Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिखली-मोशी परिसरात उभारणार आधुनिक एसटी स्थानक; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश

पिंपरी-चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातील लाखो नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. चिखली किंवा मोशी परिसरात एक सुसज्ज आणि आधुनिक एसटी बस स्थानक उभारण्याच्या मागणीची राज्य शासनाने तातडीने दखल घेतली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 04, 2026 | 05:07 PM
चिखली-मोशी परिसरात उभारणार आधुनिक एसटी स्थानक; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश

चिखली-मोशी परिसरात उभारणार आधुनिक एसटी स्थानक; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातील लाखो नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. चिखली किंवा मोशी परिसरात एक सुसज्ज आणि आधुनिक एसटी बस स्थानक उभारण्याच्या मागणीची राज्य शासनाने तातडीने दखल घेतली आहे. भाजपचे आमदार महेश किसनराव लांडगे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) प्रशासनाला या प्रस्तावावर त्वरित आणि जलदगतीने कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

 

आमदार महेश लांडगे यांनी दिनांक २५ जून रोजी परिवहन मंत्र्यांना एक सविस्तर निवेदन सादर करून चिखली किंवा मोशी परिसरातील आरक्षित जागेवर आधुनिक एसटी बस स्थानक उभारण्याची आग्रही मागणी केली होती. चालू विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, आमदार लांडगे यांनी पुन्हा एकदा परिवहन मंत्री सरनाईक यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत परिवहन मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत पुढील प्रशासकीय कार्यवाहीचे आदेश दिले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश

या महत्त्वाच्या बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांना थेट निर्देश दिले. त्यानुसार, पुणे विभाग नियंत्रकांमार्फत तातडीने सर्वेक्षण करून चिखली किंवा मोशी परिसरातील योग्य जागेची निवड करावी आणि नवीन बस स्थानक उभारणीची तांत्रिक प्रक्रिया जलदगतीने सुरू करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनी या नियोजित बस स्थानकासाठी आवश्यक असलेली आरक्षित जागा एसटी महामंडळाकडे हस्तांतरित करण्याबाबतही योग्य ती पावले उचलावीत, अशा सूचना संबंधित स्तरावर देण्यात आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा : पालखी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड सज्ज; महापौर रवि लांडगे यांनी प्रशासनाला दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

वाढत्या नागरीकरणामुळे हक्काच्या बस स्थानकाची गरज

गेल्या दशकात चिखली, मोशी, चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी, तळवडे आणि स्पाईन रोड या परिसरात प्रचंड प्रमाणावर नागरीकरण झाले असून लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. मात्र, या भागातील नागरिकांना आंतरजिल्हा किंवा राज्यांतर्गत प्रवासासाठी वल्लभनगर किंवा इतर दूरच्या एसटी बस स्थानकांवर अवलंबून राहावे लागत होते. चिखली-मोशी परिसर हा पुणे-नाशिक महामार्गालगत असल्याने आणि वाकड-हिंजवडी परिसर मुंबई-बंगळुरू महामार्गाशी जोडलेला असल्याने, या ठिकाणी नवीन बस स्थानक झाल्यास उत्तर पिंपरी-चिंचवडमधील रहिवासी, आयटी पार्क व औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी, कामगार आणि विद्यार्थ्यांना प्रवासासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार असून शहरातील मुख्य बस स्थानकांवरील ताणही लक्षणीयरीत्या कमी होईल.

“चिखली किंवा मोशी येथे आधुनिक एसटी बस स्थानक उभारण्याची मागणी ही पिंपरी-चिंचवडसह उत्तर पुणे जिल्ह्यातील लाखो नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाशी आणि गरजेशी संबंधित आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संवेदनशील विषयाची तातडीने दखल घेत एसटी महामंडळाला त्वरित कार्यवाहीचे निर्देश दिल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. या बस स्थानकामुळे सर्वसामान्यांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि दर्जेदार प्रवासी सेवा उपलब्ध होईल. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर प्रत्यक्षात आणण्यासाठी शासन आणि संबंधित यंत्रणांकडे माझा सातत्याने पाठपुरावा सुरूच राहील.” — महेश लांडगे, आमदार, पिंपरी-चिंचवड (पुणे)

Web Title: A modern st bus station will be constructed in the chikhali moshi area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 05:06 PM

Topics:  

  • Bus Stand
  • mahesh landge
  • Pratap Saranaik

संबंधित बातम्या

ठाणे ते देवगड थेट एसटी बससेवा सुरु होणार; आमदार फाटक यांच्या मागणीची परिवहनमंत्र्यांकडून तात्काळ दखल
1

ठाणे ते देवगड थेट एसटी बससेवा सुरु होणार; आमदार फाटक यांच्या मागणीची परिवहनमंत्र्यांकडून तात्काळ दखल

Pratap Sirnaik: परिवहन विभागाच्या १५५ मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑनलाईन बदल्या
2

Pratap Sirnaik: परिवहन विभागाच्या १५५ मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑनलाईन बदल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.