
dengue
महापालिका मुख्यालय परिसरात आरोग्य व वैद्यकीय विभागाच्या वतीने विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. मुख्य इमारतीसह आवारातील कूलर, शोभेच्या झाडांच्या कुंड्या, पाण्याच्या टाक्या, वाहनतळ, वापरात नसलेली भांडी आणि पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. ज्या ठिकाणी पाणी साचल्याचे आढळून आले, तेथील पाणी तत्काळ काढून टाकण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी केवळ औषधफवारणीवर अवलंबून न राहता पाणी साचणारी ठिकाणे नष्ट करणे, पाण्याचा निचरा करणे आणि गप्पी माशांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे.
बदलत्या हवामानासोबत डासांचेही ‘गणित’ बदलले! का साजरा करतात जागतिक डास दिन? जाणून घ्या सविस्तर
डेंग्यू-मलेरियाचा प्रतिबंध करण्यासाठी आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा डासांची उत्पत्तीस्थळे वेळीच नष्ट करणे अधिक प्रभावी ठरते. त्यामुळे महापालिका मुख्यालयासह शासकीय व सार्वजनिक आस्थापनांच्या परिसरात पाणी साचणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कूलर, कुंड्यांखालील ट्रे, पाण्याच्या टाक्या आणि अन्य पाणी साठवणाऱ्या ठिकाणांची नियमित स्वच्छता करण्यावर भर देण्यात येत आहे.
पुण्यात Dengue, चिकुनगुनियाचा विळखा घट्ट; ९२० हून अधिक संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ
महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. आरोग्य विभागाच्या पथकांनी महापालिका मुख्यालयातील विविध विभाग, कार्यालयीन परिसर, वाहनतळ तसेच आजूबाजूच्या भागाची पाहणी केली. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य व वैद्यकीय विभागाच्या वतीने प्रतिबंधात्मक मोहीम सुरू करण्यात आली असून, ही मोहीम पुढील किमान दीड महिना सुरू राहणार आहे.