Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“… तो इतर पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे नसावा”; BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विधान

सामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी एक लाख सहा हजार बूथ मध्ये ५१ टक्के संघटन वाढवणे आपले लक्ष्य आहे. भाजपचा कार्यकर्ता सक्रीय असणे गरजेचे आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 07, 2026 | 09:46 PM
“… तो इतर पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे नसावा”; BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विधान
Follow Us
Follow Us:

भाजपचे राज्यात अडीच लाख सदस्य कार्यरत 
डिजिटल प्लॅटफॉर्मवर कार्यकर्त्यांनी सक्रिय राहणे आवश्यक – चव्हाण 
फेक नरेटीव्हमुळे लोकसभा निवडणुकीत मोठे नुकसान – चव्हाण

पुणे: राज्यात पक्षाचे आज दीड कोटी सदस्य आणि अडीच लाख सक्रिय सदस्य कार्यरत आहे. विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी पुढील वर्षभराचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. फेक नरेटिव्हमुळे भाजपचे सन २०२४ लोकसभा निवडणुकीत प्रचंड नुकसान झाले. वाऱ्यासारखा हा फेक नरेटिव्ह पसरला. त्यामुळे पुन्हा असा प्रकार घडू नये याकरिता डिजिटल प्लॅटफॉर्मवर कार्यकर्त्यांनी आता सक्रियपणे कार्यरत राहिले पाहिजे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी येथे व्यक्त केले.

भारतीय जनता पार्टी ४६ वा वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे सक्रिय कार्यकर्ता संमेलन आयोजित केले होते. भाजपचे राष्ट्रीय सह-संघटन मंत्री शिव प्रकाश यांनी “राष्ट्र के विकास में भाजपा की भूमिका” या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, राज्य सरचिटणीस राजेश पांडे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, महापालिका सभागृहनेते गणेश बिडकर आदी उपस्थित होते.

डोंबिवली पश्चिमेलाही नव्याने होणार दुय्यम निबंधक कार्यालय, आमदार रवींद्र चव्हाण यांचा पाठपुरावा

सामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी एक लाख सहा हजार बूथ मध्ये ५१ टक्के संघटन वाढवणे आपले लक्ष्य आहे. भाजपचा कार्यकर्ता सक्रीय असणे गरजेचे आहे. देशात आणि राज्यात विविध निवडणूक मध्ये भाजपला घवघवीत यश प्राप्त झाले आहे. लोकप्रतिनिधी यांनी देखील समाजात वावरत असताना सामान्य लोकांसाठी काय करू शकतो याचा विचार करावा. पक्षाच्या वेगवेगळ्या कार्यक्रम माध्यमातून पक्षाची विचारधारा अधिक प्रमाणात रुजत असते त्यामुळे त्याला कार्यकर्त्यांनी प्राधान्य द्यावे, असेही चव्हाण यांनी नमूद केले.

चव्हाण म्हणाले की, पुणे शहराची देशात एक वेगळी ओळख असून ती पुढे प्रभावीपणे नेणे आपले काम आहे. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता कोणत्या दिशेने भविष्यकाळात वाटचाल करणारा हे सांगण्याचे काम माझे आहे. भाजप पक्षाचा कार्यकर्ता शिस्तप्रिय असावा तो इतर पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे असू नये. पक्षाची स्थापना आणि मूळ गाभा व विचारधारा यांच्याशी कार्यकर्ता समर्पित असावा. राष्ट्रीय विचारधारा ही आपली मूळ विचारधारा आहे. भाजपची मागील ४६ वर्ष ही समर्पणाची आहे.अनेक जणांनी अपार कष्ट करून सामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी त्याग केला आहे. देशाला परम वैभव प्राप्त झाले पाहिजे त्यादिशेने नेण्याची जबाबदारी ही केवळ भाजपची आहे. देशात अनेक पक्ष आहे त्याच्याबाबत बोलणे उचित नाही. त्यांचा अजेंडा हा वेगवेगळा आहे.

Maharashtra Bhavan Mauritius : सातासमुद्रापार मराठी संस्कृतीचा सन्मान; ८ कोटींच्या निधीतून मॉरिशसमध्ये महाराष्ट्र भवन विस्तार

धीरज घाटे म्हणाले, भाजपचे काम पुण्यात झपाट्याने वाढत गेले आहे आणि विविध निवडणुकीत चांगल्या प्रकारे यश पक्षाला मिळाले आहे. कार्यकर्त्यांचे संघटन आणि तळागाळात पोहचलेले पक्षाचे विचार यामुळे पक्षाला अपेक्षित यश मिळत आहे. कार्यकर्ता विचारधारा आधारे काम करतो. सामान्य पुणेकर यांना डोळ्यासमोर ठेवून काम आपल्याला करायचे आहे. माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते भाजपमध्ये काम करत आहे. बूथ यंत्रणेच्या माध्यमातून भाजपचे संघटन मजबूत करत आहेत. या कार्यकर्त्यांमधूनच अनेक नेते तयार झाले आहेत. अनेकांनी पुणे शहर, राज्याचे देशाचे नेतृत्व केले आहे, करत आहेत. अण्णा जोशी, गिरीश बापट, विश्वास गांगुर्डे, विकास मठकरी आदी पक्ष वाढीसाठी, संघटन करण्यासाठी मोठे काम केले आहे.

Web Title: Bjp maharashtra president ravindra chvhan appel to workers pune maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Politics
  • Ravindra Chavan

संबंधित बातम्या

Police Arrest MNS Workers: प्राचार्यांच्या केबिनमध्ये राडा, घोषणाबाजी; अमित ठाकरेंसह २०-२५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक
1

Police Arrest MNS Workers: प्राचार्यांच्या केबिनमध्ये राडा, घोषणाबाजी; अमित ठाकरेंसह २०-२५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी
2

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी

Maharashtra Breaking News Today 2026: नेपाळमधील महापूर, मराठा आरक्षण आणि शेअर बाजारातील अस्थिरता
3

Maharashtra Breaking News Today 2026: नेपाळमधील महापूर, मराठा आरक्षण आणि शेअर बाजारातील अस्थिरता

फलकावरून वाद, बुलढाण्यात राजकीय संघर्षाची ठिणगी; भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
4

फलकावरून वाद, बुलढाण्यात राजकीय संघर्षाची ठिणगी; भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.