Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : शिवसेना पक्ष नेमका कोणाचा? ‘तारीख पे तारीख’ पुन्हा सुरुच

सर्वोच्च न्यायालयाकडून ते दोन्ही पक्षकारांना नंतर सांगण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 13, 2026 | 09:34 AM
Maharashtra Politics : शिवसेना पक्ष नेमका कोणाचा? 'तारीख पे तारीख' पुन्हा सुरुच

Maharashtra Politics : शिवसेना पक्ष नेमका कोणाचा? 'तारीख पे तारीख' पुन्हा सुरुच

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या निकालाबाबत ‘तारीख पे तारीख’ सुरूच आहे. अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी पार पडली. यावेळी दोन्ही गटांनी आपण अंतिम युक्तिवादास तयार असल्याचे सांगितले. मात्र, न्यायालयाने या याचिकेवर पुढच्या तारखेला सुनावणी होणार असल्याचे म्हटले आहे. ही सुनावणी नेमक्या कोणत्या तारखेला होणार आहे, हे मात्र अद्याप निश्चित नाही.

सर्वोच्च न्यायालयाकडून ते दोन्ही पक्षकारांना नंतर सांगण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. शिवसेना पक्ष आणि या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण कोणाचा, या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. २०२२ मध्ये एकसंध शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ शिंदे यांचा पक्ष हाच खरा शिवसेना पक्ष असल्याच्या आणि त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी पक्षातील ४० आमदारांसह बंडखोरी केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आता त्यावर पुढच्या तारखेला सुनावणी होईल, असे स्पष्ट केले आहे. शिवसेनेच्या अंतिम युक्तिवादासाठी पुढची तारीख ही उपलब्धतेनुसार देण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान

ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात २२ फेब्रुवारी २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल केली. या याचिकेत त्यांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला. ठाकरे गटाने असा युक्तिवाद केला की, निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे आणि पक्षाची मूळ ओळख धनुष्यबाण चिन्हाशी जोडलेली आहे. यामुळे मतदारांमध्ये गोंधळ होऊ शकतो.

आयोगाच्या निर्णयाला स्थगितीस नकार

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. परंतु पूर्ण निकालापर्यंत शिंदे गटाला चिन्हाचा तात्पुरता वापर करण्याची परवानगी दिली. ७ मे २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला.

विधानसभा अध्यक्षांकडून शिवसेनेला मान्यता

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटले की, स्थानिक निवडणुकांमध्ये चिन्हाचा फारसा प्रभाव पडत नाही. दरम्यान, शिवसेना फुटीशी संबंधित आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जानेवारी २०२४ मध्ये शिंदे गटाला झुकते माप देताना ‘खरी शिवसेना’ म्हणून मान्यता दिली.

हेदेखील वाचा : Shivsena Symbol Hearing : ‘धनुष्यबाण आणि शिवसेना’ कुणाची? साडे तीन वर्षांच्या संघर्षाचा शेवट आज होणार का? सुप्रीम कोर्टात सुनावणी

Web Title: Hearing regarding the shiv sena party has been postponed again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 09:34 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • political news
  • Shivsena Politics

संबंधित बातम्या

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल
1

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार
2

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
3

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

‘…पण महाराष्ट्र सरकार शुभ तारखा तपासण्यात व्यस्त’; दुष्काळ जाहीर करण्यावरून उद्धव ठाकरेंचा टोला
4

‘…पण महाराष्ट्र सरकार शुभ तारखा तपासण्यात व्यस्त’; दुष्काळ जाहीर करण्यावरून उद्धव ठाकरेंचा टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.