Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्नीला घरी नेण्यासाठी सासरवाडीत गेला, पण मेव्हण्याने डोक्यातच फळी मारली! संभाजीनगरमध्ये खळबळ

छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगरमध्ये पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी सासरवाडीत गेलेल्या जावयावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. पत्नीला घरी पाठवण्यावरून झालेल्या वादात मेव्हण्याने लाकडी फळीने जावयाच्या डोक्यावर वार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दोघांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 18, 2026 | 04:16 PM
image

image

Follow Us
Follow Us:
  • पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी जावई सासरवाडीत गेला होता.
  • पत्नीला घरी नेण्यावरून वाद; मेव्हण्याने लाकडी फळीने हल्ला केल्याचा आरोप.
  • एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल.

छत्रपती संभाजीनगर : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी सासरवाडीत गेलेल्या जावयावर सासरच्या मंडळींनी हल्ला केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर परिसरात घडली आहे. पत्नीला आपल्यासोबत घरी पाठवण्यावरून झालेल्या वादात मेव्हण्याने लाकडी फळीने जावयाच्या डोक्यावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात जावई गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, बजाजनगर परिसरातील लक्ष्मी माता मंदिरासमोर हा प्रकार घडला. पीडित जावई आपल्या पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी सासरवाडीत गेला होता. यावेळी पत्नीला आपल्यासोबत घरी पाठवण्यावरून त्याचा सासरच्या मंडळींसोबत वाद झाला. वाद वाढत गेल्याने परिस्थिती चिघळली. याचदरम्यान, मेव्हणा दीपक शिंदे याने रागाच्या भरात जावयाच्या डोक्यावर लाकडी फळीने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात जावई गंभीर जखमी झाला.

साळीवरही मारहाणीचा आरोप

या घटनेदरम्यान मेहुणी छाया जाधव हिने मध्यस्थी करताना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोपही तक्रारदाराने केला आहे. कौटुंबिक वादातून झालेल्या या प्रकारामुळे परिसरात चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा: अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; मनमाडमध्ये हळहळ

एमआयडीसी वाळूज पोलिसांत गुन्हा दाखल

हल्ल्यात जखमी झाल्यानंतर पीडित जावयाने पोलिसांत धाव घेतली. त्याच्या तक्रारीवरून मेव्हणा दीपक शिंदे आणि साळी छाया जाधव यांच्याविरोधात एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेतील नेमकी वस्तुस्थिती तपासातून स्पष्ट होणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जावयावर हल्ला का करण्यात आला?

    Ans: पत्नीला आपल्यासोबत घरी पाठवण्यावरून झालेल्या वादातून हल्ला झाल्याचा आरोप आहे.

  • Que: आरोपी कोण आहेत?

    Ans: तक्रारीनुसार, मेव्हणा दीपक शिंदे आणि साळी छाया जाधव यांच्याविरोधात आरोप करण्यात आले आहेत.

  • Que: . जावयावर हल्ल्याची घटना कुठे घडली?

    Ans: छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर परिसरात लक्ष्मी माता मंदिरासमोर ही घटना घडली.

Web Title: Chhatrapati sambhajinagar bajaj nagar son in law attack case sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Crime . Crime News

संबंधित बातम्या

प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरचा धक्कादायक कारनामा? अभिनेत्रीच्या मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत मोठा खुलासा
1

प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरचा धक्कादायक कारनामा? अभिनेत्रीच्या मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत मोठा खुलासा

Shahanurwadi Land Case : संभाजीनगरमध्ये 4.76 हेक्टर जमिनीच्या हस्तांतरणात बनावटगिरी, न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल
2

Shahanurwadi Land Case : संभाजीनगरमध्ये 4.76 हेक्टर जमिनीच्या हस्तांतरणात बनावटगिरी, न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

Crime News: पुणे पोलीस भरतीत कुराशच्या बनावट प्रमाणपत्रांचा खेळ; १९ जणांवर बडतर्फीची कारवाई
3

Crime News: पुणे पोलीस भरतीत कुराशच्या बनावट प्रमाणपत्रांचा खेळ; १९ जणांवर बडतर्फीची कारवाई

Crime News: प्रेयसीसाठी वडिलांचाच काटा काढला? डायलिसिसच्या बहाण्याने नेले अन् केला घात
4

Crime News: प्रेयसीसाठी वडिलांचाच काटा काढला? डायलिसिसच्या बहाण्याने नेले अन् केला घात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.