Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कलाकारांच्या स्वप्नांना आर्थिक फटका, नियमित उत्पन्नाचा अभाव; शहर सोडून गावी परतण्याची वेळ

गायन, नृत्य, नाटक, चित्रकला, फोटोग्राफी, डिझाइन आणि स्वतंत्र संगीत अशा विविध कलाक्षेत्रांत पूर्णवेळ करिअर करणाऱ्या तरुण-तरुणींसमोर सध्या आर्थिक अस्थिरतेचे मोठे संकट उभे ठाकले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 05, 2026 | 12:13 PM
कलाकारांच्या स्वप्नांना आर्थिक फटका, नियमित उत्पन्नाचा अभाव; शहर सोडून गावी परतण्याची वेळ

कलाकारांच्या स्वप्नांना आर्थिक फटका, नियमित उत्पन्नाचा अभाव; शहर सोडून गावी परतण्याची वेळ

Follow Us
Follow Us:

पुणे/गायत्री पवळे : गायन, नृत्य, नाटक, चित्रकला, फोटोग्राफी, डिझाइन आणि स्वतंत्र संगीत अशा विविध कलाक्षेत्रांत पूर्णवेळ करिअर करणाऱ्या तरुण-तरुणींसमोर सध्या आर्थिक अस्थिरतेचे मोठे संकट उभे ठाकले आहे. कला, सर्जनशीलता आणि लोकप्रियता असूनही या क्षेत्रात काम करणाऱ्यांना नियमित उत्पन्न मिळत नसल्याने उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनत आहे.

 

शहर सोडून गावी परतण्याची वेळ

विशेषतः फ्रीलान्स पद्धतीने काम करणाऱ्या कलाकारांचे उत्पन्न प्रकल्प, कार्यक्रम, ऑर्डर किंवा ग्राहकांवर अवलंबून असते. त्यामुळे एखाद्या महिन्यात चांगले काम मिळाले, तरी पुढील महिन्यात कामाची कमतरता भासते. चित्रकलेसारख्या क्षेत्रात कलेची प्रशंसा होत असली, तरी प्रत्यक्ष विक्री होत नसल्याने अनेक तरुणांना शहर सोडून गावी परतण्याची वेळ येत आहे. घरभाडे, प्रवास, उपकरणे, सराव, स्टुडिओ भाडे, सोशल मीडिया प्रमोशन, जाहिरात आणि दैनंदिन खर्च भागवताना कलाकारांना मोठी आर्थिक कसरत करावी लागते. अनेक कलाकारांकडून “कौतुक आणि प्रसिद्धी मिळते; पण आर्थिक स्थैर्य मिळत नाही,” अशी भावना व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा : शिक्षकांचा सुट्ट्यांचा बेत हुकला; उन्हाळ्यात करावं लागणार जनगणनेचं काम

ताण वाढत असून मानसिक थकवाही जाणवतो

सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज मिळूनही त्याचे उत्पन्नात रूपांतर होईलच, याची खात्री नसते. सतत नवीन आणि वेगळा आशय सादर करण्याचा ताण वाढत असून मानसिक थकवाही जाणवतो. रंगभूमी, शास्त्रीय कला, लोककला आणि चित्रकलेसारख्या क्षेत्रांत स्पर्धा वाढल्याने नवोदित कलाकारांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. काही कलाकारांना पार्ट-टाईम नोकरी, शिकवणी किंवा इतर कामे करून या क्षेत्रात टिकून राहावे लागत आहे. जाणकारांच्या मते, शासकीय अनुदान, आरोग्य व विमा सुरक्षा, नियमित सांस्कृतिक कार्यक्रम, डिजिटल उत्पन्नाबाबत मार्गदर्शन आणि स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास परिस्थितीत सुधारणा होऊ शकते.

“मी अनेक वर्ष पुण्यात राहून माझी कला जपण्याचा प्रयत्न केला; मात्र कलेतून पुरेसे मानधन मिळत नसल्याने शहरात राहणे परवडले नाही. कमी खर्चाच्या ठिकाणी राहूनही पुरेसा मोबदला मिळाला नाही. घरची जबाबदारी लक्षात घेऊन गावी जाण्याचा निर्णय घ्यावा लागला. माझ्यासारखे अनेक कलाकार संघर्ष करताना दिसतात. अस्तित्वात नसलेल्या कलाकारांच्या कलेला अधिक मानधन दिले जाते; मात्र सध्याच्या कलाकारांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे.” — अक्षय भंडारे, कलाकार

Web Title: Artists are in trouble as they are not getting regular income

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • cmomaharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

दुष्काळात ऊसाला हुमणीचा विळखा, शेतकऱ्यांची चिंता वाढली; उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता
1

दुष्काळात ऊसाला हुमणीचा विळखा, शेतकऱ्यांची चिंता वाढली; उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने
2

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने

Maharashtra Politics: ‘तुम्ही गैरसमजामध्ये राहू नका,भलत्या…’; MPSC आंदोलनस्थळावरून काय म्हणाले राज ठाकरे?
3

Maharashtra Politics: ‘तुम्ही गैरसमजामध्ये राहू नका,भलत्या…’; MPSC आंदोलनस्थळावरून काय म्हणाले राज ठाकरे?

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
4

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.