Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘धंगेकरांना केलेले घोटाळे वाचवण्यासाठी सत्तेची गरज, त्यांच्यामुळे पक्षाला…’; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची जहरी टीका

पक्षाचा झेंडा कधीही त्यांनी खांद्यावर घेतला नाही. हातात घेतला नाही. आमदार असताना जे काही त्यांनी आंदोलने केली ती व्यक्तिगत केली. त्याचा फॉलोअप पुढे केला नाही. याची सुद्धा तक्रार त्यावेळेला आम्ही प्रदेश काँग्रेसला केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 12, 2025 | 11:07 AM
'धंगेकरांना केलेले घोटाळे वाचवण्यासाठी सत्तेची गरज, त्यांच्यामुळे पक्षाला...'; काँग्रेसच्या 'या' नेत्याची जहरी टीका

'धंगेकरांना केलेले घोटाळे वाचवण्यासाठी सत्तेची गरज, त्यांच्यामुळे पक्षाला...'; काँग्रेसच्या 'या' नेत्याची जहरी टीका

Follow Us
Follow Us:

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. काँग्रेसबाबत कोणतीही नाराजी नाही, असे सांगत धंगेकरांनी ‘धनुष्यबाण’ हाती घेतला. आता या राजकीय घडामोडीनंतर पुण्यात काँग्रेस नेत्यांच्या नाराजीच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. धंगेकरांनी जे घोटाळे केलेत ते वाचवण्यासाठी त्यांना सत्तेची गरज आहे. म्हणून ते महायुतीत गेल्याची टीका शिंदे यांनी केली आहे. ते म्हणाले, ‘धंगेकर यांना आमदार होण्याची संधी दिली. त्यावेळेला पक्षाला किंवा या शहराला तुम्ही पक्षाच्या आमदारकीच्या माध्यमातून एकही योजना कधीही आणली नाही. म्हणून त्यांच्यावर जर बोलायला गेलो. तर अनेक गोष्टी बोलता येईल. पण खालच्या थराला उठून तुमचे राजकारण त्यांचे जे आहे. ते व्यावसायिक राजकारण आहे’.

तसेच आज त्यांना जे काही त्यांच्याकडे अडीअडचणी येतात. त्यांनी जे दुष्कर्म केले. ते वाचवण्यासाठी त्यांना सत्तेची गरज आहे, म्हणून ते गेलेले आहेत. काँग्रेस पक्ष त्यांना पूर्ण सन्मान दिला गेला, मान दिला गेला असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.

पोटनिवडणुकीत आमचा क्लेम होता तरी…

पोटनिवडणुकीत आमचा क्लेम होता तरी पक्षांनी धंगेकरांना उमेदावारी दिली. आम्ही त्यांचे काम केले. निवडून आले पक्षांनी त्यांना एक आमदार होण्याची संधी दिली. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेची उमेदवारी दिली. म्हणजे दोन ते तीन वर्षांमध्ये चार वेळा संधी दिली जे आत्तापर्यंत कोणालाही दिली नाही. निष्ठावंत कार्यकर्ते त्या भागातले असतील. मुक्तार शेख, कमलताई व्यवहारे असेल. अनेकांनी पक्षाला सांगितले की, त्यांची नीतिमत्ता आणि विचारधारा काँग्रेस पक्षाची जुळत नाही. तुम्ही त्यांना संधी देऊ नका. पहिले यांची परीक्षा होऊ द्या. पण पक्षाने त्यांना संधी दिली. ज्या दिवशी ते आमदार झाले त्याच्यानंतर किंवा २०१७ ला जरी नगरसेवक होऊन काँग्रेस बरोबर राहिले.

पक्षाचा झेंडा कधीही त्यांनी खांद्यावर घेतला नाही

पक्षाचा झेंडा कधीही त्यांनी खांद्यावर घेतला नाही. हातात घेतला नाही. आमदार असताना जे काही त्यांनी आंदोलने केली ती व्यक्तिगत केली. त्याचा फॉलोअप पुढे केला नाही. याची सुद्धा तक्रार त्यावेळेला आम्ही प्रदेश काँग्रेसला केली होती. जे आंदोलन ते करत आहेत. ते ससूनच्या पाटीलचे ड्रग्सचा विषय असो, पबच्या विरोधातला असो या कुठंही ह्याच्यामध्ये पक्षाचे आंदोलन नव्हते, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Arvind shinde criticized on ravindra dhangekar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 11:07 AM

Topics:  

  • Aarvind Shinde
  • Maharashtra Politics
  • Ravindra Dhangekar

संबंधित बातम्या

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
1

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
2

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Maharashtra Live Breaking News in Marathi:  काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन
3

Maharashtra Live Breaking News in Marathi: काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन

MLC Election 2026 : पुणे ते संभाजीनगर… पाचही जागांवर राजकीय आखाडा तापला; पाहा कोण कुठून लढणार!
4

MLC Election 2026 : पुणे ते संभाजीनगर… पाचही जागांवर राजकीय आखाडा तापला; पाहा कोण कुठून लढणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.