Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMP चा उधळपट्टीविरोधात ‘सर्जिकल स्ट्राइक’! अनावश्यक खरेदीवर बंदी अन् २४ तासांत…

यापूर्वी गरज नसतानाही स्पेअर पार्टची खरेदी होत असल्याने अनेक साहित्य गोदामात पडून राहत होते. त्यामुळे महामंडळावर अनावश्यक आर्थिक भार पडत होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 28, 2026 | 09:18 PM
PMP चा उधळपट्टीविरोधात ‘सर्जिकल स्ट्राइक’! अनावश्यक खरेदीवर बंदी अन् २४ तासांत…
Follow Us
Follow Us:
  • पीएमपीचा लावणार खर्चावर लगाम
  • अनावश्यक स्पेअर पार्ट खरेदीला बंदी
  • २४ तासांत बस बिघाडाचा अहवाल बंधनकारक
पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) आर्थिक शिस्तीला बळकटी देण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.संचालनातील तूट कमी करण्यासाठी अनावश्यक स्पेअर पार्ट खरेदीला बंदी घालण्यात आली असून,बस बिघाडानंतर संबंधित डेपोने २४ तासांच्या आत कारणमीमांसा अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.त्या अहवालाच्या आधारेच आवश्यक स्पेअर पार्टची खरेदी केली जाणार असल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी ‘नवराष्ट्र’शी बोलताना दिली.

यापूर्वी गरज नसतानाही स्पेअर पार्टची खरेदी होत असल्याने अनेक साहित्य गोदामात पडून राहत होते. त्यामुळे महामंडळावर अनावश्यक आर्थिक भार पडत होता. नव्या निर्णयामुळे केवळ आवश्यक तेवढ्याच साहित्याची खरेदी होणार असून खर्चात मोठी बचत होण्याची अपेक्षा आहे.

भीषण! PMP मध्ये मनुष्यबळाचा ‘दुष्काळ’; सुधारणा, बदल करायचा तरी कसा? वाचा सविस्तर

याशिवाय ज्या बसमार्गांवर प्रवाशांची संख्या कमी आहे,अशा मार्गांचा सध्या सविस्तर अभ्यास सुरू आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कमी प्रवासी असलेल्या मार्गांवरील बसगाड्या प्रवाशांची संख्या अधिक असलेल्या मार्गांवर वळविण्यात येणार आहेत.त्यामुळे बससेवा अधिक परिणामकारक होण्याबरोबरच उत्पन्नातही वाढ होईल.सध्या पीएमपीला तिकीट व पास विक्रीतून दरवर्षी सुमारे ७२० कोटी रुपये उत्पन्न मिळते.हे उत्पन्न वाढवून ८०० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

पर्यटकांसाठी खुशखबर! आजपासून सुरू होणार पुणे व पिंपरी-चिंचवड दर्शन बस सेवा, वाचा सविस्तर…

पीएमपीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रत्येक खर्चावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. स्पेअर पार्ट खरेदीची नवी पद्धत,तसेच प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन बसमार्गांचे पुनर्नियोजन या माध्यमातून खर्चात बचत आणि उत्पन्नात वाढ साध्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

– महेश आव्हाड,

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,पीएमपी

हजारो कामगारांची समस्या दूर

चाकण एमआयडीसी औद्योगिक वसाहतीच्या फेज-२ परिसरातील हजारो कामगार, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीच्या अपुऱ्या सुविधेमुळे दररोज मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असल्याने आर्थिक भार वाढत होता, तर अनेकांना वेळेवर कामावर व शैक्षणिक संस्थांमध्ये पोहोचणेही कठीण होत होते. या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल)ने चाकण एमआयडीसी फेज-२ साठी नवीन सार्वजनिक बससेवा सुरू करून मोठा दिलासा दिला आहे. 

Web Title: Ban on purchasing unnecessary spare parts to cut pmp costs said by mahesh avhad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 09:18 PM

Topics:  

  • PMPML
  • pune news
  • Pune PMP Bus

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘आई तुझा उत्साह योग्य, पण…’ पुण्यात बाळाला कडेवर घेऊन महिलेचे ढोल वादन; नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल
1

VIDEO VIRAL: ‘आई तुझा उत्साह योग्य, पण…’ पुण्यात बाळाला कडेवर घेऊन महिलेचे ढोल वादन; नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल

सुनील पांडे यांची संकल्पना; विसर्जन घाटावरील गणेशोत्सव सांस्कृतिक चित्राचे मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन
2

सुनील पांडे यांची संकल्पना; विसर्जन घाटावरील गणेशोत्सव सांस्कृतिक चित्राचे मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन

२१ हजार पाणीपुरींपासून साकारला १३ फूटी गणपती बाप्पा; पुण्यातील गणेश भेळचा अनोखा उपक्रम
3

२१ हजार पाणीपुरींपासून साकारला १३ फूटी गणपती बाप्पा; पुण्यातील गणेश भेळचा अनोखा उपक्रम

‘विद्येच्या माहेरघरा’ची नवी ओळख, पुणे बनतेय अभियंत्यांचे शहर; शिक्षणनगरीपासून तंत्रज्ञाननगरीपर्यंतचा प्रवास
4

‘विद्येच्या माहेरघरा’ची नवी ओळख, पुणे बनतेय अभियंत्यांचे शहर; शिक्षणनगरीपासून तंत्रज्ञाननगरीपर्यंतचा प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.