Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMC Election 2026 : एक घर, अनेक वॉर्ड! एकाच कुटुंबातील मतदार वेगवेगळ्या वॉर्डांत असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

PMC Election 2026 : एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या वॉर्डांतील मतदार यादीत नोंदवली गेल्याचे अनेक ठिकाणी आढळून आले आहे. या गोंधळामुळे मतदारांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 15, 2026 | 02:18 PM
allocation of different polling stations to members of the same family created confusion pmc elections 2026

allocation of different polling stations to members of the same family created confusion pmc elections 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • एकाच कुटुंबातील सदस्याला वेगवेगळे केंद्र
  • प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा परिणाम
  • मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता
PMC Election 2026 : पुणे : आकाश ढुमेपाटील : महाराष्ट्रामध्ये महापालिका निवडणुकीची (Municipal Elections) रणधुमाळी सुरु आहे. राज्यातील 29 पालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदान केद्रांवर मतदारांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र मतदार याद्यांमधून अनेक घोळ समोर येत आहे. एकाच कुटुंबातील प्रत्येक सदस्याला वेगवेगळे मतदान केंद्रे देण्यात आली आहेत. (BMC Election 2026)

पुणे शहरात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक गंभीर आणि अस्वस्थ करणारी बाब समोर आली आहे. एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या वॉर्डांतील मतदार यादीत नोंदवली गेल्याचे अनेक ठिकाणी आढळून आले आहे. या गोंधळामुळे मतदारांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला असून, प्रशासनाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

हे देखील वाचा : नागपूरमध्ये महाभारताचा दाखला देत NOTA वर गरजले मोहन भागवत, मतदान देत काय केले आवाहन?

अनेक नागरिकांनी तक्रार केली आहे की, एकाच घरात राहणारे पती-पत्नी, पालक आणि मुले यांची मतदान केंद्रे आणि वॉर्ड क्रमांक वेगवेगळे दाखवले गेले आहेत. काही ठिकाणी तर पतीचा मतदान केंद्र एक प्रभागात, तर पत्नीचा दुसऱ्याच प्रभागात असल्याचे चित्र आहे. यामुळे मतदानाच्या दिवशी मतदारांना अनावश्यक धावपळ करावी लागत असून, काहीजण तर मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा परिणाम

या परिस्थितीचा थेट परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. “मतदान हा लोकशाहीचा मूलभूत अधिकार आहे. मात्र, मतदार यादीतील अशा चुका लोकशाही प्रक्रियेवरच आघात करणाऱ्या आहेत,” अशी प्रतिक्रिया जागरूक नागरिकांकडून उमटत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार आणि महिलांसाठी ही समस्या अधिक त्रासदायक ठरत आहे. राजकीय पक्षांनीही या मुद्द्यावर प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. विरोधकांनी मतदार यादीतील गोंधळ हा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचा आरोप केला आहे. तर सत्ताधारी पक्षांकडून ही तांत्रिक चूक असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे देखील वाचा : बोटावरची शाई पुसण्यासाठी केमिकल घेऊन व्यक्ती केंद्राबाहेरच उभा..! पुण्यातील धायरीमध्ये धक्कादायक प्रकार

मतदार यादी तयार करण्याची जबाबदारी असलेल्या निवडणूक आयोग आणि स्थानिक प्रशासन यावर उत्तर देणार का असा सवाल पुणेकर नागरिक विचारत आहेत. काही भागांमध्ये सीमारेषा बदल, वॉर्ड पुनर्रचना आणि जुन्या नोंदींच्या आधारे यादी तयार झाल्यामुळे अशा चुका झाल्याचा दावा करण्यात येत आहे. लोकशाही सुदृढ ठेवण्यासाठी मतदार यादी अचूक आणि पारदर्शक असणे अत्यावश्यक आहे.

EVM मशीन बंद पडल्याचे प्रकार

प्रभाग २६ अंतर्गत स्वारगेट पोलिस लाईन, सेंट हिल्डाज स्कूलमधील दोन मतदान केंद्रे, सावित्रीबाई फुले स्मारक, घोरपडे पेठ उद्यान वसंतदादा अभ्यासिका आणि महात्मा गांधी उर्दू शाळा या ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या. सकाळच्या वेळेत मतदानासाठी मोठ्या संख्येने मतदार रांगेत उभे असताना यंत्रे अचानक ठप्प झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. काही मतदारांनी अर्ध्या तासाहून अधिक वेळ प्रतीक्षा केल्याचे सांगितले, तर काहींनी नाराजी व्यक्त करत मतदान केंद्र सोडल्याचीही चर्चा आहे.

Web Title: Allocation of different polling stations to members of the same family created confusion pmc elections 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections
  • PMC Election 2026

संबंधित बातम्या

BMC Swikrut Nagarsevak: ‘स्वीकृत ‘ची निवड लांबणीवर? इच्छुकांची नाराजी टाळण्यासाठी राजकीय पक्षांचा सावध पवित्रा
1

BMC Swikrut Nagarsevak: ‘स्वीकृत ‘ची निवड लांबणीवर? इच्छुकांची नाराजी टाळण्यासाठी राजकीय पक्षांचा सावध पवित्रा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.