Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नगर रोडवरील वाहतूकीचा वेग वाढला, रस्त्यातील अडथळे दूर; नेमकं काय बदल केलेत?

पुणे शहरातून बाहेर पडण्यासाठी आणि शहरात दाखल होण्यासाठी प्रमुख मार्गांपैकी एक असलेल्या नगर रस्त्यावरील वाहतूकीचा वेग वाढला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 16, 2025 | 04:56 PM
नगर रोडवरील वाहतूकीचा वेग वाढला, रस्त्यातील अडथळे दूर; नेमकं काय बदल केलेत?

नगर रोडवरील वाहतूकीचा वेग वाढला, रस्त्यातील अडथळे दूर; नेमकं काय बदल केलेत?

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुणे शहरातून बाहेर पडण्यासाठी आणि शहरात दाखल होण्यासाठी प्रमुख मार्गांपैकी एक असलेल्या नगर रस्त्यावरील वाहतूकीचा वेग वाढला असून, वाहतूक पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांमुळे मार्गावरील कोंडी फुटून हा वेग वाढला आहे, असा दावा पोलिसांनी केला आहे. नगर रस्त्यावरील येरवडा ते खराडी या भागात प्रायोगिक तत्वावर सिग्नल फेज बदल, चौक सुधारणा, यु-टर्न, राईट टर्र्नमध्ये बदल केले. त्यामुळे वाहतूकीचा वेग गतवर्षीच्या (जानेवारी ते फेब्रुवारी) तुलनेत यंदा १६ ते १९ टक्क्यांनी वाढल्याचे निरीक्षण वाहतूक विभागाने नोंदविले आहे. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे, असेही पोलिसांचे म्हणणे आहे.

नगर रस्त्यावरील गर्दी चिंतेचा विषय ठरत होती. गेल्या काही वर्षात हे प्रमाण मोठे वाढले होते. त्यात अपघाताची संख्या देखील मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळेच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काही दिवसांपुर्वी नगर रस्त्याची पाहणी केली. येरवडा, विमानतळ, खराडी, वाघोली परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलीस आयुक्तांनी सूचना केल्या होत्या. त्यानूसार वाहतूक विभागाने नगर रस्त्यावरील समस्यांचा अभ्यास केला. महापालिका व पोलीसांनी संयुक्तपणे काम करीत उपाययोजना सुरू केल्या. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाहतूक सुधारली आहे. त्यासोबतच वाहतूकीचा वेग देखील वाढला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी वाहतूक कोंडीतून सुटकेचा श्वास सोडला आहे. अतिरीक्त आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपाययोजना राबविण्यात आल्या.

काय बदल केले?

येरवडा, शास्त्रीनगर चौकातील कल्याणीनगरकडे जाणार्‍या राईट टर्नमुळे मुख्य नगर रोडवर कोंडी होत होती. त्यामुळे हा राईट टर्न बंद करून पुढे यु टर्न दिल्याने मुख्य रस्त्यावरील कोंडी कमी झाली. तर, वडगाव शेरी चौकातून नगरकडे जाताना अग्निबाज गेटसमोरून यु टर्न देण्यात आला. तर पुण्याकडे येताना मेट्रो पिलर ४२२, ४२३ येथे यु टर्न दिला आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील कोंडी कमी होवून वेग वाढण्यास मदत झाली. विमाननगर चौक (फिनीक्स मॉल) येते राईट टर्नमुळे मुख्य रस्त्यावर कोंडी होत होती. पोलिसांनी हा राईट टर्न बंद करून चौक सिग्नल विरहीत केला. तर, खराडी दर्गा चौकातील राईट टर्न बंद करून आपले घर बसस्टॉप पासून यू टर्न केल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक सिग्नल विरहीत झाली. येरवडा ते खराडी या भागात केलेल्या या उपाययोजनानंतर एटीएमएस या अत्याधुनिक सिग्नल प्रणालीव्दारे वाहतूकीचा फ्लो पाहूण करण्यात आलेल्या विश्लेषणाव्दारे संबंधीत भागातील वेग वाढल्याचे स्पष्ट झाले. गेल्या वर्षीच्या (जाने – फेब्रुवारी) तुलनेत १६ ते १९ टक्क्यांनी हा वेग वाढला आहे.

वाघोली भागात विशेष कारवाई

नगर रस्त्यावरील वाघोली भागात सर्वाधिक वाहतूक कोंडींचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने या परिसरात विशेष कारवाई केली. यात वाघेश्वर चौक ते केसनंद फाटा तसेच बकोरी फाट्यापर्यंत रोडच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमणे, पोस्टर, टपर्‍या काढून टाकण्यात आल्या. रस्त्यावरील खड्डे बूजवून, रस्त्याचे डांबरीकरण केले. वाघोली वाहतूक विभागाच्या हद्दीत ट्रॅव्हल्सवर कारवाई करून त्यांना अटकाव करण्यात आला. परिसरातील बेशिस्त वाहतूकीवर मोठ्या प्रमाणात लगाम लावण्यात पोलिसांना यश आले आहे. परिणामी वाहतूक देखील सुरळीत झाली आहे.

३४ हजार केसेस, अडीच कोटींचा दंड

नगर रस्त्यांवरील बेशिस्त वाहनधारकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई यापुढे देखील सुरूच राहणार असून, चालू वर्षात जानेवारी ते १० मार्चपर्यंत म्हणजे, सव्वा दोन महिन्यात तब्बल ३४ हजार ३११ केसेस करून २ कोटी ४८ लाखांचा दंड आकारला आहे. यामध्ये राँग साईड, ट्रीपल सिट, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह, नो पार्किंग, सिग्नल तोडणे आदींचा समावेश आहे.

नगर रस्त्यावर मागील काही महिन्यांत केलेल्या उपाययोजनांमुळे कोंडी फुटून वाहतूकीचा वेग वाढण्यास मदत झाली आहे. सुरळीत वाहतूकीसाठी अनेक ठिकाणी बदल केले आहेत. सुधारणांमुळे वेग वाढला असून, बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई देखील केली जात आहे.

– अमोल झेंडे, उपायुक्त, वाहतूक शाखा.

Web Title: Pune police has informed that the speed of traffic on nagar road has increased nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2025 | 04:56 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • Pune Police
  • Pune Traffic
  • Traffic News

संबंधित बातम्या

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
1

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
2

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी
3

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
4

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.