या आदेशाकडे अक्षम्य दुर्लक्ष

ते म्हणाले, महापालिकेने सुरुवातीला अवघ्या ७० ते साडेतीन हजार रुपये प्रति गुंठा दराने भूसंपादन केल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला. त्याविरोधात न्यायालयात दाद मागितल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना त्या वेळच्या बाजारभावानुसार ७० ते ७५ हजार रुपये प्रति गुंठा दराने भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, या आदेशानंतरही महापालिकेने मोबदला दिला नाही. २०१८ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत शेतकऱ्यांनी पुन्हा स्मॉल कॉज कोर्टात धाव घेतली. त्या वेळीही न्यायालयाने शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आदेश दिले. मात्र, महापालिकेने अपीलमध्ये जाण्याचे कारण पुढे करून आदेशाची अंमलबजावणी टाळल्याचा आरोप करण्यात आला.

 

 

Web Title: Pune news court orders seizure of pune municipal commissioner chair over land compensation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • Marathi News
  • Naval Kishore Ram
  • pune news update
  • Pune Politics

संबंधित बातम्या

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा
1

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा
2

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड
3

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय
4

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.