Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खडकवासला धरणसाखळीत 88 टक्के पाणीसाठा; गेल्यावर्षी याच कालावधीत धरणसाठा होता 99.74 टक्के

जलसंपदा विभागाने जाहीर केलेल्या भीमा खोरे पूरनियंत्रण अहवालातून ही माहिती समोर आली आहे. खडकवासला प्रकल्पाच्या एकूण साठ्याची क्षमता ८७७.७० दशलक्ष घनमीटर असून, सध्या जलाशयात ७८१.५२ दशलक्ष घनमीटर पाणी आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 16, 2026 | 03:08 PM
खडकवासला धरणसाखळीत 88 टक्के पाणीसाठा; गेल्यावर्षी याच कालावधीत धरणसाठा होता 99.74 टक्के

खडकवासला धरणसाखळीत 88 टक्के पाणीसाठा; गेल्यावर्षी याच कालावधीत धरणसाठा होता 99.74 टक्के

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाखळीतील पाणीसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. जलसंपदा विभागाच्या १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या अहवालानुसार, खडकवासला प्रकल्पातील एकूण उपयुक्त पाणीसाठा ७२७.३४ दशलक्ष घनमीटर (८.०९ टीएमसी) असून, तो ८८.०९ टक्के आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत हा साठा ९९.७४ टक्के होता. त्यामुळे यंदा पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

जलसंपदा विभागाने जाहीर केलेल्या भीमा खोरे पूरनियंत्रण अहवालातून ही माहिती समोर आली आहे. खडकवासला प्रकल्पाच्या एकूण साठ्याची क्षमता ८७७.७० दशलक्ष घनमीटर असून, सध्या जलाशयात ७८१.५२ दशलक्ष घनमीटर पाणी आहे. त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा ७२७.३४ दशलक्ष घनमीटर आहे. गतवर्षी याच दिवशी उपयुक्त पाणीसाठा ८२३.५२ दशलक्ष घनमीटर होता. पुणे शहराची पाण्याची गरज भागविण्यासाठी खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांमधील पाणीसाठ्याला महत्त्व आहे.

यंदाच्या पाणीसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत घट झाल्याने आगामी काळातील पाण्याचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. उपलब्ध साठा, शहराची वाढती पाण्याची मागणी आणि सिंचनासाठी आवश्यक असलेले पाणी यांचा विचार करून जलसंपदा विभागाला पाणीवाटपाचे नियोजन करावे लागणार आहे. दरम्यान, भीमा खोऱ्यातील विविध धरणे आणि नद्यांच्या पातळीवरही जलसंपदा विभाग लक्ष ठेवून आहे.

केंद्रांवरील पाण्याची पातळी गेजपट्टीच्या खाली

पूरनियंत्रण अहवालात मुंढवा केटी वेअर, दौंड येथील भीमा नदी, नीरा नरसिंहपूर आणि पंढरपूर येथील विसर्ग मापन केंद्रांची माहिती नोंदविण्यात आली आहे. अहवालानुसार, या केंद्रांवरील पाण्याची पातळी गेजपट्टीच्या खाली असल्याची नोंद आहे.

दुष्काळाचा घाव, शेतकऱ्यांच्या पदरी नुकसान

पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली असतानाच वाढत्या तापमानामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. शेतातील पिकांची आजची स्थिती पाहून नुकसान निश्चित करण्याऐवजी, आगामी काळात होणारे संभाव्य नुकसानही विचारात घेण्याची भूमिका कृषी विभागाने घेतली आहे. विशेषतः गाळपाच्या प्रतीक्षेत असलेल्या उसाचे भवितव्य आणि ऑक्टोबर हीटचा पिकांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन पंचनामे केले जात आहेत. पुणे जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये आतापर्यंत सुमारे एक लाख ३९ हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले असून, दोन लाख ३७ हजार ३८२ खातेदारांच्या नुकसानीची नोंद करण्यात आली आहे.

12 सवलतींच्या अंमलबजावणीचा आढावा

जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या दहा तालुक्यांमध्ये शासनाकडून देण्यात येणाऱ्या १२ प्रकारच्या सवलती आणि उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी गुरुवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीत आढावा घेतला. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी शासनाकडून विविध सवलती आणि उपाययोजना राबविण्यात येत आहेत. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांचे प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Crime News : ‘पोलिस अधिकारी आहे’ म्हणत धमकी; ऑनलाइन गेममधील मैत्रीचा इंजिनिअरला बसला फटका

Web Title: 88 percent water storage in the khadakwasla dam chain nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • Khadakwasla Dam
  • pune news

संबंधित बातम्या

पुण्यनगरीला प्रदूषणाचा विळखा! कोट्यवधी खर्च करून देखील समस्या कायम; शुद्ध हवा मिळणार कधी?
1

पुण्यनगरीला प्रदूषणाचा विळखा! कोट्यवधी खर्च करून देखील समस्या कायम; शुद्ध हवा मिळणार कधी?

तरुणांमध्येही वाढतेय पाठदुखी! मणक्याच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
2

तरुणांमध्येही वाढतेय पाठदुखी! मणक्याच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

पाणी वाचवणे हेच प्रथम कर्तव्य! पुणेकरांवर २५ टक्के कपातीचे संकट? जलसंपदा विभागाच्या प्रस्तावाने चर्चेला उधाण
3

पाणी वाचवणे हेच प्रथम कर्तव्य! पुणेकरांवर २५ टक्के कपातीचे संकट? जलसंपदा विभागाच्या प्रस्तावाने चर्चेला उधाण

Rapido पुण्यात मोठा झटका! बाइक टॅक्सी सेवा बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश नेमकं कारण काय?
4

Rapido पुण्यात मोठा झटका! बाइक टॅक्सी सेवा बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश नेमकं कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.