Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाहतूक पोलिसांचा आता पालिकेला ‘अलर्ट’; कारणे शोधून उपाययोजना करण्याचे पोलिस आयुक्तांचे निर्देश

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी केवळ रस्त्यावर उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यापुरते मर्यादित न राहता कोंडीची कारणे दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 17, 2026 | 11:52 AM
वाहतूक पोलिसांचा आता पालिकेला 'अलर्ट'; कारणे शोधून उपाययोजना करण्याचे पोलिस आयुक्तांचे निर्देश

वाहतूक पोलिसांचा आता पालिकेला 'अलर्ट'; कारणे शोधून उपाययोजना करण्याचे पोलिस आयुक्तांचे निर्देश

Follow Us
Follow Us:

पुणे : वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी केवळ रस्त्यावर उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यापुरते मर्यादित न राहता कोंडीची कारणे दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्या आहेत. वाहतूक नियमन करताना ज्या चौकांत किंवा रस्त्यांवर खड्डे आढळतील, त्याची माहिती महापालिकेला देऊन ते बुजवून घेण्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

पुणे शहरातील रस्त्यांवरील खड्डे हे वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण आहेत, असा दावा पोलिसांचा आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावतो तसेच वाहनचालकांना अचानक ब्रेक लावणे किंवा मार्ग बदलणे भाग पडते. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. यामुळे वाहतूक पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांची, चौकाची पाहणी करून वाहतुकीला अडथळा ठरणारे खड्डे निदर्शनास आणावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी ह्या खड्ड्यांची माहिती संबंधित क्षेत्रीय कार्यालय तसेच महापालिकेला द्यावी. नंतर महापालिका अधिकाऱ्यांशी समन्वय साधून हे खड्डे तातडीने बुजवून घेण्याची कार्यवाही करावी, असे सांगितले आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी केवळ वाहतूक सुरळीत करण्यापुरते मर्यादित न राहता कोंडी निर्माण करणाऱ्या मूलभूत कारणांवरही उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. खड्डे नसल्याचा दावा महापालिका करत आहे. मात्र, शहरातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे पहायला मिळत आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून प्रत्यक्ष पाहणी करून खड्ड्यांची माहिती महापालिकेला देण्यात येणार आहे.

‘कोंडी कुठे आणि का?’ यावर भर

पुणे शहरातील प्रमुख चौकांमध्ये निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा पोलिस आयुक्तांनी स्वतंत्रपणे आढावा घेतला आहे. कोणत्या चौकात कोणत्या कारणामुळे कोंडी होते, याची माहिती नकाशाच्या माध्यमातून मांडण्यात आली. वाहतूक कोंडीची मूळ कारणे शोधून ती दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुढाकार घ्यावा, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा : डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

महापालिकेशी समन्वय

रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत अनेकदा महापालिका आणि पोलिसांकडून वेगवेगळे निरीक्षण समोर येते. मात्र, प्रत्यक्ष वाहतूक नियमन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणत्या ठिकाणी खड्ड्यांमुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे, याची माहिती अधिक अचूकपणे मिळू शकते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अशा ठिकाणांची माहिती महापालिकेला देऊन त्यावर कार्यवाही करून घेण्यासाठी समन्वय साधावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Web Title: Amitesh kumar has issued important instructions to the police to resolve traffic congestion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 11:52 AM

Topics:  

  • pune news
  • Pune Police Action
  • Traffic News

संबंधित बातम्या

Pune Teachers Voter List : मतदारयादीत ‘बॉम्बस्फोट’! मतदाराच्या नावाचा ‘बॉम्बस्फोट’ म्हणून उल्लेख, मतदार यादी पाहून सगळेच हैराण
1

Pune Teachers Voter List : मतदारयादीत ‘बॉम्बस्फोट’! मतदाराच्या नावाचा ‘बॉम्बस्फोट’ म्हणून उल्लेख, मतदार यादी पाहून सगळेच हैराण

पावसामुळे शाळांच्या परिसराती बसथांबा कोसळला, मनसे आक्रमक; महापालिका आयुक्तांकडे केली ‘ही’ मागणी
2

पावसामुळे शाळांच्या परिसराती बसथांबा कोसळला, मनसे आक्रमक; महापालिका आयुक्तांकडे केली ‘ही’ मागणी

Maharashtra Drought: दुष्काळाच्या यादीबाहेर असूनही पावसाचा दुष्काळ! पुण्यातील ५ तालुक्यांतील ४३ मंडळांत शेतीवर संकट
3

Maharashtra Drought: दुष्काळाच्या यादीबाहेर असूनही पावसाचा दुष्काळ! पुण्यातील ५ तालुक्यांतील ४३ मंडळांत शेतीवर संकट

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
4

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.