Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Public Health Star Rating: आरोग्य सुविधांच्या गुणवत्तेत पुणे नवव्या स्थानी, सोलापूर राज्यात दुसरे; सातारा २२ व्या क्रमांकावर!

Pune Health Rating: राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सोलापूर जिल्ह्यातही काही मूलभूत सुविधांची स्थिती समाधानकारक नसल्याचे रेटिंगमधून स्पष्ट झाले. प्रयोगशाळा-रेडिओलॉजी आणि अत्यावश्यक औषधांच्या उपलब्धतेचा निकष शून्य टक्के राहिला.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 10, 2026 | 02:47 PM
Pune Health Rating, Solapur Health Department, Satara Health News,

Pune Health Rating, Solapur Health Department, Satara Health News,

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या स्टार रेटिंग मूल्यांकनात सोलापूर राज्यात २ ऱ्या, पुणे ९ व्या तर सातारा २२ व्या स्थानी.
  • रँकमध्ये फरक असला तरी तिन्ही जिल्ह्यांची सरासरी रेटिंग ५ पैकी केवळ २ ते २.२ स्टारदरम्यान.
  • डॉक्टरांची उपस्थिती, औषध पुरवठा, प्रसूती व शस्त्रक्रिया अशा विविध निकषांच्या आधारे मूल्यांकन.
Maharashtra Public Health Department Star Rating :  राज्यातील सार्वजनिक आरोग्य संस्थांमधील सुविधांची गुणवत्ता आणि प्रत्यक्ष कामगिरीचे चित्र आरोग्य विभागाच्या स्टार रेटिंगमधून समोर आले आहे. पुणे आरोग्य परिमंडळातील सोलापूर जिल्ह्याने राज्यात दुसरा, पुण्याने नववा, तर साताऱ्याने २२ वा क्रमांक मिळविला आहे. मात्र, तिन्ही जिल्ह्यांची सरासरी रेटिंग २ ते २.२ स्टारच्या पुढे गेलेली नाही. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य संस्थांमधील मूलभूत सुविधा आणि सेवा गुणवत्तेत सुधारणा करण्याचे आव्हान कायम असल्याचे दिसून येते.

आरोग्य विभागाने राज्यातील विविध आरोग्य संस्थांचे डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उपस्थिती, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता, अत्यावश्यक औषधे, प्रयोगशाळा व रेडिओलॉजी सुविधा, बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण सेवा, संस्थात्मक प्रसूती, शस्त्रक्रिया, बेडचा वापर, रुग्ण सुविधा आणि रुग्ण समाधान अशा विविध निकषांवर मूल्यांकन केले. त्यानुसार सोलापूर आणि पुण्याला प्रत्येकी २.२/५ स्टार, तर साताऱ्याला २.०/५ स्टार मिळाले.

Sanjay Raut Criticized BJP: प्राथमिक शाळेत कांदा, बटाटा, लसूण खाण्यास बंदी! संजय राऊतांचा शाळा व्यवस्थापनाला इशारा

 

पुण्यात प्रयोगशाळा-रेडिओलॉजीची मोठी पीछेहाट :

पुणे जिल्ह्यात ओपीडी रुग्णसंख्या आणि रुग्ण सुविधांच्या निकषात १०० टक्के संस्थांनी अपेक्षित कामगिरी केली. रुग्ण समाधान आणि सुविधा तपासणी या दोन्ही निकषांमध्ये प्रत्येकी २२.९ टक्के संस्थांनी निकष पूर्ण केले.
कर्मचारी उपस्थितीचा निकष ५७.१ टक्के, तर तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपलब्धतेचा निकष ४६.४ टक्के संस्थांनी पूर्ण केला. शस्त्रक्रियांच्या निकषात केवळ २१.४ टक्के संस्थांना अपेक्षित कामगिरी करता आली. विशेष म्हणजे, प्रयोगशाळा व रेडिओलॉजीच्या संयुक्त निकषात एकाही संस्थेने अपेक्षित कामगिरी केली नाही. अत्यावश्यक औषधांची उपलब्धता केवळ ३.६ टक्के, तर बेड ऑक्युपन्सी १०.७ टक्के राहिली.

 

सोलापूरची कामगिरी दुसऱ्या क्रमांकाची; तरी मूलभूत सुविधांची कमतरता :

राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सोलापूर जिल्ह्यातही काही मूलभूत सुविधांची स्थिती समाधानकारक नसल्याचे रेटिंगमधून स्पष्ट झाले. प्रयोगशाळा-रेडिओलॉजी आणि अत्यावश्यक औषधांच्या उपलब्धतेचा निकष शून्य टक्के राहिला.

सोलापूरमध्ये बेड ऑक्युपन्सी १८.२ टक्के, संस्थात्मक प्रसूती २७.३ टक्के, तर शस्त्रक्रियांचा निकष ५० टक्के संस्थांनी पूर्ण केला. कर्मचारी उपस्थिती ६८.२ टक्के, रुग्ण समाधान ७७.३ टक्के, तर रुग्ण सुविधांचा निकष ९५.५ टक्के राहिला. ओपीडीच्या निकषात १०० टक्के संस्थांनी अपेक्षित कामगिरी केली.

Nagpur Health : रुग्णांच्या जीवाशी खेळाल तर कारवाई अटळ; आरोग्य विभागाचा इशारा

मंचर उपजिल्हा रुग्णालयाची सर्वोत्तम कामगिरी :

पुणे जिल्ह्यातील चाकण, जुन्नर आणि सासवड ग्रामीण रुग्णालयांना प्रत्येकी तीन स्टार मिळाले. १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये मंचर उपजिल्हा रुग्णालयाने ३.५ स्टार मिळवत सर्वोत्तम कामगिरी केली. बारामती महिला रुग्णालयाला तीन, तर पुणे जिल्हा रुग्णालयाला २.५ स्टार मिळाले.

बाह्यस्रोत सेवांचेही नियमित मूल्यांकन :

आरोग्य विभागांतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवांसोबतच बाह्यस्रोतांमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवांचीही स्टार रेटिंगच्या माध्यमातून नियमित तपासणी केली जाणार आहे. अनियमितता, गुणवत्तेतील त्रुटी आणि गैरप्रकार टाळण्यासाठी प्रत्येक सेवेचे नियमित परीक्षण व पुनर्मूल्यांकन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सातारा २२ व्या स्थानी :

सातारा जिल्ह्याला सरासरी २.० स्टार मिळाले असून राज्यात तो २२ व्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात प्रयोगशाळा व रेडिओलॉजीचा निकष शून्य टक्के, तर अत्यावश्यक औषधांची उपलब्धता केवळ ३.६ टक्के राहिली. बेड ऑक्युपन्सी आणि संस्थात्मक प्रसूतीचे निकष प्रत्येकी २६.३ टक्के संस्थांनी पूर्ण केले. शस्त्रक्रियांचा निकष ३६.४ टक्के संस्थांनी पूर्ण केला. कर्मचारी उपस्थिती आणि रुग्ण समाधानाचा स्तर ७८.९ टक्के राहिला. महाबळेश्वरला तीन स्टार, तर दहिवडी, गोंदवले आणि वडूजला प्रत्येकी २.५ स्टार मिळाले.

पुण्याच्या आरोग्य व्यवस्थेची ‘स्टार’ कामगिरी :

निकष कामगिरी (%)
ओपीडी सेवा १००%
रुग्ण सुविधा १००%
कर्मचारी उपस्थिती ५७.१%
तज्ज्ञ डॉक्टर उपलब्धता ४६.४%
रुग्ण समाधान २२.९%
शस्त्रक्रिया २१.४%
बेड ऑक्युपन्सी १०.७%
अत्यावश्यक औषधे ३.६%
प्रयोगशाळा व रेडिओलॉजी ०%

 

Web Title: Pune ninth solapur second in maharashtra public health facility star ratings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • Health News
  • Pune

संबंधित बातम्या

Pune Leopard Attack: दबक्या पावलांनी आला अन्…! दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याची झडप, वनविभागाने लावला पिंजरा
1

Pune Leopard Attack: दबक्या पावलांनी आला अन्…! दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याची झडप, वनविभागाने लावला पिंजरा

Kolte – Patil Developers Record : कोलते-पाटीलच्या इतिहासातील सर्वात दमदार परफॉर्मन्स; 600 कोटींच्या फ्लॅट्सची विक्री
2

Kolte – Patil Developers Record : कोलते-पाटीलच्या इतिहासातील सर्वात दमदार परफॉर्मन्स; 600 कोटींच्या फ्लॅट्सची विक्री

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
3

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Health Tips: जेवल्यानंतर छातीत जळजळ अ‍ॅसिडिटीचा त्रास? करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय; मिळेल आराम
4

Health Tips: जेवल्यानंतर छातीत जळजळ अ‍ॅसिडिटीचा त्रास? करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय; मिळेल आराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.