Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMC Election 2026 : बोटावरची शाई पुसण्यासाठी केमिकल घेऊन व्यक्ती केंद्राबाहेरच उभा..! पुण्यातील धायरीमध्ये धक्कादायक प्रकार

PMC Election 2025 : मतदान केंद्राबाहेर व्यक्ती बोटावरची शाई पुसण्यासाठी केमिकल घेऊन असल्याचे दिसून आले आहे. आता धायरीमधील प्रकार उघडकीस आला आहे. मतदारांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा आरोप केला जात आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 15, 2026 | 01:31 PM
Chemical used to wipe off the ink from the voter's finger in Dhayari PMC Election 2026

Chemical used to wipe off the ink from the voter's finger in Dhayari PMC Election 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • मतदारांच्या हातावरील शाई सहज जातीये पुसल्या
  • धायरीमध्ये केमिकल घेऊन व्यक्ती उभा
  • राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आक्रमक
PMC Election 2026 : पुणे : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Maharashtra Local Body Elections) रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहेत. पुण्यामध्ये (PMC Election 2026) देखील मतदान होत असून पुणेकरांनी मोठ्या उत्साहाने मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला आहे. सकाळपासून मतदारांची बुथबाहेर गर्दी झाली आहे. मात्र आता धायरीमधील प्रकार उघडकीस आला आहे. मतदारांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा आरोप केला जात आहे.

पुणे महापालिका निवडणुकीसाठी 9 वर्षांनी निवडणूक होत आहे. त्यामुळे मतदार मोठ्या उत्साहाने मतदान करत आहेत. मात्र पुण्यातील धायरी भागामध्ये मोठी धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील धायरी येथे मतदारांसाठी वापरण्यात येणारी शाई ही पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. धायरीमधील येथील प्रभाग 34 येथील शाळा नारायणराव सणस विद्यालय येथे मतदानाची शाई पुसत असल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मतदारांच्या बोटाला लावणाी शाई सहज पुसली जात असल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकाला बेदम चोप दिला.

हे देखील वाचा : मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाण्यावरुन वाद; पिंपरी चिंचवडमधील मतदार केंद्रावरील प्रकार

शाई सहज पुसली जात असल्यामुळे दुबार मतदानाचा प्रकार घडण्याची शक्यता असते. यामुळे मतदानासाठी वेगळ्या प्रकारची शाई वापरली जाते. मात्र पुण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांकडून सहजपणे मार्कर वापरला जात आहे. तसेच पुसली जाईल अशी शाई वापरली जात आहे. यामुळे राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने सांगितले की, मतदान केंद्राजवळच संबंधित एक व्यक्ती हाताला लावणारी शाई समोर पुसत होता. समोरासमोर तो व्यक्ती शाई पुसत होता. मी त्याला पकडत असताना काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमचा आहे आमचा आहे म्हणून त्याला सोडवायला येत होते, असा दावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला.

हे देखील वाचा : लोकशाहीचा कणा कमकुवत; मतदानाच्या दिवशीच EVM बंद पडल्याने संशय

निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने संबंधित व्यक्तीकडे मतदानाची शाई पुसण्यासाठी केमिकल असल्याचे देखील सांगितले आहे. तसेच अशा प्रकारामुळे दुबार मतदान होण्याची शक्यता असते. तसेच ही शाई पुसण्याची गरज तरी काय? असा प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने विचारला आहे. तसेच याबाबत पोलीस आणि निवडणूक आयोगामध्ये तक्रार दाखल करणार असल्याचे देखील सांगितले आहे.

मतदान केंद्रे बंद पडल्याचा प्रकार

पुण्यातील प्रभाग २६ अंतर्गत स्वारगेट पोलिस लाईन, सेंट हिल्डाज स्कूलमधील दोन मतदान केंद्रे, सावित्रीबाई फुले स्मारक, घोरपडे पेठ उद्यान वसंतदादा अभ्यासिका आणि महात्मा गांधी उर्दू शाळा या ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या. सकाळच्या वेळेत मतदानासाठी मोठ्या संख्येने मतदार रांगेत उभे असताना यंत्रे अचानक ठप्प झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. काही मतदारांनी अर्ध्या तासाहून अधिक वेळ प्रतीक्षा केल्याचे सांगितले, तर काहींनी नाराजी व्यक्त करत मतदान केंद्र सोडल्याचीही चर्चा आहे.

Web Title: Chemical used to wipe off the ink from the voters finger in dhayari pmc election 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 12:56 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections
  • PMC Election 2026

संबंधित बातम्या

TMC Election 2026: टिटवाळ्यात EVM वर उमेदवाराचे भलतेच नाव! मतदारांमध्ये गोधळ, नेमकं घडलं काय? जाणून घ्या
1

TMC Election 2026: टिटवाळ्यात EVM वर उमेदवाराचे भलतेच नाव! मतदारांमध्ये गोधळ, नेमकं घडलं काय? जाणून घ्या

PMC Election 2026: ‘लोकशाही’च्या बळकटीसाठी पुणेकरांची मतदान केंद्रावर गर्दी; पण पार्किंगपाशी अडलं घोडं…
2

PMC Election 2026: ‘लोकशाही’च्या बळकटीसाठी पुणेकरांची मतदान केंद्रावर गर्दी; पण पार्किंगपाशी अडलं घोडं…

Nashik Election 2026 : केलं एक घडलं भलतंच! EVM वर बटण दाबलं धनुष्याचं, लाईट पेटला कमळाचा; नाशिकमध्ये राजकीय वर्तुळात खळबळ
3

Nashik Election 2026 : केलं एक घडलं भलतंच! EVM वर बटण दाबलं धनुष्याचं, लाईट पेटला कमळाचा; नाशिकमध्ये राजकीय वर्तुळात खळबळ

Solapur Municipal Elections : 102 जागांसाठी 564 उमेदवार रिंगणात; मतदान केंद्र परिसरात पोलिसांचा मोेठा बंदोबस्त
4

Solapur Municipal Elections : 102 जागांसाठी 564 उमेदवार रिंगणात; मतदान केंद्र परिसरात पोलिसांचा मोेठा बंदोबस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.