मतदाराच्या बोटावर शाई पुसण्यासाठी केमिकल असल्याचा प्रकार पुण्यामध्ये घडला आहे (फोटो - सोशल मीडिया)
पुणे महापालिका निवडणुकीसाठी 9 वर्षांनी निवडणूक होत आहे. त्यामुळे मतदार मोठ्या उत्साहाने मतदान करत आहेत. मात्र पुण्यातील धायरी भागामध्ये मोठी धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील धायरी येथे मतदारांसाठी वापरण्यात येणारी शाई ही पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. धायरीमधील येथील प्रभाग 34 येथील शाळा नारायणराव सणस विद्यालय येथे मतदानाची शाई पुसत असल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मतदारांच्या बोटाला लावणाी शाई सहज पुसली जात असल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकाला बेदम चोप दिला.
हे देखील वाचा : मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाण्यावरुन वाद; पिंपरी चिंचवडमधील मतदार केंद्रावरील प्रकार
शाई सहज पुसली जात असल्यामुळे दुबार मतदानाचा प्रकार घडण्याची शक्यता असते. यामुळे मतदानासाठी वेगळ्या प्रकारची शाई वापरली जाते. मात्र पुण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांकडून सहजपणे मार्कर वापरला जात आहे. तसेच पुसली जाईल अशी शाई वापरली जात आहे. यामुळे राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने सांगितले की, मतदान केंद्राजवळच संबंधित एक व्यक्ती हाताला लावणारी शाई समोर पुसत होता. समोरासमोर तो व्यक्ती शाई पुसत होता. मी त्याला पकडत असताना काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमचा आहे आमचा आहे म्हणून त्याला सोडवायला येत होते, असा दावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला.
हे देखील वाचा : लोकशाहीचा कणा कमकुवत; मतदानाच्या दिवशीच EVM बंद पडल्याने संशय
निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने संबंधित व्यक्तीकडे मतदानाची शाई पुसण्यासाठी केमिकल असल्याचे देखील सांगितले आहे. तसेच अशा प्रकारामुळे दुबार मतदान होण्याची शक्यता असते. तसेच ही शाई पुसण्याची गरज तरी काय? असा प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने विचारला आहे. तसेच याबाबत पोलीस आणि निवडणूक आयोगामध्ये तक्रार दाखल करणार असल्याचे देखील सांगितले आहे.
मतदान केंद्रे बंद पडल्याचा प्रकार
पुण्यातील प्रभाग २६ अंतर्गत स्वारगेट पोलिस लाईन, सेंट हिल्डाज स्कूलमधील दोन मतदान केंद्रे, सावित्रीबाई फुले स्मारक, घोरपडे पेठ उद्यान वसंतदादा अभ्यासिका आणि महात्मा गांधी उर्दू शाळा या ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या. सकाळच्या वेळेत मतदानासाठी मोठ्या संख्येने मतदार रांगेत उभे असताना यंत्रे अचानक ठप्प झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. काही मतदारांनी अर्ध्या तासाहून अधिक वेळ प्रतीक्षा केल्याचे सांगितले, तर काहींनी नाराजी व्यक्त करत मतदान केंद्र सोडल्याचीही चर्चा आहे.






