Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंद्रायणी नदीत मृत मासे, प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; रसायनमिश्रित सांडपाणी नदीत सोडल्याचा आरोप

आळंदी नगरपरिषद पाणीपुरवठा केंद्रापासून उत्तर-दक्षिण दिशेने नदीपात्राच्या दोन्ही बाजूंना मृत माशांचा खच दिसून आल्याने वारकरी, भाविक आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 14, 2026 | 03:51 PM
इंद्रायणी नदीत मृत मासे, प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; रसायनमिश्रित सांडपाणी नदीत सोडल्याचा आरोप

इंद्रायणी नदीत मृत मासे, प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; रसायनमिश्रित सांडपाणी नदीत सोडल्याचा आरोप

Follow Us
Follow Us:

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत आढळून आल्याने नदीच्या वाढत्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आळंदी नगरपरिषद पाणीपुरवठा केंद्रापासून उत्तर-दक्षिण दिशेने नदीपात्राच्या दोन्ही बाजूंना मृत माशांचा खच दिसून आल्याने वारकरी, भाविक आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

आळंदीतील साठवण बंधारा ते चिंबळी बंधारा या परिसरात मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळून आले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पीएमआरडीएच्या हद्दीतून सांडपाणी आणि रसायनमिश्रित पाणी प्रक्रिया न करता इंद्रायणी नदीत सोडले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नदीतील जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले असून, दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या या प्रकाराकडे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तीर्थक्षेत्र विकासाच्या पार्श्वभूमीवर पवित्र इंद्रायणी नदीचे वाढते प्रदूषण ही गंभीर बाब असून, नदीत सोडले जाणारे सांडपाणी व रसायनमिश्रित पाण्याची तातडीने तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन

अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने इंद्रायणी नदीचे प्रदूषण तत्काळ रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची तसेच नदी प्रदूषणास कारणीभूत घटकांवर कारवाई करून दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत पुणे जिल्हाधिकारी, पुणे विभागीय आयुक्त, पुणे प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळ, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त आणि पीएमआरडीए आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष वैभवराज रौंदळ आणि पुणे जिल्हा धार्मिक प्रकोष्ठ अध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले.

हे सुद्धा वाचा : जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं

कायमस्वरूपी उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा

इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले. पुंडलिक मंदिरापासून डुडुळगाव पुलापर्यंत नदी परिसराची पाहणी केली असता अनेक ठिकाणी मृत मासे आढळल्याचा दावा महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. दरवर्षी इंद्रायणी नदीत अशा प्रकारे मासे मृत होण्याच्या घटना घडत असून, नदीत येणाऱ्या रसायनमिश्रित पाण्यामुळे हा प्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी. अन्यथा वारकरी, भाविक आणि नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अखिल भारत हिंदू महासभेने दिला आहे.

Web Title: A large number of dead fish have been found in the indrayani riverbed at alandi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • alandi
  • Indrayani River
  • PCMC News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.