
लढाई संपली आता सर्वजण एकत्र येऊ; नगरसेवक सनी निम्हण यांनी घेतली विरोधकांची भेट
सनी निम्हण म्हणाले, निवडणूका येतात जातात. निवडणुकीची लढाई ही व्यक्तीशी नसून, विचारांची लढाई असते असे मी मानतो. हाच विचार पुढे नेत निवडणुकीच्या धामधुमीनंतर प्रकाश ढोरे यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी विनायक रणपिसे उपस्थित होते.
येत्या काळात औंध बोपोडी परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी विचारांची देवाणघेवाण झाली. या परिसराविषयी त्यांचा ध्यास आणि कार्य पाहता पुढील काळात औंध बोपोडीच्या विकासासाठी त्यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे. शेवटी वैचारिक भूमिका जरी वेगळी असली तरी औंध बोपीडीच्या विकासासाठी आपण सर्व मतभेद बाजूला ठेऊन एकत्र यायला पाहिजे, असे मानणारा मी एक कार्यकर्ता आहे. सगळ्यांना सोबत घेऊन सर्वांच्या सहभागातून विकास ही स्वर्गीय कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण यांची शिकवण अशाच संस्कारांची नित्य प्रेरणा देत असते असेही सनी निम्हण यांनी नमूद केले.
हे सुद्धा वाचा : राष्ट्रवादीला मोठा धक्का; माजी आमदाराचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश
पुण्यात भाजपने शतक ठाेकले
पुणे महापालिका निवडणुकीत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या भाजपने पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळविली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसला धाेबीपछाड करीत ‘मुरलीधर’ हेच आता पुण्याचे ‘धुरंदर’ ठरले आहेत. निवडणुकीचे निकाल पाहता राष्ट्रवादी काॅंग्रेसने आपल्या जागा कायम ठेवण्यात यश मिळविले असले तरी काॅंग्रेसची कामगिरी सुधारली. तर मनसे आणि दाेन्ही शिवसेनेचे नुकसान झाल्याचे स्पष्ट हाेत आहे. एक हाती सत्ता आल्यामुळे भाजपच्या गाेटात जल्लाेषाचे वातावरण निर्माण झाले. निकाल जाहीर हाेताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी मतमाेजणी केंद्राबाहेरच गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतषबाजी केली. काही विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी हलकीच्या तालावर ठेका धरत नाचून आनंद व्यक्त केला.