Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भटक्या कुत्र्यांनी 15 मिनिट लचके तोडले; चाकणमध्ये महिलेचा तडफडून मृत्यू

पुणे जिल्ह्यातील औद्योगिक शहर असलेल्या चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका ३२ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 16, 2026 | 04:12 PM
चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; नगरपरिषदेने केली आता 'ही' मोठी कारवाई

चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; नगरपरिषदेने केली आता 'ही' मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:

चाकण/अतिश मेटे : पुणे जिल्ह्यातील औद्योगिक शहर असलेल्या चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका ३२ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे–नाशिक महामार्गावरील आंबेठाण चौकाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास दहा ते बारा भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने महिलेवर हल्ला चढवून तिचा जागीच जीव घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

शोभा विजय वाघमारे (वय ३२) असे मृत महिलेचे नाव असून, त्या मूळच्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील रहिवासी होत्या. सध्या त्या चाकण परिसरात वास्तव्यास होत्या. सोमवारी (दि. १६) मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास त्या आंबेठाण चौकाजवळील उड्डाणपुलाखालून सर्व्हिस रोडने जात असताना अचानक भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने त्यांच्यावर हल्ला केला.

प्रतिकाराचा प्रयत्न निष्फळ

दहा ते बारा कुत्र्यांच्या टोळीने एकाच वेळी हल्ला केल्याने त्या पूर्णपणे घेरल्या गेल्या. जीव वाचवण्यासाठी त्यांनी दगड उचलून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुत्र्यांच्या आक्रमक झुंडीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

अंगाचे लचके तोडले

कुत्र्यांनी त्यांच्या हात, पाय, चेहरा आणि मानेवर गंभीर चावे घेतले. कपडे फाडून अंगाचे अक्षरशः लचके तोडल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. जवळपास १५ मिनिटे हा भीषण प्रकार सुरू होता. अतिरक्तस्त्राव आणि तीव्र जखमांमुळे शोभा वाघमारे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

सकाळी मृतदेह आढळला

मंगळवारी सकाळी परिसरातील नागरिकांना विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आला. सुरुवातीला हा अत्याचार किंवा खुनाचा प्रकार असावा अशी चर्चा सुरू होती. मात्र, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

चाकण शहर आणि परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढल्याची तक्रार नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. काही नागरिकांनी ही कुत्री सामान्य नसून, लांडगा आणि कुत्रा यांच्या संकरित प्रजातीची असावीत, असा संशयही व्यक्त केला आहे. या घटनेनंतर नागरिक, महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा : निलंग्यात कर्जवसुलीसाठी दोघांचे अपहरण; गाडीत बसवून शेतात नेले अन्…

प्रशासनाकडे कारवाईची मागणी

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात आजवर अनेक घटना घडल्या आहेत. मागील महिन्यात मार्केटयार्ड परिसरात एका भटक्या कुत्र्याने तब्बल पंचवीस ते तीस जणांना चावे घेतले होते. परंतु आजच्याभीषण घटनेनंतर चाकण परिसरातील भटक्या कुत्र्यांवर तातडीने नियंत्रण मिळवावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाकडे केली जात आहे.

Web Title: A shocking incident has taken place in chakan where a woman was killed in an attack by stray dogs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 04:11 PM

Topics:  

  • Chakan News
  • CM Devedra Fadnavis
  • Dog

संबंधित बातम्या

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
1

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
2

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
3

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

Accident News: तरुणाला धडक दिल्यानंतर पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न; क्षणात बाजूला उडी  अन्…
4

Accident News: तरुणाला धडक दिल्यानंतर पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न; क्षणात बाजूला उडी अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.