
शिवणे–नांदेड सिटीदरम्यान पूल उभारण्याचा मार्ग मोकळा, महापालिकेची तांत्रिक मान्यता; कामासाठी हालचालींना वेग
खडकवासला धरण परिसरासह शिवणे, उत्तमनगर आणि कोंढवे-धावडे भागात गेल्या काही वर्षांत झपाट्याने शहरीकरण झाले आहे. या परिसरातील लोकसंख्येत मोठी वाढ झाल्याने शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढली आहे. मात्र, मुठा नदी ओलांडण्यासाठी पुरेसा आणि बारमाही वाहतुकीसाठी उपयुक्त पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. विशेषत: पावसाळ्यात धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यानंतर नदीवरील पूल बंद करावा लागत असल्याने विद्यार्थ्यांसह नोकरदार आणि इतर नागरिकांची मोठी गैरसोय होते.
धरणाजवळील सध्याचा पूल सुमारे ६५ वर्षे जुना आहे. धरणाच्या भिंतीपासून २०० मीटरच्या परिसरात बांधकाम करण्यावर निर्बंध असल्याने त्या ठिकाणी नवीन पूल उभारणे शक्य नाही. तसेच, शिवणे-नांदेड दरम्यानच्या विद्यमान पुलाजवळ रस्ते अरुंद असून नदीपात्रात खडक असल्याने त्याच ठिकाणी नवीन पूल बांधणे तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे आहे. त्यामुळे सध्याच्या पुलाच्या पूर्वेकडे नांदेड सिटी-शिवणे दरम्यान नवीन पूल उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
आचारसंहिता संपल्यानंतर निविदा
नवीन पुलाच्या प्रकल्पाला तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने निविदा प्रक्रियेला प्रतीक्षा करावी लागत आहे.
खडकवासला धरण परिसर आणि लगतच्या ग्रामीण भागात वेगाने शहरीकरण झाले आहे. नांदेड सिटी, शिवणे, उत्तमनगर आणि कोंढवे-धावडे या दाट लोकवस्तीच्या भागांतून दररोज हजारो नागरिक कामानिमित्त शहरात ये-जा करतात. मात्र, मुठा नदीच्या पलीकडे जाण्यासाठी जवळचा पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे नवीन नदीपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. — दिनकर गोजारे, मुख्य अभियंता, प्रकल्प विभाग, पुणे महापालिका.
Ans: शिवणे आणि नांदेड सिटीला जोडण्यासाठी मुठा नदीवर २७० मीटर लांबीचा आणि २४ मीटर रुंदीचा नवीन पूल उभारण्यात येणार आहे.
Ans: पुलाच्या बांधकामासाठी सुमारे ५८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, पुणे महापालिकेने प्रकल्पाला तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता दिली आहे.
Ans: पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पुलाच्या बांधकामाची निविदा काढण्यात येणार आहे.