
बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे कोट्यवधींची फसवणूक, आंतरराष्ट्रीय टोळीवर मकोका; डॉक्टरांसह सीए-इंजिनिअरचाही समावेश
सायबर पोलीस ठाण्यात एका ज्येष्ठ नागरिकाची बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे तब्बल ८६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल झाली होती. पोलिसांनी तांत्रिक तपास करत तपासादरम्यान गोठवलेली २८ लाख रुपयांची रक्कम न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादींना परत मिळवून दिली आहे. या गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी पुणे,लातूर, अहिल्यानगर,नवी मुंबईआणि हैदराबाद येथून उच्चशिक्षित तरुणांचा सहभाग असलेल्या सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये इंजिनिअर, सीए व बीएचएमएस अशा पदवीधरांचा समावेश असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
ही टोळी कंबोडिया येथील मुख्य सूत्रधाराच्या संपर्कात राहून सायबर गुन्हे करत होती. फसवणुकीची रक्कम युएसडीटी सारख्या आभासी चलनात (क्रिप्टोकरन्सी) वर्ग करून देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धोका निर्माण केला जात होता. या टोळीवर पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व गुजरातमध्येही खंडणी, दरोडा, अमली पदार्थ तस्करी व फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. या संघटित गुन्हेगारीचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी ‘मकोका’ कलमांचा समावेश करण्याचे आदेश दिले आहेत. सहायक पोलीस आयुक्त रोहिणी बनकर यांच्या नेतृत्वाखालील पथक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
तेजस ज्ञानोबा लोखंडे (वय २४ वर्षे, शिक्षण – १२ वी रा- मरकळगांव पुणे), अविनाश ज्ञानोबा बाकलिकर (वय २८ वर्षे, शिक्षण – बीएचएमएस रा. लातुर), हर्षल दिलीप बोरा (वय ३४ वर्षे, शिक्षण – बीबीए रा. अहिल्यानगर), सोनू हरिष शर्मा (वय २१ वर्षे, ९ वी पास रा. नवी मुंबई), ॲलेक ऊर्फ गौरव रमेश गाडगे (वय २४ वर्षे, शिक्षण – इंजिनियर रा. मुंबई), आखील श्रीनिवासराव नेल्लुरी (वय २४ वर्षे, शिक्षण – सीए रा. हैद्राबाद, तेलंगणा) या टोळीवर कारवाई करण्यात आलेली आहे.
Ans: शेअर मार्केटमध्ये जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली.
Ans: पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सायबर टोळीतील ९ आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई केली.
Ans: या टोळीतील आरोपींमध्ये डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट (सीए) आणि इंजिनिअर यांसारख्या उच्चशिक्षित व्यक्तींचा समावेश आहे.