Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपला मोठा धक्का; शरद बुट्टे पाटलांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपचे नेते शरद बुट्टे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 20, 2026 | 11:57 AM
भाजपला मोठा धक्का; शरद बुट्टे पाटलांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपला मोठा धक्का; शरद बुट्टे पाटलांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Follow Us
Close
Follow Us:
  • पुणे जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का
  • शरद बुट्टे पाटलांची भाजपला सोडचिठ्ठी
  • अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश
चाकण/अतिश मेटे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालमीत राजकीय कारकीर्द घडवून मागील निवडणूक काळात भारतीय जनता पक्षात गेलेले जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे पाटील यांनी तब्बल एक तपानंतर पुन्हा एकदा स्वगृही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. वराळे (ता. खेड) येथे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.

शरद बुट्टे पाटील यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने उत्तर पुणे जिल्ह्यात पक्षाचे राजकीय बळ लक्षणीयरीत्या वाढले असून, भाजपला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे.

या प्रवेश सोहळ्याला माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यासह सुरेश घूले, राजेंद्र कोरेकर, सुनील चांदेरे, लक्ष्मण टोपे, कैलास सांडभोर, अनिलबाबा राक्षे, अरुण चांभारे, विलास कातोरे, अजित बुट्टे पाटील, जयसिंग दरेकर, चांगदेव शिवेकर, निलेश थिगळे, अमोल पानमंद, आशिष येळवंडे, पप्पू टोपे, सय्यद इनामदार, मोबिन काझी, गणेश बोत्रे, राम गोरे, सचिन पानसरे, नगरसेविका विजया तोडकर, रेश्मा मुटके, सुनीता बुट्टे पाटील, श्रद्धा मांडेकर, सुनील देवकर, काळूराम पिंजण, शरद निखाडे, शिवाजी डावरे, रोहित डावरे, दत्तात्रय टेमगिरे यांच्यासह विविध गावांचे सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शरद बुट्टे पाटील यांनी खेड तालुक्यातील भामा खोऱ्याचे तीन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. ते १५ वर्षे जिल्हा परिषद सदस्य राहिले असून, जिल्हा परिषदेचे सभापती म्हणूनही त्यांनी प्रभावी काम केले आहे. गट राखीव झाल्यानंतर त्यांनी आपल्या समर्थक महिलेला बिनविरोध जिल्हा परिषद सदस्य करून जिल्ह्याच्या राजकारणात एक वेगळा इतिहास घडविला. यातून त्यांची संघटन क्षमता, नेतृत्वगुण आणि राजकीय दूरदृष्टी स्पष्टपणे दिसून येते, असे गौरवोद्गार अजित पवार यांनी काढले.

माजी आमदार दिलीप मोहिते यांनी आपल्या भाषणात शरद बुट्टे यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. “विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी जीवतोडून काम केले आहे. त्यांच्या विकासात्मक दूरदृष्टीचा आम्ही सन्मान करतो,” असे सांगत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका केली. “दुसऱ्या गटातील इच्छुक उमेदवार स्वतःच्या गटात जागा असूनही इकडे का लढतोय? पाईट –आंबेठाण जिल्हा परिषद गट मी ओळखू शकलो नाही तर तू काय ओळखणार?” असे म्हणत त्यांनी नाव न घेता घणाघात केला. तसेच “फक्त पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकता येत नाहीत. दम असेल तर स्वतःच्या गटातून निवडणूक लढवून दाखवा,” असे खडेबोलही त्यांनी सुनावले.

या प्रवेशावेळी शरद बुट्टे पाटील यांच्यासोबत विविध गावांचे सरपंच, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. यामुळे खेड तालुक्यासह संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढली असून, अजित पवार यांनी आपल्या बालेकिल्ल्याची भिंत आणखी मजबूत केल्याचे स्पष्ट झाले आहे. राजकारणातील ‘हुकमी एक्का’ म्हणून अजित पवारांनी पुन्हा एकदा अचूक चाल टाकल्याची चर्चा या प्रवेश सोहळ्यानंतर राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

हे सुद्धा वाचा : काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी घेतला मोठा निर्णय; ‘या’ पक्षासोबत केली आघाडी

Web Title: A bjp leader from pune district has joined ajit pawars ncp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 11:57 AM

Topics:  

  • ajit pawar
  • BJP
  • NCP News
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Ratnagiri : रत्नागिरी राष्ट्रवादीच्या(अ.प) दोन पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा
1

Ratnagiri : रत्नागिरी राष्ट्रवादीच्या(अ.प) दोन पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा

कोकणात ‘या’ नेत्यांमध्ये दिलजमाई? आगामी निवडणुका जाधवांच्या नेतृत्वात लढण्याचे आदेश दिल्याने…
2

कोकणात ‘या’ नेत्यांमध्ये दिलजमाई? आगामी निवडणुका जाधवांच्या नेतृत्वात लढण्याचे आदेश दिल्याने…

Chiplun News: आगामी निवडणुकीसाठी BJP ने जाहीर केली उमेदवारी; कोण कुठे लढणार?
3

Chiplun News: आगामी निवडणुकीसाठी BJP ने जाहीर केली उमेदवारी; कोण कुठे लढणार?

Maharashtra Politics: भाजपला मोठे भगदाड? ‘या’ निवडणुकीत डावलले गेल्याने…
4

Maharashtra Politics: भाजपला मोठे भगदाड? ‘या’ निवडणुकीत डावलले गेल्याने…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.