Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Metro : हिंजवडी मेट्रो दिवाळीआधी सुरु होणार? 3 नोव्हेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता

मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) टप्प्याटप्याने तपासणी पूर्ण करून सुरुवातीच्या १२ आणि नंतरच्या ५ अशा एकूण १७ स्थानकांवर प्रवासी वाहतूक सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 15, 2026 | 09:39 AM
हिंजवडी मेट्रो दिवाळीआधी सुरु होण्याची शक्यता

हिंजवडी मेट्रो दिवाळीआधी सुरु होण्याची शक्यता

Follow Us
Follow Us:
  • दिवाळीपूर्वी मेट्रो धावण्याची चिन्हे
  • 3 नोव्हेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता
  • आयटी कर्मचाऱ्यांसह पुणेकरांना दिलासा मिळण्याची अपेक्षा
पिंपरी : हिंजवडी आयटी पार्कला पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘पुणेरी मेट्रो‘ मार्गावर दिवाळीपूर्वी मेट्रो धावण्याची चिन्हे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 नोव्हेंबर रोजी बारामती दौऱ्यावर येत असून, याच दौऱ्यादरम्यान त्यांच्या हस्ते या मेट्रो मार्गाचे लोकार्पण करण्याचे नियोजन प्रशासनाकडून आखले जात आहे. मात्र, याबाबत प्रशासकीय पातळीवरून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसल्याने प्रवाशांची धाकधूक कायम आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता ऑक्टोबरपर्यंत लागू असल्याने या प्रकल्पाचे उद्घाटन महिनाभर लांबणीवर पडले होते. आचारसंहिता संपल्यानंतर तत्काळ सेवा सुरू करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) वेगवान हालचाली केल्या असून, राज्य सरकार व मुख्यमंत्री कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) टप्प्याटप्याने तपासणी पूर्ण करून सुरुवातीच्या १२ आणि नंतरच्या ५ अशा एकूण १७ स्थानकांवर प्रवासी वाहतूक सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. उर्वरित ६ स्थानकांची कामे डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून, पुढील वर्षी मार्चअखेर संपूर्ण मार्गावरील सर्व स्थानके पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होतील.

दरम्यान,  हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या मेट्रो मार्गावरील आणखी पाच स्थानकांना रेल्वे मेट्रो सुरक्षा आयुक्तांकडून (CMRS) सुरक्षा मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे एकूण २३ पैकी १७ स्थानकांवर प्रवासी सेवा सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे.

आयटी कर्मचाऱ्यांसह पुणेकरांना दिलासा मिळण्याची अपेक्षा

बाणेर, बालेवाडी, औंध आणि शिवाजीनगर परिसरातून हजारो नागरिक हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करण्यासाठी जात असतात. अशा सर्व कर्मचाऱ्यांना या मेट्रोचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गावरील रस्त्यांवर वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढतच चालले होते. त्यामुळे अनेक प्रवाशांना तासन् तास प्रवासातच वेळ घालवावा लागत होता. पण ही मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होण्यास आणि रस्त्यांवरील वाहनांचा ताण कमी करण्यास मदत होऊ शकते.

Hinjawadi-Shivajinagar Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोबाबत मोठी अपडेट; १७ स्थानकांवर सेवा सुरू होणार

Web Title: Hinjewadi metro to start before diwali nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 09:39 AM

Topics:  

  • Hinjewadi-Shivajinagar Metro
  • Metro Rail
  • pune news

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या नाराजीवर फडणवीसांचं भाष्य, मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात विषय संपवला!
1

Devendra Fadnavis on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या नाराजीवर फडणवीसांचं भाष्य, मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात विषय संपवला!

Cricket: स्पार्टन मान्सून लीगमध्ये लेजेंड्सची बाजी; पुणे रेंजर्सला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपद
2

Cricket: स्पार्टन मान्सून लीगमध्ये लेजेंड्सची बाजी; पुणे रेंजर्सला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपद

Cricket: डीएसपी करंडकात Pune Cricket Club ची अंतिम फेरीत धडक; रुद्र पाबळेची आक्रमक खेळी
3

Cricket: डीएसपी करंडकात Pune Cricket Club ची अंतिम फेरीत धडक; रुद्र पाबळेची आक्रमक खेळी

Pune News : भाजपमध्ये मोठी खळबळ! रवींद्र चव्हाण यांची मोठी ऍक्शन! १०० नगरसेवकांना पाठवली ‘कारणे दाखवा’ नोटीस
4

Pune News : भाजपमध्ये मोठी खळबळ! रवींद्र चव्हाण यांची मोठी ऍक्शन! १०० नगरसेवकांना पाठवली ‘कारणे दाखवा’ नोटीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.