Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेजुरी गडावर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मारहाणीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षा व्यवस्था बळकट करण्याची मागणी

महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या जेजुरी गडावर मंदिर सेवेकरी, पुजारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 16, 2026 | 12:30 AM
जेजुरी गडावर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मारहाणीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षा व्यवस्था बळकट करण्याची मागणी

जेजुरी गडावर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मारहाणीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षा व्यवस्था बळकट करण्याची मागणी

Follow Us
Follow Us:

जेजुरी : महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या जेजुरी गडावर मंदिर सेवेकरी, पुजारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धार्मिक नियमांचे पालन करण्यास सांगितल्याच्या कारणावरून पुजाऱ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भाविक व्यवस्थापन आणि सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत खंडोबा मंदिरातील पुजारी अमर बारभाई यांना काही भाविकांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. या हल्ल्यात त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले असून डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरातील पवित्र मानल्या जाणाऱ्या रंगमहल परिसरात चप्पल घालून प्रवेश करण्यास मनाई असतानाही काही भाविक तेथे चप्पलसह गेले होते. यावेळी पुजारी अमर बारभाई यांनी संबंधितांना नियमांची माहिती देत चप्पल बाहेर काढण्याची विनंती केली. मात्र, याच कारणावरून त्यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही महिन्यांत जेजुरी गडावर सेवेकरी, कर्मचारी आणि गर्दी नियंत्रणासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींवर हल्ल्यांच्या तीन ते चार घटना घडल्या आहेत. मात्र, अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना होत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. गुरव, पुजारी, वीर, कोळी, गडशी, सेवेकरी, मानकरी आणि देवस्थान कर्मचारी हे भाविकांना सुरळीत दर्शन मिळावे यासाठी सातत्याने कार्यरत असतात. गर्दीचे नियोजन, शिस्त राखणे आणि धार्मिक परंपरांचे पालन होईल याची जबाबदारी ते पार पाडत असतात. मात्र, नियमांचे पालन करण्यास सांगितल्यावर त्यांनाच दमदाटी आणि मारहाणीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. यापूर्वी देवस्थानच्या शिपायांवरही हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. वाढती गर्दी आणि काही व्यक्तींची बेशिस्त वर्तणूक यामुळे मंदिर परिसरातील सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी अधोरेखित होत आहेत. त्यामुळे जेजुरीसारख्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रात सुरक्षा व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी जोर धरत आहे.

विशेष धोरण राबविण्याची गरज

मंदिर परिसरात अधिक सक्षम सीसीटीव्ही यंत्रणा, अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई तसेच सेवेकरी व कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी विशेष धोरण राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. जेजुरी हे राज्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे महत्त्वाचे केंद्र असल्याने येथे सेवा बजावणाऱ्या पुजारी, सेवेकरी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे ही देवस्थान प्रशासनासह शासनाचीही जबाबदारी असल्याचे मत व्यक्त होत आहे.

सेवाभावी परंपरेला धक्का; सुरक्षेची मागणी तीव्र

जेजुरी गडावरील गुरव, पुजारी, वीर, कोळी, गडशी, सेवेकरी, मानकरी, कर्मचारी आणि ग्रामस्थ हे भाविकांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबवत असतात. अन्नदान, महाप्रसाद, दर्शन व्यवस्थापन आणि भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे घटक सातत्याने कार्यरत असतात. विशेषतः गेल्या तीन दशकांहून अधिक काळ चंपाषष्ठी महोत्सवासह विविध धार्मिक सोहळ्यांमध्ये हजारो भाविकांसाठी मोफत महाप्रसाद व भोजन व्यवस्था केली जाते. मात्र, अलीकडील मारहाणीच्या घटनेमुळे या सेवाभावी घटकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा : युट्यूबवरील गाण्यावर नृत्य; विश्रांतवाडीतील विद्यार्थ्यांना सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा

सुरक्षा रक्षक आणि पोलीस बंदोबस्त अपुरा

गर्दीच्या काळात उपलब्ध सुरक्षा रक्षक आणि पोलीस बंदोबस्त अपुरा पडत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. त्यामुळे सेवेकऱ्यांवरच हल्ले होत असतील तर भविष्यात गर्दी नियंत्रण आणि भाविक व्यवस्थापनाचे मोठे आव्हान निर्माण होऊ शकते, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिकांच्या मते, विविध लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मंदिराला भेट देत असले तरी सेवेकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अपेक्षित गांभीर्याने हाताळला जात नाही. जेजुरीसारख्या राज्यातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रात सुरक्षा व्यवस्थेचे बळकटीकरण करणे ही काळाची गरज असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Web Title: A demand is being made to strengthen the security arrangements at jejuri fort

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • jejuri
  • Jejuri Khandoba Temple
  • Jejuri Police

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.