चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर घणाघात (फोटो - इन्स्टाग्राम)
चित्रा वाघ यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत रोहित पवार यांच्या आरोपांवर उत्तर दिले आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, रोहित पवार, डोकं ठिकाणावर आहे का? पवार आडनाव बाजूला केलं तर तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वावर तुमची ओळख काय आहे? जर आमच्या नेत्यांवर असे बिनबुडाचे आरोप केले तर खबरदार…घरातील राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर चिखलफेक करावी का?
पुढे त्या म्हणाल्या,”विमानाचे पायलट आणि क्रू हे नेत्यांबरोबर फोटो काढतात, ही तर फार सामान्य गोष्ट आहे. स्वतः रोहित पवारांनी VSRच्या विमानातून प्रवास केल्याचे फोटो आणि व्हिडीओ आहेत. केवळ त्या आधारावर अजित पवारांचा अपघात रोहित पवारांनीच घडवून आणला, असं आम्ही म्हणू का? तुमच्या पक्षात तुम्हाला कोणी विचारत नाही, हे माहीत आहे आम्हाला. म्हणून मुख्यमंत्र्यांच्या एका फोटोवरून संशयाची राळ का उठवायची? तसेच संशय म्हणजे पुरावा नव्हे आणि सणसणाटी म्हणजे सत्य नसते.”
पुढे त्या म्हणाल्या, “अजित पवारांच्या अपघाताचा निष्पक्ष तपास सुरू आहे आणि आम्हा सर्वांना त्या घटनेचे दुःख आहे. पण त्याचं राजकीय भांडवल नको आहे. एकीकडे विकासपुरूष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगतीकडे वाटचाल करतोय आणि दुसरीकडे त्यांच्यावर पुराव्यांशिवाय आरोप करणं हा राजकीय बेजबाबदारपणा आहे.”
पुढे चित्रा वाघ यांनी रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या, “आडनाव हे वारशाने मिळतं, कर्तृत्वाने नाही. पुरावे असतील तर मांडा. नाहीतर आरोपांच्या आडून तुमचं सुरू असलेलं नीच राजकारण तात्काळ थांबवा. ही तुम्ही सूरू केलेली राजकीय चिखलफेक महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. प्रत्येक आरोपाला तथ्यांच्या आणि लोकशाहीच्या चौकटीत करारा जबाब दिला जाईल. महायुतीवरील आमच्या सर्वोच्च नेतृत्वावरील आरोपांबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्यांचा पक्ष ठाम भूमिका मांडतील , याचा मला विश्वास आहे.”
Ans: रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातामागे घातपात असण्याचा संशय व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आरोप केले.
Ans: चित्रा वाघ यांनी रोहित पवारांवर संताप व्यक्त करत, “डोकं ठिकाणावर आहे का?” असा सवाल केला. पुरावे नसताना मुख्यमंत्र्यांवर आरोप करणे हा राजकीय बेजबाबदारपणा असल्याचे त्यांनी म्हटले.
Ans: अजित पवारांच्या विमान अपघाताचा निष्पक्ष तपास सुरू असून, घटनेचे राजकीय भांडवल करू नये, असे चित्रा वाघ यांनी म्हटले.






