सौजन्य - नवराष्ट्र टीम
नगरसेवक सुनील पांडे, रवींद्र साळेगावकर, निवेदिता एकबोटे आणि पूजा जागडे यांनी एफसी रोडवरील परिस्थितीचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. या परिसरातील पदपथांवर अनधिकृत विक्रेते आणि व्यावसायिकांकडून वारंवार अतिक्रमण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. कारवाई केल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण होत असल्याने महापालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
दरम्यान, एफसी रोड परिसरात महिलांच्या परवानगीशिवाय त्यांचे व्हिडिओ काढले जात असल्याच्या तक्रारीही नगरसेवकांनी मांडल्या. त्यामुळे केवळ अतिक्रमणाचा प्रश्न न राहता नागरिकांच्या, विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही गंभीर बनला असल्याचे त्यांनी सांगितले. काही महापालिका अधिकारी विक्रेत्यांकडून हप्ते घेत असल्याचा गंभीर आरोपही नगरसेवकांनी केला. तसेच कारवाईदरम्यान जप्त केलेला माल दंड न आकारता पुन्हा संबंधित विक्रेत्यांना परत दिला जात असल्याचेही त्यांनी सभागृहात सांगितले. त्यामुळे अतिक्रमणाविरोधातील कारवाई प्रभावी होत नसल्याचा आरोप करण्यात आला.
भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनीही या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. एफसी रोडवरील अतिक्रमण कायमस्वरूपी हटविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी अतिक्रमणाविरोधात आठवडाभरात कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे आता प्रशासनाकडून प्रत्यक्षात कोणती कारवाई केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Ans: भाजपचे नगरसेवक सुनील पांडे, रवींद्र साळेगावकर, निवेदिता एकबोटे आणि पूजा जागडे यांनी पुणे महापालिकेच्या सभागृहात एफसी रोडवरील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला.
Ans: काही अधिकारी विक्रेत्यांकडून हप्ते घेत असल्याचा आणि जप्त केलेला माल दंड न आकारता पुन्हा विक्रेत्यांना परत दिला जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.
Ans: महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी वारंवार होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी आठवडाभरात कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.






