Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रहित सर्वोपरी! AFMC चा दिमाखदार सोहळा; १४१ वैद्यकीय अधिकारी सशस्त्र दलात दाखल

दीक्षान्त संचलनात सर्वोत्कृष्ट सर्वांगीण विद्यार्थी म्हणून पुण्याच्या फ्लाइंग ऑफिसर अनन्या फडके यांना राष्ट्रपती सुवर्णपदक आणि कलिंगा ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 11, 2026 | 02:59 PM
राष्ट्रहित सर्वोपरी! AFMC चा दिमाखदार सोहळा; १४१ वैद्यकीय अधिकारी सशस्त्र दलात दाखल
Follow Us
Follow Us:
  • एएफएमसीतून १४१ वैद्यकीय अधिकारी सशस्त्र दलात दाखल
  • डॉक्टर-सैनिक म्हणून राष्ट्रसेवेची दुहेरी जबाबदारी – आरती सरीन
  • संकटाच्या काळात ‘एएफएमएस’चे वैद्यकीय कवच
सुनयना सोनवणे /पुणे: ‘डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार करणे आणि सैनिक म्हणून राष्ट्रसेवेसाठी सदैव सज्ज राहणे, ही दुहेरी जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर आहे. पांढरा कोट आणि भारतीय सशस्त्र दलाचा गणवेश परिधान करण्याचा सन्मान तुम्हाला मिळाला आहे. त्यामुळे व्यावसायिक कौशल्यासोबत शिस्त, प्रामाणिकपणा, संवेदनशीलता आणि सेवाभाव जपत राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य द्या,’ असे आवाहन सशस्त्र दल वैद्यकीय सेवेच्या (एएफएमएस) महासंचालक सर्जन व्हाइस ॲडमिरल आरती सरीन यांनी केले.

सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाच्या (एएफएमसी) ६०व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा शुक्रवारी कॅप्टन देवाशिष शर्मा कीर्ती चक्र परेड मैदानावर उत्साहात पार पडला. या वेळी १४१ वैद्यकीय पदवीधरांना सशस्त्र दल वैद्यकीय सेवेत अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. यामध्ये भारतीय लष्करातील ११२, नौदलातील १२ आणि हवाई दलातील १७ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

या सोहळ्यास एएफएमसीचे संचालक व कमांडंट लेफ्टनंट जनरल पंकज पी. राव, डेप्युटी कमांडंट मेजर जनरल अतुल सेठ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, प्राध्यापक, पालक उपस्थित होते. व्हाइस ॲडमिरल सरीन यांनी संचलनाची सलामी स्वीकारली. वैद्यकीय क्षेत्रात रोबोटिक्स, प्रिसिजन मेडिसिन, जीनोमिक्स, डिजिटल हेल्थ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असला, तरी रुग्णांप्रती माणुसकी, सहानुभूती आणि करुणा यांना पर्याय नाही. तंत्रज्ञान हे साधन असून संवेदनशील डॉक्टरची भूमिका कायम महत्त्वाची राहील, असे सरीन यांनी सांगितले.

‘अंतिम पग’ अन् देशसेवेची शपथ! NDA च्या १५० व्या तुकडीचे दिमाखदार दीक्षांत संचलन

पुण्याच्या अनन्या फडके यांना राष्ट्रपती सुवर्णपदक
दीक्षान्त संचलनात सर्वोत्कृष्ट सर्वांगीण विद्यार्थी म्हणून पुण्याच्या फ्लाइंग ऑफिसर अनन्या फडके यांना राष्ट्रपती सुवर्णपदक आणि कलिंगा ट्रॉफी प्रदान करण्यात आली. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करतानाच सैन्यात सेवा करण्याची इच्छा असल्याने त्यांनी एएफएमसीची निवड केली. ‘माझ्या कुटुंबात कोणतीही सैन्याची पार्श्वभूमी नव्हती. मात्र डॉक्टर होण्यासोबतच सैन्यात जाण्याचीही इच्छा होती. त्यामुळे एएफएमसीमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला,’ असे अनन्या यांनी सांगितले. आपल्या यशामागे आई गौतमी फडके आणि वडील डॉ. सचिन फडके यांचे मोठे पाठबळ असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

Indian Army : अग्निवीर परीक्षेचे हॉल तिकीट कधी येणार? पाहा प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत!

‘स्वार्थापेक्षा सेवा’ हा जीवनमंत्र जपा 
‘नेतृत्व हे पदामुळे मिळत नाही, तर जबाबदारी स्वीकारण्याची तयारी, कठीण प्रसंगी योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि सहकाऱ्यांचा विश्वास संपादन करण्याच्या वृत्तीतून ते घडते. प्रत्येक अधिकाऱ्याने ‘स्वार्थापेक्षा सेवा’, ‘प्रतिकूल परिस्थितीतही उत्कृष्ट कामगिरी’ आणि ‘नीतिमत्तेशी कोणतीही तडजोड नाही’ हा जीवनमंत्र अंगीकारावा.’
-सर्जन व्हाइस ॲडमिरल आरती सरीन

Web Title: 141 medical officers from afmc join the armed forces pune passing out parade of the 60th batch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • doctors
  • Indian Armed Forces
  • indian Soldiers
  • pune news

संबंधित बातम्या

Navaratri साठी पुण्यनगरी सज्ज! घटस्थापनेसह ‘या’ प्रमुख मंदिरांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
1

Navaratri साठी पुण्यनगरी सज्ज! घटस्थापनेसह ‘या’ प्रमुख मंदिरांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; पुण्यातील आंदोलनाचा सलग 9 वा दिवस
2

MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; पुण्यातील आंदोलनाचा सलग 9 वा दिवस

अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पृथ्वीराज सावंत यांची सोशल मीडियावर पोस्ट
3

अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पृथ्वीराज सावंत यांची सोशल मीडियावर पोस्ट

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?
4

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.