Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभेचे थेट प्रक्षेपण पुन्हा बंद! पारदर्शक कारभाराच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण पुन्हा बंद करण्यात आल्याने महापालिकेच्या कारभारातील पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही प्रक्षेपण बंद केल्याने वाद निर्माण झाला होता.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 30, 2026 | 06:26 PM
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभेचे थेट प्रक्षेपण पुन्हा बंद! पारदर्शक कारभाराच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभेचे थेट प्रक्षेपण पुन्हा बंद! पारदर्शक कारभाराच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:
  • महापालिका सभेचे थेट प्रक्षेपण पुन्हा बंद
  • सत्ताधारी भाजपच्या भूमिकेवर सवाल
  • प्रक्षेपण बंद करण्याचे कारण स्पष्ट करण्याची मागणी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण पुन्हा बंद करण्यात आल्याने महापालिकेच्या कारभारातील पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही प्रक्षेपण बंद केल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा प्रक्षेपण थांबविण्यात आल्याने प्रशासनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

 

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहराच्या विकासकामांसह आर्थिक प्रस्ताव, प्रशासकीय निर्णय आणि जनहिताच्या विविध विषयांवर चर्चा होते. या चर्चेची माहिती नागरिकांना थेट मिळावी, यासाठी सभेचे प्रक्षेपण महत्त्वाचे मानले जाते. मात्र, वारंवार प्रक्षेपण बंद होत असल्याने सभागृहातील कामकाज नागरिकांपासून दूर ठेवले जात आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

यापूर्वीही सभेचे थेट प्रक्षेपण बंद करण्यात आले होते. त्यावेळी या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला होता. नगरसेवक संदीप वाघेरे यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर काही काळाने प्रक्षेपण पुन्हा सुरू करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना सभागृहातील चर्चा आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिका जाणून घेता येत होत्या. मात्र, गुरुवारी (दि. ३०) सुरू असलेल्या सभेचे प्रक्षेपण पुन्हा बंद करण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे. प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय नेमका कोणी आणि कोणत्या कारणास्तव घेतला, याबाबत प्रशासनाने स्पष्टीकरण देण्याची मागणी होत आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांची मोठी कारवाई! एमडी आणि गांजा विक्रीच्या तयारीत असलेल्या चौघांना ठोकल्या बेड्या

सत्ताधारी भाजपच्या कारभारावर प्रश्न

पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभाराचा दावा करणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या काळातच प्रक्षेपण बंद होण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. सभागृहातील कामकाज नागरिकांसाठी खुले ठेवण्यास हरकत काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. महापालिका प्रशासनाने प्रक्षेपण बंद करण्यामागील अधिकृत कारण स्पष्ट करून ते नियमितपणे सुरू ठेवावे, अशी मागणी होत आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे पोलिस आयुक्तांचा सलग दुसऱ्या दिवशी दणका! आणखी चार पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन; दोन दिवसांत आठ जणांवर कारवाई

💡

Frequently Asked Questions

  • Que: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभेचे प्रक्षेपण का चर्चेत आले आहे?

    Ans: महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण पुन्हा बंद करण्यात आल्याने पारदर्शक कारभाराचा मुद्दा चर्चेत आला आहे.

  • Que: यापूर्वी प्रक्षेपण बंद केल्यानंतर काय घडले होते?

    Ans: यापूर्वी प्रक्षेपण बंद केल्याने वाद निर्माण झाला होता. नगरसेवक संदीप वाघेरे यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिल्यानंतर प्रक्षेपण पुन्हा सुरू करण्यात आले होते.

  • Que: नागरिकांकडून काय मागणी केली जात आहे?

    Ans: प्रक्षेपण बंद करण्यामागील अधिकृत कारण स्पष्ट करून सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण नियमितपणे सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.

Web Title: The live broadcast of the pimpri chinchwad municipal corporation meeting has been stopped nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 06:26 PM

Topics:  

  • PCMC News
  • Pimpri Chinchwad
  • Ravi Landge

संबंधित बातम्या

Cricket: पिंपरी चिंचवड करंडकात लक्ष्य ॲकॅडमीचा धमाका! कुंदन कुमारच्या अष्टपैलू कामगिरीने थेट…
1

Cricket: पिंपरी चिंचवड करंडकात लक्ष्य ॲकॅडमीचा धमाका! कुंदन कुमारच्या अष्टपैलू कामगिरीने थेट…

Pimpri Chinchwad Water Crisis: दररोज ४०५ एमएलडी पाणी सोडले जाते मग पिंपरी चिंचवडचे पाणी कोण चोरतंय?
2

Pimpri Chinchwad Water Crisis: दररोज ४०५ एमएलडी पाणी सोडले जाते मग पिंपरी चिंचवडचे पाणी कोण चोरतंय?

निगडीतील २५ एकर जागेवरील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प वादात; नगरसेवकांचे आयुक्तांना निवेदन
3

निगडीतील २५ एकर जागेवरील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प वादात; नगरसेवकांचे आयुक्तांना निवेदन

Cricket News: नाद खुळा! PCMC क्रिकेट लीगमध्ये ‘या’ टीम्सचा जलवा; २नाईन स्पोर्ट्‌स क्लब थेट…
4

Cricket News: नाद खुळा! PCMC क्रिकेट लीगमध्ये ‘या’ टीम्सचा जलवा; २नाईन स्पोर्ट्‌स क्लब थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.