Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे-पिंपरी हादरले ! केमिकलयुक्त विषारी दारूमुळे 15 जणांचा संशयास्पद मृत्यू; प्रशासनासमोरच मृत्यूचे थैमान

वानखेडे याने हडपसर परिसरातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानवी जिवाशी खेळणारा विषारी दारूचा अड्डा चालवला होता. त्याने केमिकलयुक्त स्पिरिटचा वापर करून ही विषारी दारू तयार केली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 29, 2026 | 11:02 AM
पुणे-पिंपरी हादरले ! केमिकलयुक्त विषारी दारूमुळे 15 जणांचा संशयास्पद मृत्यू; प्रशासनासमोरच मृत्यूचे थैमान

पुणे-पिंपरी हादरले ! केमिकलयुक्त विषारी दारूमुळे 15 जणांचा संशयास्पद मृत्यू; प्रशासनासमोरच मृत्यूचे थैमान

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. केमिकलयुक्त विषारी गावठी दारू प्यायल्याने तब्बल 15 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, यामुळे संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. हडपसर येथील काळेपडळ येथे तयार झालेल्या या ‘विषारी घोट’ने अनेकांचे सुखी संसार उद्ध्वस्त केले आहेत. या भीषण दुर्घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेमागे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (Excise Department) रेकॉर्डवरील अत्यंत सराईत गुन्हेगार योगेश वानखेडे याचे नाव समोर आले आहे. वानखेडे याने हडपसर परिसरातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानवी जिवाशी खेळणारा विषारी दारूचा अड्डा चालवला होता. त्याने केमिकलयुक्त स्पिरिटचा वापर करून ही विषारी दारू तयार केली होती. ही दारू त्याने हडपसर आणि फुगेवाडी येथील अवैध अड्ड्यांवर पुरवली. ही दारू प्यायल्यानंतर नागरिकांना तीव्र उलट्या, पोटदुखी आणि डोळ्यांसमोर अंधारी येण्याचा त्रास सुरू झाला. काही तासांतच एकापाठोपाठ एक अशा 15 जणांचा मृत्यू झाला.

प्रशासनाचा ढिम्म कारभार की भ्रष्ट आशीर्वाद?

या घटनेमुळे दारू बनवत असलेल्या ठिकाणचे पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार वानखेडे प्रशासनाच्या डोळ्यांदेखत एवढा मोठा विषारी दारूचा अड्डा चालवतोच कसा? केमिकल स्पिरिटचा बेकायदेशीर पुरवठा त्याच्यापर्यंत पोहोचतोच कसा? असे संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

बॉम्ब शोधक पथकाची पळापळ अन् सोडला सुटकेचा नि:श्वास; ‘टेडीबेअर’मुळे पिंपरीत खळबळ

मुख्य आरोपी योगेश वानखेडे हा स्वतः राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर हजर झाला असून पोलिसांनी त्याच्या इतर काही साथीदारांना ताब्यात घेतले आहे. मात्र, निष्पाप जीव गेल्यानंतर आता कारवाईचे सोंग कशासाठी, असा उद्विग्न सवाल विचारला जात आहे.

हडपसर परिसरातील मृत व्यक्ती

1. राहुल शरद क्षीरसागर (वय ४५ वर्षे, रा. पांढरे मळा, सर्वे नंबर २५७, हडपसर, पुणे)
2. विजय भूकुरलाल शर्मा (वय ४५ वर्षे, रा. पांढरी मळा, ससाणे नगर, हडपसर, पुणे)
3. अरुण डाडर (रा. हडपसर, पुणे)
4. अशोक रमेश चव्हाण (रा. काळेपडळ, हडपसर, पुणे)

फुगेवाडी व इतर परिसरातील मृत व्यक्ती

५. पांडुरंग सदाशिव फुगे (वय ५७ वर्षे)
६. विजय प्रकाश राठोड (वय ३१ वर्षे)
७. राजेंद्र प्रकाश राठोड (वय ३४ वर्षे)
८. राजेंद्र राजपूत (वय ५१ वर्षे)
९. अकबर पठाण (वय ५२ वर्षे)
१०. बाबा शेख
११. आनंद देसाई (वय ६० वर्षे)
१२. निकाळजे

गंभीर रुग्ण नेमके किती?

अक्षय अवसरमल (अतिशय गंभीर अवस्था, उपचार सुरू – वाय. सी. एम. हॉस्पिटल, पिंपरी)
सुभाष डिग्गीकर (अतिशय गंभीर अवस्था, उपचार सुरू – औंध जिल्हा रुग्णालय)

प्रशासनाकडून अद्याप अधिकृत माहिती नाही

या इतक्या मोठ्या दुर्घटनेनंतरही रुग्णालय प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती अथवा आकडेवारी जाहीर केलेली नाही. माहिती लपवण्यामागे कोणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे का? अशी शंका आता उपस्थित केली जात आहे. हडपसर आणि फुगेवाडी परिसरात सध्या प्रचंड तणावाचे वातावरण असून, मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे.

Web Title: 15 suspected deaths due to toxic chemical laced liquor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 10:56 AM

Topics:  

  • Liquor Sales
  • Pimpri News

संबंधित बातम्या

Liquor Ban: दारूबंदीचा निर्णय बिहारसाठी ठरला शाप? ‘BAI’च्या नव्या रिपोर्टने मोठी खळबळ; नेमकं काय घडलं?
1

Liquor Ban: दारूबंदीचा निर्णय बिहारसाठी ठरला शाप? ‘BAI’च्या नव्या रिपोर्टने मोठी खळबळ; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.