Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माळेगाव’च्या अध्यक्षपदावर अजितदादा आज होणार विराजमान; उपाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यातॽ

माळेगाव कारखान्याचा अध्यक्ष मी स्वतः होणार असल्याचे अजित पवार यांनी भाषणात सांगितले होते. त्यानुसार, त्यांनी आभार मेळाव्यात देखील आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करत आपण कारखान्याचे अध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट केले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 05, 2025 | 11:35 AM
'माळेगाव'च्या अध्यक्षपदावर अजितदादा आज होणार विराजमान

'माळेगाव'च्या अध्यक्षपदावर अजितदादा आज होणार विराजमान

Follow Us
Close
Follow Us:

माळेगाव / प्रदीप जगदाळे : संपूर्ण राज्यात चर्चेत असलेल्या माळेगाव सहकारी कारखान्याच्या अध्यक्षपदाची निवडणूक शनिवारी (दि.5) होणार असून, जाहीर केल्याप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष होणार आहेत. तर उपाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली श्री नीलकंठेश्वर पॅनलने २१ पैकी २० जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व राखले आहे. या निवडणुकीमध्ये विरोधी गटातील सहकार बचाव पॅनलचे चंद्रराव तावरे हे एकमेव उमेदवार विजयी झाले. मात्र, सर्व जागांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह २० उमेदवारांनी विजय मिळवला.

दरम्यान, माळेगाव कारखान्याचा अध्यक्ष मी स्वतः होणार असल्याचे अजित पवार यांनी भाषणात सांगितले होते. त्यानुसार, त्यांनी आभार मेळाव्यात देखील आपल्या भूमिकेचा पुनरूच्चार करत आपण कारखान्याचे अध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार, शनिवारी (दि.5)संचालक मंडळाची बैठक होणार आहे.

या बैठकीमध्ये प्रांतधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये सर्वानुमते अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार विराजमान होणार आहेत. मात्र, उपाध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

नीरावागज गटातून अविनाश देवकाते, विलास देवकाते, जयपाल देवकाते या तिघांपैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर या तिघांशिवाय महिला राखीवमधून निवडून आलेल्या संगीता कोकरे किंवा ज्योती मुलमुले या दोघींपैकी एकीला उपाध्यक्ष पदाची संधी मिळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे उपाध्यक्ष पद निरावागच गटामध्ये मिळणार की पणदरे गटामध्ये मिळणार, हे निवडीमध्ये स्पष्ट होणार आहे.

24 जूनला झाली मतमोजणी

बारामतीच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे बहुचर्चित निवडणूकीची मतमोजणी 24 जून रोजी पार पडली. साखर कारखान्यावर सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शरद पवार यांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे आणि शेतकरी संघटनेचे चार पॅनल रिंगणात होते. या निवडणुकीचा निकाल समोर आला असून, उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झाले आहेत.

Web Title: Ajit patil will be sworn in as the president of malegaon sugar factory today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 11:27 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Politics
  • Malegaon Sugar Factory Election

संबंधित बातम्या

Prashant Jagtap : न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्या प्रकरणी  शरद पवार गटाकडून निषेध
1

Prashant Jagtap : न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्या प्रकरणी शरद पवार गटाकडून निषेध

मेढ्यात नगराध्यक्षपदी ‘मी’ नाही तर आता ‘सौभाग्यवती’; गुडघ्याला बाशिंग बांधून बसणाऱ्या अनेकांचा भ्रमनिरास
2

मेढ्यात नगराध्यक्षपदी ‘मी’ नाही तर आता ‘सौभाग्यवती’; गुडघ्याला बाशिंग बांधून बसणाऱ्या अनेकांचा भ्रमनिरास

Raigad News : दिवाळीपूर्वी रस्ता दुरुस्त करा अन्यथा… ; प्रशासनाच्या विरोधात शेकापचं रास्ता रोको आंदोलन
3

Raigad News : दिवाळीपूर्वी रस्ता दुरुस्त करा अन्यथा… ; प्रशासनाच्या विरोधात शेकापचं रास्ता रोको आंदोलन

‘स्मार्ट सुनबाई’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पोस्टरचं अनावरण
4

‘स्मार्ट सुनबाई’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पोस्टरचं अनावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.