Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; 44 प्रवाशांनी भरलेली बस पलटी

पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस हद्दीत बारामती फाट्याजवळ शुक्रवारी (दि. २०) पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास अक्कलकोटहून पुण्याकडे जाणारी एसटी बस पलटी होऊन अपघात झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 20, 2026 | 06:31 PM
पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; 44 प्रवाशांनी भरलेली बस पलटी

पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; 44 प्रवाशांनी भरलेली बस पलटी

Follow Us
Follow Us:

पाटस : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस हद्दीत बारामती फाट्याजवळ शुक्रवारी (दि. २०) पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास अक्कलकोटहून पुण्याकडे जाणारी एसटी बस पलटी होऊन अपघात झाला आहे. या भीषण अपघातात बसमधील सुमारे ४४ प्रवासी थोडक्यात बचावले असून तीन ते चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बसचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. या बसमध्ये अंदाजे ४४ प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

 

दरम्यान, जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाला जोडणाऱ्या बारामती फाट्याजवळ सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे हा परिसर सध्या अपघातप्रवण ठरत आहे. मागील तीन महिन्यांपासून येथे सातत्याने लहान-मोठे अपघात घडत असून, काही अपघातांमध्ये जीवितहानीही झाली आहे. ३१ डिसेंबर २०२५ रोजी मालवाहू कंटेनर भंगार दुकानात घुसल्याने एका मजुराचा जागीच मृत्यू झाला होता, तर दोन जण जखमी झाले होते. त्यानंतर ३ जानेवारी २०२६ रोजी हायवा वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ४ जानेवारी २०२६ रोजी ट्रकने कारला धडक दिल्याने दोन महिला जखमी झाल्या होत्या. तसेच फेब्रुवारी महिन्यात सिमेंट वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली होती.

वाहनचालकांचा उडतोय गोंधळ

सध्या उड्डाणपूल बांधकामामुळे महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. रस्त्यावरील खोदकाम, वाकडे-तिकडे वळण आणि अपुरी सूचना यामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडत असून, अपघातांची शक्यता वाढली आहे. संबंधित ठेकेदाराने सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना न केल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रशासनाने तातडीने माहिती फलक, दिशादर्शक चिन्हे व इतर सुरक्षाविषयक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

हे सुद्धा वाचा : गाडीचा कंट्रोल सुटला अन् थेट जगबुडीच्या…; खेडमध्ये घडला विचित्र अपघात

सुरक्षेअभावी अपघातांना आमंत्रण

बारामती फाट्याजवळ सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामात ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर येत आहे. वाहनचालक व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. वाहतूक कोंडीही वारंवार होत असून, वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचारी नेमणे, मजबूत संरक्षक कठडे उभारणे आणि स्पष्ट दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहे. अपुऱ्या सुरक्षेमुळे या ठिकाणी जीवघेण्या अपघातांत वाढ होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

Web Title: A shocking incident has taken place where an st bus overturned on the pune solapur national highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 06:31 PM

Topics:  

  • Accident in Patas
  • Accident News
  • Patas

संबंधित बातम्या

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू
1

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

Jalgaon News: माळी कुटुंबावर शोककळा! वळवलेल्या वाहतूकीने घेतला जीव मायलेकराचा जीव
2

Jalgaon News: माळी कुटुंबावर शोककळा! वळवलेल्या वाहतूकीने घेतला जीव मायलेकराचा जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.