Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाकणमध्ये भारत गॅस एजन्सीमोर गोंधळ; सिलिंडरचे दर वाढल्यामुळे नागरिक संतापले

चाकण शहरातील नाशिक हायवेवरील सिंघमा भारत गॅस एजन्सीसमोर गुरुवारी मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. ग्राहकांना रस्त्यावर लांबच लांब रांगेत उभे राहून गॅस सिलिंडरची प्रतीक्षा करावी लागली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 12, 2026 | 04:57 PM
चाकणमध्ये भारत गॅस एजन्सीमोर गोंधळ; सिलिंडरचे दर वाढल्यामुळे नागरिक संतापले

चाकणमध्ये भारत गॅस एजन्सीमोर गोंधळ; सिलिंडरचे दर वाढल्यामुळे नागरिक संतापले

Follow Us
Follow Us:
  • चाकणमध्ये भारत गॅस एजन्सीमोर गोंधळ
  • सिलिंडरचे दर वाढल्यामुळे नागरिक संतापले
  • प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी
चाकण : चाकण शहरातील नाशिक हायवेवरील सिंघमा भारत गॅस एजन्सीसमोर गुरुवारी मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. घरपोच गॅस वितरण सेवा बंद असल्याने सुमारे ५०० हून अधिक ग्राहकांना रस्त्यावर लांबच लांब रांगेत उभे राहून गॅस सिलिंडरची प्रतीक्षा करावी लागली. दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या कडक उन्हात महिला-पुरुष ग्राहक सिलिंडरसाठी थांबलेले दिसून आले.

 

ग्राहकांच्या मते, यापूर्वी घरगुती गॅस सिलिंडर ८५५ रुपयांना मिळत होता; मात्र आता त्याचा दर ९१६ रुपयांपर्यंत वाढल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यातच जागेवर सिलिंडर घेताना अतिरिक्त ६० रुपये आकारले जात असल्याची तक्रार काही ग्राहकांनी केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

एमआयडीसी कामगारांची गैरसोय

चाकण एमआयडीसी परिसरातील अनेक कामगारांना कामावर जाण्याऐवजी गॅससाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याने त्यांची हजेरी बुडण्याची वेळ येत आहे. “उन्हात तासन्तास उभे राहावे लागते, तरीही सिलिंडर मिळेल की नाही याची खात्री नसते,” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.

घरपोच सेवा बंद असल्याची तक्रार

एजन्सीकडून दिली जाणारी नियमित घरपोच गॅस वितरण सेवा सध्या बंद असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांना स्वतः एजन्सीसमोर येऊन सिलिंडर घ्यावा लागत असून रस्त्यावर मोठी गर्दी होत आहे. यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : चाकणला प्लॅस्टिकबंदीचा फज्जा, बाजारपेठेत कॅरीबॅगचा सुळसुळाट; कठोर कारवाईची मागणी

प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी

सिलिंडर वितरणातील गोंधळ, अतिरिक्त शुल्क आणि घरपोच सेवा बंद असल्याच्या तक्रारींची प्रशासनाने तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. सध्या या परिस्थितीमुळे सामान्य ग्राहकांना वेळ, पैसा आणि श्रम यांचा दुहेरी फटका बसत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

गॅसचा तुटवडा भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे – काँग्रेस

आखाती युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा आहे त्याला भाजपा सरकारचे चुकीचे धोरण व नाकर्तेपणामुळे झाला आहे. आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्याचे भाजपा सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नाही त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला भासत आहे. इंग्रजांनी मीठावर कर आकारला त्यावेळी महात्मा गांधी यांनी आजच्याच दिवशी १९३० साली दांडी मार्च काढून ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडले होते, त्याची प्रेरणा घेऊन जनतेने आज आंदोलन करून सरकारला धारेवर धरले पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

Web Title: Citizens are angry over the increase in cylinder prices at bharat gas agency in chakan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • Gas Cylinder
  • lpg cylinder
  • pune news

संबंधित बातम्या

पुण्यात भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; पाषाण-बावधन रस्त्यावरील धक्कादायक घटना
1

पुण्यात भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; पाषाण-बावधन रस्त्यावरील धक्कादायक घटना

पुण्यात ‘ग्लोबल स्कॉलर्स’चा एकलव्य इंडिया फाऊंडेशनकडून सत्कार; तब्बल 25 विद्यार्थी परदेशात शिक्षण घेणार
2

पुण्यात ‘ग्लोबल स्कॉलर्स’चा एकलव्य इंडिया फाऊंडेशनकडून सत्कार; तब्बल 25 विद्यार्थी परदेशात शिक्षण घेणार

संतोष पंडितवर गुन्हा, मग आमदार गायकवाडांवर का नाही? कोथरूड पोलीस ठाण्यात रोहित पवार आक्रमक
3

संतोष पंडितवर गुन्हा, मग आमदार गायकवाडांवर का नाही? कोथरूड पोलीस ठाण्यात रोहित पवार आक्रमक

Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार
4

Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.