Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मायमर रुग्णालयात शिक्षिकेसह नवजात बाळाचा मृत्यू; उपचारातील हलगर्जीपणाच्या आरोपांनी खळबळ

मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील मायमर रुग्णालयात प्रसूतीदरम्यान एका ३८ वर्षीय शिक्षिकेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या नवजात बाळाचाही मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 21, 2026 | 06:12 PM
मायमर रुग्णालयात शिक्षिकेसह नवजात बाळाचा मृत्यू; उपचारातील हलगर्जीपणाच्या आरोपांनी खळबळ

मायमर रुग्णालयात शिक्षिकेसह नवजात बाळाचा मृत्यू; उपचारातील हलगर्जीपणाच्या आरोपांनी खळबळ

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील मायमर रुग्णालयात प्रसूतीदरम्यान एका ३८ वर्षीय शिक्षिकेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या नवजात बाळाचाही मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. उपचारादरम्यान शिकाऊ डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले, तसेच गंभीर परिस्थितीत आवश्यक वैद्यकीय सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत, असा आरोप मृत महिलेच्या नातेवाइकांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे.

रूपाली सोमनाथ इंदलकर (वय ३८, रा. कुसगाव, ता. मावळ) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रूपाली यांना मंगळवारी (दि. १८) दुपारी त्रास जाणवू लागल्याने मायमर रुग्णालयात आणण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर त्यांना सायंकाळी सुमारे पाच वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तातडीने प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. सायंकाळी सुमारे सहा वाजता प्रसूती करण्यात आली. मात्र, याचदरम्यान रूपाली इंदलकर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर नवजात बाळाची प्रकृतीही गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री सुमारे नऊ वाजता बाळाला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले.

या घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाइकांनी रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. गंभीर परिस्थिती असताना आवश्यक तज्ज्ञ डॉक्टरांची तत्काळ उपलब्धता होती का, उपचारांची प्रक्रिया योग्य पद्धतीने करण्यात आली का, तसेच रुग्णाला वेळेत आवश्यक सुविधा मिळाल्या का, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

कार्डियाक रुग्णवाहिकेऐवजी साध्या रुग्णवाहिकेचा वापर

नवजात बाळाला ससून रुग्णालयात हलविताना कार्डियाक सुविधायुक्त रुग्णवाहिकेऐवजी साध्या रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आल्याचा आरोपही नातेवाइकांनी केला आहे. गंभीर रुग्णाच्या स्थलांतरासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे, प्रशिक्षित कर्मचारी आणि इतर सुविधा रुग्णवाहिकेत उपलब्ध होत्या का, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गंभीर परिस्थितीत उपचार सुरू असताना शिकाऊ डॉक्टरांकडून उपचार करण्यात आल्याचा आरोपही नातेवाइकांनी केला आहे. आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर वेळेत उपलब्ध होते का, यासह उपचाराच्या संपूर्ण प्रक्रियेची वैद्यकीयदृष्ट्या तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : कान्हे येथे 105 ग्रॅम गांजा जप्त, 55 वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल; वडगाव मावळ पोलिसांची कारवाई 

आमदार शेळके यांची रुग्णालयास भेट

मावळचे आमदार सुनील शेळके यांनी बुधवारी मायमर रुग्णालयास भेट देऊन घटनेची माहिती घेतली. यापूर्वीही रुग्णालयात अशा स्वरूपाच्या चार ते पाच घटना घडल्याचा दावा करत या प्रकरणी आरोग्यमंत्र्यांकडे एसआयटी स्थापन करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पोलिसांना या घटनेचा तपास करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, उपचारातील नेमकी त्रुटी आणि मृत्यूचे कारण काय, हे शवविच्छेदन व वैद्यकीय तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे. नातेवाइकांनी केलेल्या आरोपांची स्वतंत्र चौकशी झाल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर येणार आहे.

Web Title: An incident has occurred at maimar hospital where a teacher and her newborn baby died

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 06:12 PM

Topics:  

  • Death
  • Hospital
  • maval news

संबंधित बातम्या

नाना पाटेकरांच्या अखेरच्या क्षणी नेमकं काय घडलं? पहाटे २.३० वाजता मेसेज, ४५ मिनिटे CPR अन्…
1

नाना पाटेकरांच्या अखेरच्या क्षणी नेमकं काय घडलं? पहाटे २.३० वाजता मेसेज, ४५ मिनिटे CPR अन्…

Nana Patekar Last Video: निधनाच्या दोन दिवस आधी गोव्यात स्टेजवर थिरकले नाना पाटेकर; शेवटचा VIDEO व्हायरल
2

Nana Patekar Last Video: निधनाच्या दोन दिवस आधी गोव्यात स्टेजवर थिरकले नाना पाटेकर; शेवटचा VIDEO व्हायरल

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..
3

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..

Nana Patekar: नाना पाटेकर यांच्या निधनानंतर २००८चं प्रकरण पुन्हा चर्चेत; जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं
4

Nana Patekar: नाना पाटेकर यांच्या निधनानंतर २००८चं प्रकरण पुन्हा चर्चेत; जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.