Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

11th Admission: अकरावी प्रवेशाची विशेष गुणवत्ता यादी जाहीर! कॉलेज मिळालंय की नाही? त्वरित तपासा ‘हा’ पर्याय

ज्या विद्यार्थ्यांना या फेरीत कोणतेही कनिष्ठ महाविद्यालय मिळाले नाही, त्यांनी इयत्ता दहावीतील गुण आणि संबंधित महाविद्यालयांचे कट-ऑफ लक्षात घेऊन पुढील फेरीसाठी प्रवेश अर्जाच्या भाग-२ मध्ये नवीन पसंतीक्रम भरून अर्ज लॉक करावा व त्याची प्रत जतन करावी.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 03, 2026 | 05:24 PM
11th Admission: अकरावी प्रवेशाची विशेष गुणवत्ता यादी जाहीर! कॉलेज मिळालंय की नाही? त्वरित तपासा ‘हा’ पर्याय
Follow Us
Follow Us:
  • अकरावीच्या पहिल्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर
  • पुण्यातील २८ हजार २३४ विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे वाटप
  • दिनांक ३ ते ५ जुलैदरम्यान प्रवेश निश्चित करण्याची मुदत
11th Sudents Admissions Updates: अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिये अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विशेष फेरी क्रमांक १ ची गुणवत्ता यादी शुक्रवारी दि. ३ सकाळी १० वाजता जाहीर करण्यात आली. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे यांनी ही यादी प्रसिद्ध केली असून, विद्यार्थ्यांनी (Career) आपल्या लॉगिनमधील कॅप वाटप स्थिती या पर्यायावर जाऊन कोणते कनिष्ठ महाविद्यालय मिळाले आहे, याची खात्री करून प्रवेशाची पुढील कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाविद्यालयाचे वाटप झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगिनमधील दस्तऐवज अपलोड करा या पर्यायातून आवश्यक कागदपत्रे अपलोड करून प्रवेशासाठी पुढे जा या पर्यायाद्वारे प्रवेशास सहमती नोंदवावी. त्यानंतर संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात विहित मुदतीत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.

CA Foundation May 2026 Result OUT: सीए फाऊंडेशन मे परीक्षेचा निकाल, ICAI स्कोअरकार्ड कसे तपासाल

विद्यार्थ्यांनी इन-हाऊस, अल्पसंख्याक आणि केंद्रीय कोट्यांतून प्रवेश निश्चित करण्यासाठी ३ ते ५ जुलै हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आपल्या लॉगिनमध्ये जाऊन महाविद्यालयाचे वाटप तपासावे, असेही विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

ज्या विद्यार्थ्यांना या फेरीत कोणतेही कनिष्ठ महाविद्यालय मिळाले नाही, त्यांनी इयत्ता दहावीतील गुण आणि संबंधित महाविद्यालयांचे कट-ऑफ लक्षात घेऊन पुढील फेरीसाठी प्रवेश अर्जाच्या भाग-२ मध्ये नवीन पसंतीक्रम भरून अर्ज लॉक करावा व त्याची प्रत जतन करावी.

विशेष फेरीची आकडेवारी

-पात्र विद्यार्थी – ८९,६६३

-महाविद्यालयाचे वाटप झालेले विद्यार्थी – २८,२३४

-पहिल्या पसंतीचे महाविद्यालय – १६,८४२

-दुसऱ्या पसंतीचे महाविद्यालय – ५,७२७

-तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय – २,२००

CA Final Result: सीए फायनल परीक्षेचा निकाल ‘या’ तारखेला होणार जाहीर; ‘डिस्टिंक्शन’ मिळवण्यासाठी काय आहे नवीन नियम?

विद्यार्थी आकडेवारी

अभ्यसक्रम – वाटप केलेले विद्यार्थी

-कला – १५,९८८

-वाणिज्य – १८,४७१

-विज्ञान – ४३,००७

एकूण – ७७,४६६

सीए फाऊंडेशन मे परीक्षेचा निकाल

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने ३ जुलै रोजी सीए फाउंडेशन मे २०२६ परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेला बसलेले सर्व उमेदवार त्यांचा नोंदणी क्रमांक आणि रोल नंबर वापरून icai.org या अधिकृत वेबसाइटवर निकाल तपासू शकतात. ICAI ने गुणवत्ता यादी जाहीर करण्याबरोबरच सकाळी ११ वाजता निकाल पाहण्याची लिंक देखील सक्रिय करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करून त्यांचे गुण तपासणे सोपे जाईल. विद्यार्थी ICAI सीए फाउंडेशन मे २०२६ परीक्षेचे गुणपत्रक (स्कोरकार्ड) देखील डाउनलोड करू शकतात.

Web Title: Merit list for first special round class 11 admissions declared colleges allotted to 28234 students pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 05:21 PM

Topics:  

  • 11th Admission
  • Career News
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता
1

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता

‘पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर’ प्रकल्पाची ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली पाहणी
2

‘पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर’ प्रकल्पाची ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली पाहणी

Chess: पुण्यात रंगला बुद्धिबळाचा महासंग्राम! खुल्या गटात कोण जिंकले? विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव
3

Chess: पुण्यात रंगला बुद्धिबळाचा महासंग्राम! खुल्या गटात कोण जिंकले? विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव

पुण्यात आंतर महाविद्यालयीन शरीरसौष्ठवचा थरार; ऋषिकेश बेळमकर ठरला ‘नंदू मराठे श्री’ चा मानकरी
4

पुण्यात आंतर महाविद्यालयीन शरीरसौष्ठवचा थरार; ऋषिकेश बेळमकर ठरला ‘नंदू मराठे श्री’ चा मानकरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.