
आला रे आला! सावजाच्या मागे आला बिबट्या अन्...; अंगणात बसलेला चिमुकला बचावला, पहा थरारक Video
पुण्यातील जुन्नर, शिरूर तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढला
पिंपरखेडमधील नरभक्षक बिबट्या अखेर ठार
झोपाळ्यावर बसलेला मुलगा थोडक्यात वाचला
Leopard Video: सध्या पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या वावर वाढला आहे. शिक्रापूर, जुन्नर परिसरात बिबतींचा वावर वाढला आहे. कमी होणारी जंगले त्यामुळे जंगली प्राणी आता गाव वस्त्यांमध्ये येऊ लागले आहेत. पुणे जिल्ह्यात बिबट्यांनी हैदोस घातला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. नुकताच एक चिमुकला बिबट्याच्या हल्ल्यातून बचावला आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
पिंपरखेड परिसरात गेल्या २० दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यांमुळे शिवन्या शैलेश बोंबे, भागुबाई रंगनाथ जाधव आणि रोहन विलास बोंबे या तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात आले आहे. दरम्यान सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात एक चिमुकला थोडक्यात बचावला आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
पुणे जिल्ह्यातून एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एक चिमुकला घराच्या इथे असणाऱ्या झोपाळ्यावर बसलेला आहे. तितक्यात सावजाचा पाठलाग करताना एक बिबट्या घरच्या अंगणात आल्याचे या व्हिडिओ दिसून येत आहे. बिबट्याला पाहताच हा चिमुकला वेगाने घराच्या आत गेल्याचे दिसून येत आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जुन्नर आणि आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे. तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
तीन जणांचा जीव घेणारा नरभक्षक बिबट्या ठार
पिंपरखेड परिसरात मागील काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या नरभक्षक बिबट्या अखेर ठार करण्यात आला. पारगाव शिंगवे व पिंपरखेड परिसरात नागरिकांवर हल्ले करणाऱ्या या बिबट्याला मंगळवारी (दि. ४) रोजी रात्री साडेदहाच वाजताच्या सुमारास शार्प शूटर पथकाने गोळ्या झाडून ठार केले. या नरभक्षक बिबट्याचे वय अंदाजे चार ते पाच वर्षे असल्याचे वनविभागाने सांगितले. या घटनेनंतर परिसरात मोठा दिलासा व्यक्त करण्यात आला असून मृत बिबट्याचे शव ग्रामस्थांना दाखविण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे नेण्यात आले.
Pune Leopard Attack: तीन जणांचा जीव घेणारा नरभक्षक बिबट्या ठार; शार्प शूटर पथकाने थेट…
पिंपरखेड परिसरात गेल्या २० दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यांमुळे शिवन्या शैलेश बोंबे, भागुबाई रंगनाथ जाधव आणि रोहन विलास बोंबे या तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांचे पशुधन आणि माणसांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
वनविभागावर निष्क्रियतेचे आरोप होत होते. भीतीच्या छायेत जगणाऱ्या नागरिकांनी जुन्नर, शिरूर, आंबेगाव व खेड परिसरात रास्तारोको आणि आंदोलन करून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. “या परिसरात आता बिबटे नकोत,” अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली होती.