Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महापौर पदासाठी हालचालींना वेग; पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपमधील अंतर्गत राजकारण तापले

पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपच्या ८४ नगरसेवकांपैकी कोणीही महापौर होऊ शकतो आणि याच शक्यतेमुळे पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 24, 2026 | 02:40 PM
भाजप आता नवीन 'राजकीय रणनीती' आखणार

भाजप आता नवीन 'राजकीय रणनीती' आखणार

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भाजपने तब्बल ८४ नगरसेवक निवडून आणत एकहाती निर्विवाद सत्ता प्रस्थापित केली आहे. विरोधकांना नाममात्र जागांवर रोखत भाजपने शहराच्या सत्तेची सूत्रे पूर्णतः आपल्या हातात घेतली असली, तरी आता खरी लढाई महापौरपदासाठी सुरू झाली आहे. यंदा सर्वसाधारण महापौर आरक्षण असल्याने भाजपच्या ८४ नगरसेवकांपैकी कोणीही महापौर होऊ शकतो आणि याच शक्यतेमुळे पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे.

 

निवडणूक निकालानंतर अवघ्या काही दिवसांत इच्छुक नगरसेवकांची वरिष्ठ नेत्यांकडे रांग, थेट भेटी, सततची फोनफोनी, लॉबिंग आणि शिफारसींचे सत्र सुरू झाले आहे. “आमच्याच गटाला संधी द्या”, “आमचा उमेदवार अधिक सक्षम”, “प्रादेशिक समतोल हवा”, अशा विविध मुद्द्यांवरून पक्षनेतृत्वावर दबाव वाढत आहे. सत्तेचा मोठा आकडा हातात असतानाही महापौरपदाचा निर्णय सोपा राहिलेला नाही, हे स्पष्ट दिसते.

महापौर चिंचवड, भोसरी की पिंपरी विधानसभा मतदारसंघातून? हा प्रश्न सध्या केंद्रस्थानी आहे. शहरातील राजकीय समतोल, आगामी विधानसभा तयारी आणि स्थानिक नेतृत्वाचा प्रभाव, या तिन्ही बाबी लक्षात घेऊन अंतिम निर्णय होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे तीनही विधानसभा मतदारसंघांतील नेते आपापल्या पातळीवर ताकद आजमावत आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे आणि आमदार उमा खापरे या चारही नेत्यांच्या भूमिकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोणाच्या समर्थकाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार, यावरच पुढील शहरकारभाराची दिशा ठरणार आहे.

प्रत्येक आमदार आपल्या-आपल्या गटासाठी वजन टाकत असल्याची चर्चा उघडपणे सुरू आहे. भाजपच्या विजयामागे संघटनात्मक ताकद, केंद्र व राज्यातील सत्ता आणि स्थानिक पातळीवरील कामगिरी कारणीभूत ठरली असली, तरी अंतर्गत स्पर्धा आणि गटबाजी पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे नेतृत्वाने कठोर पण संतुलित निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. शहरातील विकासकामे, पाणीपुरवठा, वाहतूक, आरोग्य आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणारा, प्रशासकीय अनुभव असलेला आणि पक्षशिस्त पाळणारा चेहरा महापौरपदी हवा, ही मागणी आता जोर धरू लागली आहे.

आकड्यांची ताकद दाखवण्यापेक्षा क्षमता आणि विश्वासार्हता यांना प्राधान्य दिले जाणार का, हा खरा कस आहे. एकंदरीत, ८४ नगरसेवकांची सत्ता मिळवूनही भाजपसमोरचा महापौरपदाचा पेच निर्माण झालेला आहे. निर्णय कोणाच्या बाजूने झुकतो, आणि कोणत्या विधानसभा मतदारसंघाला मान मिळतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवड महापालिकेत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे 29 नगरसेवक! भाजपचे 14 तर राष्ट्रवादीचे अन् शिवसेनेचे…

Web Title: Bjp has achieved great success in the pimpri chinchwad municipal corporation elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • BJP
  • mahesh landge
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची मध्यरात्री गुप्त भेट? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं
1

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची मध्यरात्री गुप्त भेट? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं

पुणे महापालिकेतील सभागृहाच्या कामकाजावरून विरोधक आक्रमक; सर्वसाधारण सभेत नेमकं काय घडलं?
2

पुणे महापालिकेतील सभागृहाच्या कामकाजावरून विरोधक आक्रमक; सर्वसाधारण सभेत नेमकं काय घडलं?

Anna Hazare Statement: ‘आप’मधील बंडावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “स्वार्थ आला की माणसं तुटतात, दोष संघटनेचाच”
3

Anna Hazare Statement: ‘आप’मधील बंडावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “स्वार्थ आला की माणसं तुटतात, दोष संघटनेचाच”

AAP’s Raghav Chadha Joins BJP: केजरीवालांना मोठा झटका! राघव चढ्ढा यांच्यासह आपचे तीन राज्यसभा खासदार भाजपमध्ये सामील; पाहा फोटो
4

AAP’s Raghav Chadha Joins BJP: केजरीवालांना मोठा झटका! राघव चढ्ढा यांच्यासह आपचे तीन राज्यसभा खासदार भाजपमध्ये सामील; पाहा फोटो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.