Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रुग्णालय की मद्यालय? वायसीएमच्या शवविच्छेदन कक्षात मद्याच्या बाटल्या अन्…; व्हिडीओच्या दाव्याने खळबळ

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) शवविच्छेदन विभागात मद्यपार्टी झाल्याचा कथित प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 17, 2026 | 02:32 PM
रुग्णालय की मद्यालय? वायसीएमच्या शवविच्छेदन कक्षात मद्याच्या बाटल्या अन्...; व्हिडीओच्या दाव्याने खळबळ

रुग्णालय की मद्यालय? वायसीएमच्या शवविच्छेदन कक्षात मद्याच्या बाटल्या अन्...; व्हिडीओच्या दाव्याने खळबळ

Follow Us
Follow Us:
  • शवविच्छेदन विभागात मद्यपार्टी झाल्याचा कथित प्रकार
  • मद्याच्या बाटल्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचा दावा
  • रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
पिंपरी : मृत व्यक्तीला सन्मानाने अखेरचा निरोप मिळावा आणि दुःखाच्या प्रसंगी नातेवाइकांना संवेदनशीलतेने वागणूक मिळावी, अशी अपेक्षा असते. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) शवविच्छेदन विभागात मद्यपार्टी झाल्याचा कथित प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शवविच्छेदन कक्षात मद्याच्या बाटल्या, पेग, चकण्यासह जेवणाचे ताट आणि मद्यप्राशन केल्याचा संशय निर्माण करणाऱ्या व्यक्ती दिसत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याचा दावा केला जात आहे. या प्रकारामुळे रुग्णालयाच्या कारभारावर आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

 

नातेवाईक प्रतीक्षेत, आतमध्ये कथित मद्यपार्टी!

एका बाजूला मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी मृतांच्या नातेवाइकांना रात्रभर ताटकळत थांबावे लागत असल्याचा आरोप आहे. तर दुसरीकडे, याच विभागात मद्यपार्टी सुरू असल्याचे कथित चित्र समोर आल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मृतदेहांशी संबंधित कामकाज चालणारा शवविच्छेदन विभाग हा अत्यंत संवेदनशील परिसर असतो. अशा ठिकाणी मद्यपान किंवा पार्टीसारखा प्रकार घडला असल्यास तो केवळ शिस्तभंगाचा विषय राहत नाही, तर रुग्णालयातील कामकाज, सुरक्षितता आणि सार्वजनिक आरोग्य संस्थेच्या प्रतिष्ठेशी संबंधित गंभीर बाब ठरते.

तक्रारदारामुळे प्रकार उघडकीस आल्याचा दावा

मिळालेल्या माहितीनुसार, एका तक्रारदाराने संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता हा कथित प्रकार उघडकीस आल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी वैभव म्हस्के असल्याचा दावा सूत्रांकडून केला जात आहे. मात्र, संबंधित व्यक्तीची ओळख, घटनेची वेळ, नेमकी परिस्थिती आणि मद्यप्राशन झाले होते का, याची अधिकृत पडताळणी होणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवडकरांनो, पाणी जपून वापरा! १० टक्के पाणीकपातीला सुरुवात; अपव्यय केल्यास…; आयुक्तांनी दिला इशारा

महापालिका प्रशासन जबाबदारी निश्चित करणार का?

महापालिकेच्या रुग्णालयात अशा प्रकारच्या गंभीर आरोपांमुळे प्रशासनाने तातडीने दखल घेणे अपेक्षित आहे. संबंधित व्हिडीओची सत्यता तपासून, आवश्यक असल्यास सीसीटीव्ही फुटेज आणि ड्युटीवरील कर्मचाऱ्यांची माहिती पडताळून निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: वायसीएम रुग्णालयात कोणता कथित प्रकार समोर आला आहे?

    Ans: वायसीएम रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागात मद्यपार्टी झाल्याचा कथित प्रकार समोर आला आहे.

  • Que: व्हिडीओमध्ये काय दिसत असल्याचा दावा केला जात आहे?

    Ans: व्हिडीओमध्ये मद्याच्या बाटल्या, पेग, जेवणाचे ताट आणि मद्यप्राशन केल्याचा संशय निर्माण करणाऱ्या व्यक्ती दिसत असल्याचा दावा आहे.

  • Que: या प्रकारामुळे कोणते प्रश्न उपस्थित झाले आहेत?

    Ans: या कथित प्रकारामुळे रुग्णालयातील कामकाज, कर्मचाऱ्यांची जबाबदारी आणि शवविच्छेदन विभागातील शिस्त याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Web Title: Allegations are being made that a drinking party took place in the post mortem department of ycm hospital nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • Hospital News
  • Pimpri Chinchwad
  • Video Viral

संबंधित बातम्या

टोल कर्मचाऱ्याने कापू पाहिलं खोटं चलन, चालकाने धरला हात अन् चालू गाडीतच सपासप हाणलं कानशिलात; Video Viral
1

टोल कर्मचाऱ्याने कापू पाहिलं खोटं चलन, चालकाने धरला हात अन् चालू गाडीतच सपासप हाणलं कानशिलात; Video Viral

पिंपरी-चिंचवडकरांनो, पाणी जपून वापरा! १० टक्के पाणीकपातीला सुरुवात; अपव्यय केल्यास…; आयुक्तांनी दिला इशारा
2

पिंपरी-चिंचवडकरांनो, पाणी जपून वापरा! १० टक्के पाणीकपातीला सुरुवात; अपव्यय केल्यास…; आयुक्तांनी दिला इशारा

पिंपरी-चिंचवड महापालिकेची महासभा तहकूब; स्वीकृत सदस्यांची निवड आता २० नोव्हेंबरला?
3

पिंपरी-चिंचवड महापालिकेची महासभा तहकूब; स्वीकृत सदस्यांची निवड आता २० नोव्हेंबरला?

CA अवंतिका भट्टने कुत्र्याच्या भांड्यातून प्यायले पाणी; यूट्यूबर साैरव जोशीची पत्नी चर्चेत; Video Viral
4

CA अवंतिका भट्टने कुत्र्याच्या भांड्यातून प्यायले पाणी; यूट्यूबर साैरव जोशीची पत्नी चर्चेत; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.