Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Zp : ऐनवेळी आर्थिक विषयांचा भडीमार; जिल्हा परिषद स्थायी समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत ऐनवेळी मोठ्या प्रमाणात आर्थिक विषय मांडून त्यांना मंजुरी देण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 09, 2026 | 03:25 PM
ऐनवेळी आर्थिक विषयांचा भडीमार; जिल्हा परिषद स्थायी समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

ऐनवेळी आर्थिक विषयांचा भडीमार; जिल्हा परिषद स्थायी समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:

पुणे/आकाश ढुमेपाटील : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत ऐनवेळी मोठ्या प्रमाणात आर्थिक विषय मांडून त्यांना मंजुरी देण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाच्या स्पष्ट निर्देशांनंतरही निधी पुनर्नियोजन, खरेदी प्रस्ताव आणि आर्थिक तरतुदींचे विषय थेट बैठकीत मंजुरीसाठी आणण्यात आल्याने या निर्णयांच्या वैधानिकतेवरही चर्चा सुरू झाली आहे.

 

प्रशासक राजवट संपल्यानंतर विषय समित्यांची स्थापना झाल्यानंतर स्थायी समितीची ही पहिली बैठक अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीच्या मूळ अजेंड्यात पदाधिकाऱ्यांच्या जुन्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहने खरेदी करण्याचा विषय समाविष्ट होता. मात्र बैठकीदरम्यान पाच ते सहा ऐनवेळचे आर्थिक विषय अचानक समितीसमोर ठेवण्यात आले.

पंचायत विभागाकडून काही योजनांतील निधी कमी करून तो इतर कामांकडे वळविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच भजन साहित्य खरेदीसारखे प्रस्तावही मंजुरीसाठी सादर करण्यात आले. महिला व बालविकास विभागाने बाळंतिणींसाठी साहित्य खरेदीसाठी ५० लाख रुपये, डीएसपी व ओटीएसपी योजनांसाठी २ कोटी १० लाख रुपये, महिला बचत गटांसाठी ५० लाख रुपये आणि अंगणवाडीतील मुलांच्या बौद्धिक व शारीरिक विकासासाठी ५० लाख रुपयांचे प्रस्ताव ऐनवेळी सादर केले. या प्रस्तावांना प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यताही देण्यात आल्याचे समोर आले आहे.

मात्र नियमांनुसार अशा आर्थिक विषयांसाठी प्रशासनाचा पूर्वअभिप्राय आवश्यक असतो. ग्रामीण विकास विभागाने यापूर्वी वेळोवेळी काढलेल्या आदेशांमध्ये आर्थिक आणि धोरणात्मक विषय ऐनवेळी सभेपुढे मांडू नयेत, असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. तरीही पहिल्याच बैठकीत या निर्देशांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले.

यामुळे जिल्हा परिषद कारभारातील पारदर्शकता आणि निर्णय प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नियमबाह्य पद्धतीने विषय मंजूर झाल्याचा आरोप काही सदस्यांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, पदाधिकारी निवडीनंतरची ही पहिली नियमित बैठक असतानाही तिला विशेष सभेचे स्वरूप देण्यात आल्याने आणखी एक वाद निर्माण झाला आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या २९ सदस्यांच्या मागणीनुसार ही सभा बोलावण्यात आली होती. जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावयाचा आराखडा तसेच वित्त आयोगाच्या निधीतील कामांचे विषय विशेष सभेत घेण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

हे सुद्धा वाचा : माणिकबाग नाट्यगृह अद्याप प्रतीक्षेत; 22 कोटी खर्चूनही दहा वर्षापासून काम अपूर्णच

Web Title: A question mark has been raised over the functioning of the pune zilla parishad standing committee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • maharashtra
  • NCP News
  • pune news

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
3

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
4

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.