Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दारू पिऊन ST Bus चालवाल तर…! ड्यूटीवर जाण्याआधी चालक-वाहकांना द्यावी लागणार ‘ही’ टेस्ट

मद्यप्राशन करून ड्युटीवर आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. पहिल्या वेळी दोषी आढळल्यास निलंबन, तर वारंवार असे प्रकार घडल्यास सेवासमाप्तीची कारवाई केली जाईल.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 18, 2026 | 03:27 PM
दारू पिऊन ST Bus चालवाल तर…! ड्यूटीवर जाण्याआधी चालक-वाहकांना द्यावी लागणार ‘ही’ टेस्ट
Follow Us
Follow Us:

पुणे एसटी विभागाचा मोठा निर्णय
चालक आणि वाहक दोघांची ‘अल्कोटेस्ट’ चाचणी अनिवार्य
प्रवाशांच्या जीविताशी संबंधित सुरक्षेला प्राधान्य

पुणे: प्रवाशांच्या जीविताशी संबंधित सुरक्षेला प्राधान्य देत राज्य परिवहन महामंडळाने पुणे एसटी विभागात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे चालक आणि वाहक या दोघांचीही ड्युटी सुरू होण्यापूर्वी ‘अल्कोटेस्ट’ चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. या चाचणीत पात्र ठरल्यानंतरच चालकांच्या हाती बसचे स्टेअरिंग दिले जाणार आहे.

पुणे विभागात एकूण 8८२ चालक, १,०५२ वाहक आणि ९१२ बस कार्यरत आहेत. दररोज या सर्व चालक-वाहकांची अल्कोटेस्टद्वारे तपासणी केली जाणार असून, प्रत्येक आगारात यासाठी विशेष यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तपासणीचे निकाल डिजिटल स्वरूपात नोंदवले जाणार आहेत, जे भविष्यातील शिस्तभंग कारवाईसाठी पुरावा म्हणून वापरले जाणार आहेत.

मद्यप्राशन करून ड्युटीवर आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. पहिल्या वेळी दोषी आढळल्यास निलंबन, तर वारंवार असे प्रकार घडल्यास सेवासमाप्तीची कारवाई केली जाईल. त्यामुळे चालक-वाहकांमध्ये शिस्त वाढेल आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेत भर पडेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

MSRTC: लालपरीचा होणार कायापालट! 2037 पर्यंत पूर्णतः इलेक्ट्रिक बसेस, प्रताप सरनाईक यांची माहिती

दरम्यान, काही चालकांकडून मद्यप्राशन केल्याच्या तक्रारी येत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता नियमित तपासणीमुळे असे प्रकार थांबतील आणि अपघातांची संख्या घटेल, असा विश्वास एसटी महामंडळाला आहे.

प्रवाशांच्या जीविताशी खेळण्याची कोणालाही परवानगी नाही. हे नवे नियम काटेकोरपणे अंमलात आणले जातील. प्रत्येक आगाराकडे अॅनालायझर मशीन आहे. आणखी मशीनची मागणी करण्यात आली आहे.

अरुण सिया,

विभाग नियंत्रक, पुणे एसटी विभाग

लालपरीचा होणार कायापालट!

ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी लालपरी अशी ओळख असलेली एसटी लवकरच पूर्णतः इलेक्ट्रिक होणार असून, वर्ष २०३७पर्यंत एसटीच्या ताफ्यातील सर्व २२,००० बस पूर्णतः इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे सरकारी बस नेटवर्क संपूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतरित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी रोजी विधान परिषदेत दिली आहे.

Pratap Sarnaik : सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास, परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांचे निर्देश

मंत्री सरनाईक यांनी विधान परिषदेत सभागृहाला दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला पुढील पाच वर्षासाठी दरवर्षी ५,००० डिझेल बस खरेदी करण्याची सरकारची योजना होती. परंतु, त्यात सुधारणा करून सध्या सुरू असलेल्या ८,००० डिझेल बसेसच्या पलीकडे, भविष्यातील सर्व बस इलेट्रिक असतील यावर भर दिला जाणार आहे.

Web Title: An alcohol test mandatory for msrtc st bus drivers conductors before going duty pune department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Alcohol
  • msrtc
  • pune news
  • st bus

संबंधित बातम्या

पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! मुख्य विसर्जन मिरवणुकीत दीडशे मंडळांना परवानगी नाकारली
1

पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! मुख्य विसर्जन मिरवणुकीत दीडशे मंडळांना परवानगी नाकारली

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका
2

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका

दर आठवड्याला मनपा अधिकारी उतरणार वॉर्डामध्ये; तक्रारी वाढल्यानंतर महापालिका आयुक्तांचे आदेश
3

दर आठवड्याला मनपा अधिकारी उतरणार वॉर्डामध्ये; तक्रारी वाढल्यानंतर महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
4

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.