Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Top Live Stories Today: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि फसव्या लाभार्थ्यांना दूर करण्यासाठी सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 13, 2026 | 06:46 PM
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Follow Us:

Maharashtra to World Breaking News:

PM Kisan Samman Nidhi : गुवाहटीतून जारी केला जाणार किसान सम्मान निधीचा 22 वा हफ्ता

नवी दिल्ली :  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खूप मोठा असणार आहे. कारण आज या योजनेशी संबंधित शेतकऱ्यांना २२ व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. लाखो पात्र शेतकऱ्यांना २२ व्या हप्त्याचा फायदा होईल. तर, जर तुम्हीही या योजनेशी जोडले असाल, तर तुमच्यासाठीही हा एक मोठा दिवस असणार आहे. पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता गुवाहाटी येथून जारी केला जाईल. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाममधील गुवाहाटी येथून २२ वा हप्ता जारी करतील. आतापर्यंत एकूण २१ हप्ते जारी केले गेले आहेत.

 

 

 

The liveblog has ended.
  • 13 Mar 2026 06:45 PM (IST)

    13 Mar 2026 06:45 PM (IST)

    "परकीय थेट गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र..."; उदय सामंत विधानसभेत काय म्हणाले?

    मुंबई: दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेमध्ये झालेल्या करारांमधून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परकीय थेट गुंतवणूक (एफडीआय) येत असून 2026 मध्ये सुमारे 31 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले असल्याची माहिती मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधानसभेत नियम 293 अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावाच्या उत्तरात सांगितले. परकीय थेट गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र सलग तीन वर्षे देशात अव्वल ठरल्याचेही त्यांनी नमूद केले.

  • 13 Mar 2026 06:38 PM (IST)

    13 Mar 2026 06:38 PM (IST)

    Karjat News : युद्धामुळे इंधन पेटलं; LPG सिलेंडरसाठी पोलीस बंदोबस्त, नागरिकांच्या लांबच लांब रांगा

    कर्जत/संतोष पेरणे : इस्त्रायल आणि इराणच्या युद्धाचे पडसाद भारतातील कानाकोपऱ्यात दिसून येत आहे. याचा सर्वात मोठा फटका इंधानाला बसल्याने घरगुती गॅस सिलेंडरचे तीन तेरा झाल्याचं समोर येत आहे. तालुक्यात घरगुती गॅस वितरण केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.घरगुती गॅस घरपोच करण्याची कार्यपद्धती सध्या तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहे. मात्र घरगुती गॅस धारक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कर्जत आणि नेरळ मध्ये बुकिंग केल्यानंतर गॅस उपलब्ध होत असल्याचे दिसून येत आहे.

  • 13 Mar 2026 06:29 PM (IST)

    13 Mar 2026 06:29 PM (IST)

    महागाईचा दणका! गॅसपाठोपाठ आता पेट्रोल-डिझेलची चिंता वाढली; ‘या’ गाड्या देतील सगळ्यात जास्त मायलेज…

    Most Fuel Saving Cars: सध्याच्या जागतिक तणावाची परिस्थिती आहे. इराण- इज्रायल आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरु आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टींचा तुटवडा भासत आहे. इंधनाच्या दराबाबत सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्याच्या बातम्यांनी सामान्य माणसाला आधीच धास्तावले आहे, त्यातच आता पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढण्याची किंवा टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा अनिश्चित काळात, जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर ‘मायलेज’ हाच तुमच्यासाठी सर्वात मोठा आधार ठरू शकतो. त्यामुळे अशा कोणत्या गाड्या आहेत ज्यामुळे तुमच्या खिशाला दिलासा मिळू शकेल. अशा कोणत्या गाड्या आहे ज्या कमी इंधनात जास्त अंतर कापू शकतील जाणू घेऊयात.

  • 13 Mar 2026 06:25 PM (IST)

    13 Mar 2026 06:25 PM (IST)

    पुणे जिल्ह्यात LPG Gas च्या काळाबाजाराबाबत एकही FIR नाही? मग सिलेंडरसाठी रांगा का?

    पुणे: पुणे जिल्ह्यात गॅस सिलेंडरच्या तुटवड्याच्या अफवा आणि संभाव्य काळाबाजाराच्या चर्चांमुळे प्रशासनाने तपास मोहीम सुरू केली असली, तरी प्रत्यक्षात एकही एफआयआर नोंदवली गेलेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गॅस साठा किंवा काळाबाजार सुरू असल्याच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • 13 Mar 2026 06:06 PM (IST)

    13 Mar 2026 06:06 PM (IST)

    Mahrashtra Kesari विजेत्याला मिळणार मानाची गदा अन्...; कधी सुरू होणार कुस्ती स्पर्धा?

    पुणे: महाराष्ट्रातील पारंपारिक आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे (Sports) ६८ वे अधिवेशन यंदा पुणे जिल्हातील वाघोली येथे रंगणार आहे.महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव यांच्या वतीने ही स्पर्धा १८ ते २२ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे.

  • 13 Mar 2026 05:50 PM (IST)

    13 Mar 2026 05:50 PM (IST)

    शिक्षण व्यवस्थेत समानता का नाही? ‘एक राष्ट्र, एक शिक्षण प्रणाली’ ही संकल्पना भारतात लागू करणे कठीण?

    ‘एक राष्ट्र, एक शिक्षण प्रणाली’ हे धोरण सरकार का लागू करू शकत नाही? देशातील प्रत्येक राज्यातील भाषा वेगवेगळ्या आहेत. तेथील संस्कृती आणि तेथे राहणा-या लोकांच्या गरजा आणि कार्यपद्धती सुद्धा वेगवेगळ्या आहेत, अशा परिस्थितीत एक भाषा आणि एक संस्कृती कशी शक्य आहे? तामिळनाडू आणि बंगालसारखे राज्य नवे शिक्षण धोरण-2020 अंतर्गत मातृभाषा आणि 3 भाषा सूत्र यासारख्या सुधारणांना विरोध करतात. सामाजिक विविधतेमुळे केरळ, ओडिशा आणि बिहारमधील गरजा पूर्ण होणे अशक्य आहे. सर्वात मोठी समस्या ही आहे की, राज्य आणि केंद्रीय शिक्षण मंडळांचे अभ्यासक्रम आणि मूल्यांकनप्रणाली सुद्धा वेगवेगळ्या आहेत.

  • 13 Mar 2026 05:40 PM (IST)

    13 Mar 2026 05:40 PM (IST)

    “बॉलिवूडपेक्षा जास्त पैसा..”, राजीव अदातिया १० लाख रुपयांमध्ये विकतोय LPG सिलेंडर, पोस्ट करत म्हणाला, ”गॅस विकण्यात…”

    अमेरिका-इराण युद्धादरम्यान, भारतात सिलिंडरवरून गोंधळ उडाला आहे. व्यावसायिक गॅसच्या कमतरतेमुळे आणि वाढत्या किमतींमुळे, अनेक रेस्टॉरंट्स बंद पडल्या आहेत आणि काही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. लोक गॅस ब्लॅकने खरेदी करण्यास देखील तयार आहेत, परंतु ते कुठेही उपलब्ध नाहीत. दरम्यान, राजीव अदातियाने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये ते १० लाख रुपयांना एक टँक विकत आहेत. त्याने रस्त्याच्या कडेला काढलेला एक फोटो देखील शेअर केला आहे.

  • 13 Mar 2026 05:30 PM (IST)

    13 Mar 2026 05:30 PM (IST)

    पुरंदरला दीड हजार एकरावर होणार पुरंदर आयटी पार्क

    पुण्यातून आयटी कंपन्यांचे परराज्यात होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पुरंदर तालुक्यात आयटी पार्कला जागा देण्याची तयारी आमदार विजय शिवतारे यांनी दर्शवली होती. त्या अनुषंगाने २७ फेब्रुवारी २०२६ रोजी महसूल विभागाकडे प्रस्तावित ५७२ हेक्टर म्हणजेच जवळपास दीड हजार एकर जागा हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत आणि उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिली आहे. आमदार विजय शिवतारे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नावर ते बोलत होते.

  • 13 Mar 2026 05:20 PM (IST)

    13 Mar 2026 05:20 PM (IST)

    Iran Israel युद्धामुळे लग्न थांबली? वधू-वरांची पंचाईत; केटरिंग व्यवसाय ठप्प अन् तारखा…

    इराण-इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्माण झालेल्या परिस्थितीचा परिणाम देशांतर्गत एलपीजी पुरवठ्यावर टंचाई निर्माण होत असून, पुणे शहरात कमर्शियल गॅस सिलिंडरची टंचाई जाणवू लागली आहे. या टंचाईमुळे शहरातील विवाह सोहळ्यांचे नियोजन अडचणीत आले असून अनेक कुटुंबांना लग्नाच्या तारखा पुढे ढकलण्याची वेळ येत असल्याचे समोर आले आहे.

  • 13 Mar 2026 05:15 PM (IST)

    13 Mar 2026 05:15 PM (IST)

    ‘रोल कॅमेरा अन्…’, जळालेले मृतदेह समोर… कॅमेरातही दिसले डोळे लाल… दिग्दर्शकासोबत घडलेला थरारक अनुभव!

    मुंबईतील Mukesh Mills हे ठिकाण अनेक वर्षांपासून भारतातील सर्वात रहस्यमय आणि भितीदायक जागांपैकी एक मानले जाते. आजही अनेक लोक या जागेभोवती विचित्र अनुभव सांगतात. या मिलमध्ये घडलेल्या एका कथित घटनेमुळे या जागेची भुताटकीची ओळख अधिक गडद झाली आहे. १९८२ साली या मिलमध्ये भीषण आग लागली होती. या आगीत अनेक कामगार अडकले आणि त्यातील काही जण जिवंत जळून मृत्यूमुखी पडले, अशी चर्चा आहे. त्या घटनेनंतर मिल पूर्णपणे बंद पडली. आजही त्या ठिकाणी जळालेल्या भिंती, तुटलेल्या खिडक्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती दिसतात. स्थानिक लोकांच्या मते, त्या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या कामगारांच्या आत्मा अजूनही त्या जागी भटकत आहेत.

  • 13 Mar 2026 05:10 PM (IST)

    13 Mar 2026 05:10 PM (IST)

    मराठवाड्याची चिंता वाढली! उन्हाच्या तडाख्याने धरणांतील पाणीपातळी घटली; जायकवाडीत ७२% साठा शिल्लक

    उन्हाने सर्वत्र तडाखा देणे सुरु केले आहे. तसे वाढत्या ऊन्हाचा पाणीसाठ्यांवर परिणाम होत आहे. ऊन जसे जसे वाढायला सुरुवात झाली आहे तशी तशी धरणातील पाणीसाठ्याची पातळी खाली जायला लागली आहे. मराठवाडा विभागाच्या मोठ्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्यातील पाणीसाठा ७२.३४ टक्क्यांपर्यंत खाली गेला आहे. जायकवाडी या मोठ्या धरणामध्ये ७२ टक्के आहे. जायकवाडी, येलदरी, माजलगाव, मांजरा या मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या तरी वरी स्थिती आहे.

  • 13 Mar 2026 05:05 PM (IST)

    13 Mar 2026 05:05 PM (IST)

    ८ तासांच्या शिफ्ट वादात Kunal Khemu यांचं प्रेग्नन्सीवर विधान; सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप

    अभिनेता कुणाल केम्मूने अलीकडेच दीपिका पादुकोणच्या आठ तासांच्या वर्क शिफ्टच्या मागणीबाबत आता अभिनेत्याने आपले मत मांडले आहे. सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये बोलताना कुणाल केम्मू म्हणाला की, महिलांनी आपल्या प्रेग्नन्सीचं “योग्य नियोजन” करायला हवं. तसेच अधिक मानधन मिळवण्यासोबतच कमी तास काम करण्याची अपेक्षा कोणालाही ठेवता येत नाही, असेही अभिनेत्याने म्हटले आहे. त्याच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आणि नेटकऱ्यांनी आता संताप व्यक्त केला आहे.

  • 13 Mar 2026 04:50 PM (IST)

    13 Mar 2026 04:50 PM (IST)

    शिक्षण व्यवस्थेत समानता का नाही?

    ‘एक राष्ट्र, एक शिक्षण प्रणाली’ हे धोरण सरकार का लागू करू शकत नाही? देशातील प्रत्येक राज्यातील भाषा वेगवेगळ्या आहेत. तेथील संस्कृती आणि तेथे राहणा-या लोकांच्या गरजा आणि कार्यपद्धती सुद्धा वेगवेगळ्या आहेत, अशा परिस्थितीत एक भाषा आणि एक संस्कृती कशी शक्य आहे? तामिळनाडू आणि बंगालसारखे राज्य नवे शिक्षण धोरण-2020 अंतर्गत मातृभाषा आणि 3 भाषा सूत्र यासारख्या सुधारणांना विरोध करतात. सामाजिक विविधतेमुळे केरळ, ओडिशा आणि बिहारमधील गरजा पूर्ण होणे अशक्य आहे. सर्वात मोठी समस्या ही आहे की, राज्य आणि केंद्रीय शिक्षण मंडळांचे अभ्यासक्रम आणि मूल्यांकनप्रणाली सुद्धा वेगवेगळ्या आहेत.

  • 13 Mar 2026 04:43 PM (IST)

    13 Mar 2026 04:43 PM (IST)

    Ratnagiri : रत्नागिरीत घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही -जिल्हाधिकारी मनुज जिंदल

    आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्याच्या चर्चेमुळे रत्नागिरीतील गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी रत्नागिरीत घरगुती गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी शांता दुर्गा गॅस एजन्सीला भेट देऊन गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेचा आढावा घेतला यावेळी त्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता ऑनलाइन बुकिंग करण्याचे आवाहन केले.

  • 13 Mar 2026 04:25 PM (IST)

    13 Mar 2026 04:25 PM (IST)

    रत्नागिरीत घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही - जिल्हाधिकारी

    आखाती देशातील युद्धजन्य परिस्तितीच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने रत्नागिरीतील घरगुती ग्राहकांनी गॅस सिलेंडर मिळविण्यासाठी गॅस एजेन्सीच्या बाहेर रांगा लावण्यास सुरवात केली त्यामुळे एजेन्सीच्या बाहेर ग्राहकांची मोठी गर्दी वाढू लागली आहे. मात्र रत्नागिरीत घरगुती गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा नसल्याचे प्रशासन वेळोवेळी सांगत असताना देखील ग्राहक रांगा लावत आहेत. आज रत्नागिरीतील शांतादुर्गा गॅस एजेन्सीला जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी भेट देऊन घरगुती सिलेंडरच्या उपलब्धतेचा आढावा घेतला तसेच तेथे उपस्थित ग्राहकांशी संवादही साधला आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील केले यावेळी बोलताना त्यांनी सांगितले कि तुम्ही ऑनलाईन गॅस सिलेंडर बुकिंग करा २५ दिवसात तुम्हाला सिलेंडर मिळेल काही अडचण असल्यास हेल्पलाईन नंबरवर संपर्क करा तुमची समस्या सोडवून देऊ. रत्नागिरीत घरगुती सिलेंडरचा तुटवडा नसल्याचे त्यांनी परत एकदा सांगितले.

  • 13 Mar 2026 04:20 PM (IST)

    13 Mar 2026 04:20 PM (IST)

    मारहाणीच्या घटनेनंतर सकारात्मक चित्र; नागरिकाने वाहतूक पोलिसांना मिठाई भरवून व्यक्त केला आभार

    मीरा-भाईंदर शहरात नुकताच वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यावर झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र याच पार्श्वभूमीवर शहरात एक सकारात्मक आणि प्रेरणादायी चित्र समोर आले आहे. एका सर्वसामान्य नागरिकाने मदत केल्याबद्दल वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मिठाई भरवून आपले आभार व्यक्त केल्याचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक व्यवस्थापन करत असताना संबंधित वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने एका नागरिकाला अडचणीच्या प्रसंगी मदत केली. पोलिसांनी केलेल्या या मदतीमुळे आनंदित झालेल्या त्या नागरिकाने सार्वजनिक ठिकाणीच पोलिसांना मिठाई भरवून कृतज्ञता व्यक्त केली.

  • 13 Mar 2026 04:15 PM (IST)

    13 Mar 2026 04:15 PM (IST)

    शिलार धरणाला विरोध करण्यासाठी शेतकरी आक्रमक

    कर्जत तालुक्यातील चिल्हार नदीवर किकवी शिलार येथे बांधण्यात येणाऱ्या प्रस्तावित शिलार धरणाला विरोध करण्यासाठी शेतकरी कर्जत येथे धडकणार आहेत.शिलार धरणाला विरोध करण्यासाठी 24 गावे आणि वाड्या मधील शेतकरी एकत्र येणार आहेत.दरम्यान कर्जत येथील प्रशासकीय भवनावर 17 मार्च रोजी पोशीर धरणाला विरोध करण्यासाठी शेतकरी धडकणार आहेत,त्यामुळे कर्जत शहरात अभूतपूर्ण गर्दी होण्याची शक्यता आहे.

  • 13 Mar 2026 04:10 PM (IST)

    13 Mar 2026 04:10 PM (IST)

    म्हसवंडीतील वाड्यावस्त्यांचा हा वनवास संपणार तर कधी?

    अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी हे गाव विकसित गाव म्हणून नावारूपास आले. पण या गावाच्या वाडी वस्त्या मात्र अद्यापही विकासापासून कोसो दूर आहेत. या वाडी वस्तीतील विकासाचे वास्तव समोर आलं आहे.

  • 13 Mar 2026 04:03 PM (IST)

    13 Mar 2026 04:03 PM (IST)

    केडीएमसीतील २७ गावातील संघर्ष समिती आक्रमक

    पालिका  सोयी सुविधा देत नाही, विविध कर वसूल करत आहेत. त्याचशिवाय फक्त घरे नाही तुटत आमच्या गावात या मग काय काय तुटतं ते बघा.सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचा केडीएमसी आयुक्तांना इशारा दिला आहे.

  • 13 Mar 2026 04:00 PM (IST)

    13 Mar 2026 04:00 PM (IST)

    Nanded News : जांभोरी गाव होणार ‘मधाचे गाव’

    मंचर : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील जांभोरी गावाने विकासाची एक नवी दिशा पकडली आहे. जांभोरी गावाला भविष्यात “मधाचे गाव” म्हणून नवी ओळख मिळणार आहे. या प्रकल्पांतर्गत गावातील २० बचत गटांतील आदिवासी महिलांना प्रत्येकी १० याप्रमाणे एकूण २०० मधपेट्यांचे (बी बॉक्स) वाटप आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. (Nanded News) या अभिनव उपक्रमाची बीजे २०२४ मध्ये रोवली गेली. ग्रामीण महिलांना शाश्वत रोजगार देण्याचा विचार पुढे आला. त्यानंतर खादी ग्रामोद्योगच्या सहकार्याने या प्रकल्पाचे नियोजन झाले. सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ मध्ये या प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आणि १२ मार्च २०२६ रोजी या महत्त्वपूर्ण टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले.

    वाचा सविस्तर 
  • 13 Mar 2026 03:40 PM (IST)

    13 Mar 2026 03:40 PM (IST)

    टेस्ट ड्राईव्ह पडली महागात! 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली Tata Sierra

    Tata Sierra Test Drive Accident: कार खरेदी करण्यापूर्वी प्रत्येकजण टेस्ट ड्राइव्ह घेतं. यामुळे लोकांना कारचा अनुभव घेता येतो. यामुळे त्यांना कारचे फिचर्स कळतात, ड्रायव्हिंग आणि मायलेंज सारख्या गोष्टींबाबत चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होते. पण जर टेस्ट ड्राइव्हचे रूपांतर भयानक अपघातात झालं तर काय होईल? हो, महाराष्ट्रातील ठाण्यात अशीच एक दुर्घटना समोर आली आहे, जिथे टेस्ट ड्राइव्ह दरम्यान टाटा सिएरा (Tata Sierra क्रॅश) २० फूट खोल खड्ड्यात पडली. कारमधील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली नसली तरी, कारचं मोठं नुकसान झाले आहे. या अपघातामुळे आता हा प्रश्न उपस्थित होत आहे की या कारच्या दुरुस्तीचा खर्च कोण देणार?

    वाचा सविस्तर 

  • 13 Mar 2026 03:30 PM (IST)

    13 Mar 2026 03:30 PM (IST)

    स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यातील खास क्षण

    यंदाचा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा अनेक अर्थांनी खास आणि संस्मरणीय ठरला. वर्षभर प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या कलाकारांचा गौरव करणारा हा सोहळा केवळ पुरस्कारांचं व्यासपीठ नसून एकमेकांच्या यशाचा आनंद साजरा करणाऱ्या कुटुंबाचा सोहळा म्हणूनही ओळखला जातो. यंदाच्या सोहळ्यातील एक खास क्षण मात्र सर्वांच्या मनात कायमचा कोरला गेला. कलाकारांच्या यशाचा गौरव करणाऱ्या या मंचावर यंदा त्यांच्या यशामागे उभ्या असलेल्या शिक्षकांनाही मानाचा मुजरा करण्यात आला. कलाकारांना घडवणाऱ्या आणि त्यांच्या आयुष्यात मार्गदर्शक ठरलेल्या गुरुजनांचा विशेष सन्मान या मंचावर करण्यात आला.

    वाचा सविस्तर

  • 13 Mar 2026 03:20 PM (IST)

    13 Mar 2026 03:20 PM (IST)

    चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा!

    छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा येथील विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या संपादन प्रक्रियेला महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. भूसंपादनाची कलम १९ अंतर्गत अंतिम अधिसूचना नुकतीच राजपत्रात प्रसिद्ध झाली असून सुमारे ७५० शेतकऱ्यांच्या जवळपास ५४ हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे. प्रभावित जमीनधारकांना कलम २१ (१) अंतर्गत वैयक्तिक नोटिसा देखील देण्यात आल्या आहेत. आता अंतिम मोबदला जाहीर करण्यासाठी आवश्यक निधीची प्रतीक्षा असून निधी मिळताच अवॉर्ड जाहीर करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण होणार असल्याचे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.

    वाचा सविस्तर 

  • 13 Mar 2026 03:00 PM (IST)

    13 Mar 2026 03:00 PM (IST)

    “मुंबईत गुदमरतेय…” दीपिका पदुकोणने मुंबईच्या खराब हवेबद्दल व्यक्त केली चिंता

    बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण नेहमीच आपल्या व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तिच्या चित्रपटांबाबत आणि कामासंदर्भात सतत नवी माहिती समोर येत असते. मात्र यावेळी ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. कोणत्याही चित्रपटामुळे नव्हे, तर एका सोशल मीडिया पोस्टमुळे तिची चर्चा रंगली आहे. दीपिकाने मुंबईतील खराब हवा गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त केली असून, यावर तातडीने कारवाई करण्यासाठी तिने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कडेही आवाहन केले आहे.

    वाचा सविस्तर 
  • 13 Mar 2026 02:55 PM (IST)

    13 Mar 2026 02:55 PM (IST)

    ‘खामेनेई परत आले?’ इराणच्या ‘त्या’ AI व्हिडिओने अमेरिकेचे धाबे दणाणले

    मध्य-पूर्वेतील इराण-इस्त्रायल- अमेरिकेत सुरु असलेल्या युद्ध दिवसेंदिवस अधिकच भयानक वळणावर चालले आहे. गेल्या महिन्यात अमेरिकेने क्षेपणास्त्र हल्ला करत इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनेई यांच्या ठिकाणांवर हल्ला करत त्यांची हत्या केली. (US-Israel Iran War) आज युद्धाचा १४ दिवस आहे. युद्धाच्या पहिल्याच दिवशी अमेरिकेने खामेनेई यांची हत्या केल्यानंतर आज इराणकडून सोशल मीडियावर एक एआय व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.

  • 13 Mar 2026 02:50 PM (IST)

    13 Mar 2026 02:50 PM (IST)

    चैत्र नवरात्रीमध्ये देवीला कोणत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा

    दरवर्षी, नवरात्रीचे नऊ दिवस चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला सुरुवात होते. हे नऊ दिवस खूप खास आहेत. यावर्षी चैत्र नवरात्रीची सुरुवात गुरुवार, 19 मार्च रोजी सुरू होणार आहे आणि 27 मार्च रोजी राम नवमीच्या दिवशी संपणार आहे. नवरात्र ही देवी दुर्गेला समर्पित आहे. नवरात्रीमध्ये भक्त देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा करतात आणि उपवास करतात, तिचा आशीर्वाद घेतात.

  • 13 Mar 2026 02:45 PM (IST)

    13 Mar 2026 02:45 PM (IST)

    फीचर्स असे की पाहून सर्वच होतील चकीत…

    चिनी ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपनी iQOO ने त्यांच्या 7 व्या वर्धापनदिनानिमित्त भारतात आणखी एक नवीन 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने iQOO Z11x 5G या नावाने लाँच केला आहे. नुकताच लाँच करण्यात आलेला हा स्मार्टफोन Z11 लाइनअपचे लेटेस्ट एडिशन असल्याचे सांगितलं जात आहे. ग्राहक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनद्वारे आयक्यूने लाँच केलेला नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

  • 13 Mar 2026 02:40 PM (IST)

    13 Mar 2026 02:40 PM (IST)

    ‘गुहागर’मधील दोन दिवसांतच बंद होणार?

    गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी श्रृंगारतळी बाजारपेठेतील सर्व हॉटेल दोन दिवसांतच बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कमर्शियल सिलिंडरचा तुटवडा व ते देणे बंद केल्याने जेमतेम १ दिवस पुरेल एवढेच सिलिंडर गॅस उपलब्ध असल्याने ही आपत्ती व्यवसायिकांवर ओढवली आहे. बहुसंख्य हॉटेल व्यवसायिकांनी (Ratnagiri) हॉटेलमध्ये सूचना फलक लावून तळलेले पदार्थ बंद केल्याचे सूचित केले आहे. त्यामुळे श्रृंगारतळी बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना नाष्टा, जेवण मिळणे जिकरीचे होणार असून हॉटेल व्यवसायिकांच्या धंद्यावर याचा मोठा आर्थिक परिणाम होणार आहे.

  • 13 Mar 2026 02:35 PM (IST)

    13 Mar 2026 02:35 PM (IST)

    मध्य रेल्वेच्या विकासकामाला गती

    मध्य रेल्वे वरील मेन लाइन मार्गावर असलेल्या शेलू रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण सुरू झाले आहे.आगामी काळात कर्जत पर्यंत 15 डब्यांच्या लोकल गाड्या सुरू होणार असल्याने स्थानकाचे विस्तारीकरण केले जात आहे.मात्र या भागातून लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली असून महिला लोकल सुरू करण्याची मागणी महिला प्रवाशांकडून होत आहे.

  • 13 Mar 2026 02:30 PM (IST)

    13 Mar 2026 02:30 PM (IST)

    ‘आपली यारी… गावावर भारी!’ हटके टॅगलाईनसह ‘बाप्या’ चित्रपटाच्या पोस्टने वेधले लक्ष

    आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवलेला आणि वेगळ्या संकल्पनेमुळे चर्चेत असलेला मराठी चित्रपट ‘बाप्या’ आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. “आपली यारी… गावावर भारी!” अशी हटके टॅगलाईन असलेला हा चित्रपट येत्या १५ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. वर्किंग आय फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे नुकतेच प्रदर्शित झालेले पोस्टर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

  • 13 Mar 2026 02:20 PM (IST)

    13 Mar 2026 02:20 PM (IST)

    इराणचा दावा खरा की खोटा?

    मध्यपूर्वेतील रणसंग्राम (US-Israel Iran War) आता जमिनीवरून थेट अथांग समुद्रात पोहोचला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात आता एका अशा घटनेची चर्चा होत आहे, जिने जागतिक महासत्तांच्या गोटात खळबळ माजवली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने असा खळबळजनक दावा केला आहे की, त्यांनी अमेरिकेचे सर्वात शक्तिशाली विमानवाहू जहाज ‘USS अब्राहम लिंकन’ (USS Abraham Lincoln) याला क्षेपणास्त्र हल्ल्यात निकामी केले आहे. इराणच्या या दाव्यामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असली, तरी अमेरिकेने हा दावा साफ फेटाळून लावला आहे.

  • 13 Mar 2026 02:15 PM (IST)

    13 Mar 2026 02:15 PM (IST)

    विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याबाबत क्रिकेट बोर्डाने केली अपील

    भारताचे दोन दिग्गज खेळाडू, रोहित शर्मा आणि विराट कोहली, आता फक्त एकाच फॉरमॅटमध्ये खेळताना दिसतात. रोहित आणि विराट दोघेही एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळतात आणि त्यामुळे चाहत्यांना त्यांना क्वचितच खेळताना पाहायला मिळते. तथापि, चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत नजीकच्या भविष्यात अनेक देशांचा दौरा करणार आहे आणि अनेक बोर्डांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) एकदिवसीय सामन्यांची संख्या वाढवण्याची विनंती केली आहे.

  • 13 Mar 2026 02:10 PM (IST)

    13 Mar 2026 02:10 PM (IST)

    अमेरिकेने इराणचा न्यूक्लियर प्रोग्रॅम मुळापासून उपटला?

    US Iran Israel War 2026 : मध्यपूर्वेतील युद्ध (US-Israel Iran War) आता एका अशा टप्प्यावर पोहोचले आहे जिथून इराणचे भवितव्य बदलू शकते. १० ते १२ मार्च २०२६ दरम्यान इस्रायली हवाई दलाने इराणच्या ‘पारचिन मिलिटरी कॉम्प्लेक्स’ मधील ‘तालेघान-२’ (Iran Taleghan-2) या अत्यंत संवेदनशील जागेवर भीषण हल्ले चढवले आहेत. हा तोच परिसर आहे जिथे इराण आपले अण्वस्त्र बनवण्याचे गुपित संशोधन करत असल्याचा पाश्चात्य गुप्तचर यंत्रणांचा दावा आहे. या हल्ल्याने केवळ इमारतीच पाडल्या नाहीत, तर इराणच्या अणुशक्तीच्या कण्यावरच प्रहार केला आहे.

  • 13 Mar 2026 02:01 PM (IST)

    13 Mar 2026 02:01 PM (IST)

    छवी आणि ‘बाई-आजी’च्या अतूट नात्याची कथा

    रक्ताच्या नात्यांइतकीच मनाने जुळलेली नातीही आयुष्यात अत्यंत महत्त्वाची ठरतात. अशाच भावनिक आणि जिद्दीच्या धाग्यावर आधारित नवी मराठी मालिका ‘मी जिंकून घेईन सारं’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा नुकताच प्रदर्शित झालेला प्रभावी प्रोमो प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करत असून, नात्यांची ताकद, कुटुंबातील संघर्ष आणि एका ठाम मुलीची लढाऊ वृत्ती याची झलक त्यात पाहायला मिळते आहे.

  • 13 Mar 2026 01:55 PM (IST)

    13 Mar 2026 01:55 PM (IST)

    महाकुंभची व्हायरल गर्ल मोनालिसाने मुस्लिम प्रियकराशी लग्नामागचं कारण केलं स्पष्ट

    मोनालिसाने लव्ह जिहाद वादावरही भाष्य केले. मोनालिसाने म्हटले की, “हा लव्ह जिहाद नाही. मी सर्व धर्मांचा आदर करते आणि सर्वांना समान मानते. माझे पालक माझे लग्न माझ्या मावशीच्या मुलाशी करायचे होते, पण मला ते करायचे नव्हते कारण तो माझ्या भावासारखा आहे. फरमानलाही माझ्याशी लग्न करायचे नव्हते, पण मी त्याला राजी केले.”

  • 13 Mar 2026 01:45 PM (IST)

    13 Mar 2026 01:45 PM (IST)

    जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष

    रायगड जिल्हा परिषद तसेच जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांसाठी येत्या ७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी पूर्ण केली आहे. रायगड जिल्ह्यात एकूण २ हजार ३२३ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून १७ लाख ३८१ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी १७३ उमेदवार रिंगणात असून १५ पंचायत समित्यांमधील जागांसाठी ३२९ उमेदवार आपलं नशीब अजमावणार आहेत. जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकावा यासाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. स्थानिक राजकीय समीकरणांनुसार काही ठिकाणी युती-आघाड्‌याही स्थापन करण्यात आल्या आहेत.

  • 13 Mar 2026 01:25 PM (IST)

    13 Mar 2026 01:25 PM (IST)

    इराणच्या क्षेपणास्त्रांनी नाटो तळाला केलं टार्गेट, VIDEO VIRAL

    मध्यपूर्वेतील युद्धाची (US-Israel Iran War) आग आता नाटो (NATO) सदस्य असलेल्या तुर्कीपर्यंत पोहोचली आहे. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्ष आता केवळ सीमेपुरता मर्यादित राहिला नसून, इराणने थेट नाटोच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. दक्षिण तुर्कीमधील अत्यंत महत्त्वाच्या ‘इन्सिर्लिक’ (Incirlik) हवाई तळावर शुक्रवारी पहाटे ३:२५ च्या सुमारास धोक्याचे सायरन वाजले. नाटोच्या हवाई संरक्षण यंत्रणेने इराणकडून आलेली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे तुर्कीच्या हवाई हद्दीतच नष्ट केली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

  • 13 Mar 2026 01:15 PM (IST)

    13 Mar 2026 01:15 PM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यात सौर क्रांती! २,७७१ सौर पंपांना मंजुरी

    राज्यात शेतकऱ्यांना दिवसा खात्रीशीर वीज मिळावी, सिंचन खर्चात बचत व्हावी आणि पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढावा, या उद्देशाने राबवण्यात येत असलेल्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेला कोल्हापूर जिल्ह्यात वर्षभरात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेअंतर्गत एकूण ३,१४४ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी २,७७१ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. मंजूर अजर्जापैकी १,१०७ सौर कृषी पंप प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात बसवण्यात आले असून ते सध्या कार्यान्वित आहेत.

    ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही योजना मोठा आधार ठरत असून, वीज भारनियमन आणि डिझेलवरील खर्चापासून मुक्ती मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल सौर कृषी पंपांकडे वाढताना दिसत आहे. एकूण आलेल्या अर्जांपैकी सुमारे ८८ टक्क्यांहून अधिक अर्जाना मंजुरी मिळाल्याने जिल्ह्यातील योजनेची अंमलबजावणी समाधानकारक असल्याचे चित्र आहे.

  • 13 Mar 2026 01:05 PM (IST)

    13 Mar 2026 01:05 PM (IST)

    एकाच घरातून 31 सिलेंडर जप्त

    इराण-इस्रायल युद्धाचा फटका भारताला बसला आहे. यामुळे निर्माण झालेल्या एलपीजीच्या (LPG Gas) टंचाईचा सामना संपूर्ण देश करत आहे. एलपीजी गॅससाठी ग्राहकांच्या लांब रांगा लागल्या असून व्यवसायिक गॅस मिळणे तर बंद झाले आहे. दरम्यान, या परिस्थितीमध्ये काळाबाजार देखील डोके वर काढत आहे. एकाच घरामध्ये 31 सिलेंडरची साठवणूक केल्याचे समोर आले आहे.

  • 13 Mar 2026 12:59 PM (IST)

    13 Mar 2026 12:59 PM (IST)

    PM मोदींनी इराणचे राष्ट्राध्यक्षांशी फोनवरून संवाद साधला

    अमेरिका-इस्राइल आणि इराणमधील युद्धामुळे जगभरात चिंतेचं वातावरण आहे. याच तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. या चर्चे दरम्यान पश्चिम आशियातील वाढत्या तणावाबद्दल आणि नागरिकांचे होत असलेले मृत्यू आणि नागरी पायाभूत सुविधांचे होत असलेल्या नुकसान या बाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. तर भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि सुरक्षितता तसेच वस्तू आणि ऊर्जा पुरवठ्याची अखंड वाहतूक कायम ठेवणे ही भारताची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं मोदींनी सांगितलं.

  • 13 Mar 2026 12:53 PM (IST)

    13 Mar 2026 12:53 PM (IST)

    मंत्री अतुल सावे यांच्या आदेशानेच रमाई आवास घोटाळा - इम्तियाज जलील

    छत्रपती संभाजीनगर महापालिकेत रमाई आवास योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत यापूर्वी पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून देणाऱ्या इम्तियाज जलील यांनी दावा केल्याप्रमाणे नवा धमाका केला. पत्रकार परिषद घेत इम्तियाज जलील यांनी आता या घोटाळ्यात थेट भाजपचे मंत्री अतुल सावे यांचे नाव घेतले आहे. सावे यांच्या आदेशानेच रमाई आवास घोटाळा झाल्याचा नवा खळबळजनक दावा इम्तियाज जलील यांनी केला आहे.

  • 13 Mar 2026 12:46 PM (IST)

    13 Mar 2026 12:46 PM (IST)

    पंचायत समिती कार्यालयात विस्तार अधिकाऱ्याने लाच घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल

    जालन्यातील जाफराबाद पंचायत समिती कार्यालयातच देयक मंजुरीसाठी पैशांची देवाणघेवाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद पंचायत समिती कार्यालयात विस्तार अधिकारी बी. ए. चव्हाण यांनी देयक मंजूर करण्यासाठी पैसे घेतल्याचा हा व्हिडिओ आहे. विशेष म्हणजे ही रक्कम पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकाऱ्यासमोर विस्ताराधिकाऱ्यांनी घेतल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे ही घटना उघडकीस येताच प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

  • 13 Mar 2026 12:34 PM (IST)

    13 Mar 2026 12:34 PM (IST)

    मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आज सिंहस्थ कुंभमेळा शिखर समितीची बैठक

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सिंहस्थ कुंभमेळा शिखर समितीची बैठक पार पडणार आहे. विधीमंडळात मुख्यमंत्री सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. या बैठकीसाठी कुंभमंत्री गिरीश महाजनांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

  • 13 Mar 2026 12:22 PM (IST)

    13 Mar 2026 12:22 PM (IST)

    त्र्यंबकेश्वर मंदिरातील मारहाण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार

    त्र्यंबकेश्वर मंदिरात एका भाविकाला मारहाण केल्याची घटना समोर आली होती. आता या प्रकरणाची चौकशी होणार असून याबाबतचे आदेश जिल्हा न्यायाधीशांनी दिले आहेत.

  • 13 Mar 2026 11:50 AM (IST)

    13 Mar 2026 11:50 AM (IST)

    युद्धाचा सातारकरांना बसला फटका; एजन्सीबाहेर ग्राहकांच्या गॅससाठी भल्यामोठ्या रांगा

    मध्य पूर्व आखाती देशात सुरु असलेल्या युध्दाची (Iran-Israel War) झळ भारातातील मोठ्या शहरांपासून ते अगदी ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेलाही आता बसू लागल्याचे चित्र सर्वत्र दिसू लागले आहे, युध्दाचे सर्वाधिक परिणाम हा गँसच्या उपलब्धीवर झाला आहे. घरगुती वापरासाठी मिळणारा एल.पी. जी. गॅस (LPG Gas) पुरवठा करणाऱ्या गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

  • 13 Mar 2026 11:40 AM (IST)

    13 Mar 2026 11:40 AM (IST)

    WhatsApp चा मोठा निर्णय! 13 वर्षांहून कमी वयाच्या यूजर्ससाठी आणलं नवं सुपरविजन फीचर

    मेटाच्या मालकीच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपने बुधवारी एक नवीन फीचरची घोषणा केली आहे. हे फीचर 13 वर्षांखालील यूजर्ससाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे. कंपनीने जारी केलेलं नवीन सुपरविजन फीचर पालकांना कम्युनिकेशन सेटिंग्सवर लक्ष ठेवण्याची आणि अ‍ॅपमधील फीचर मर्यादित करण्याची पवरनागी देते. यामुळे प्री-टीन यूजर्स मेसेजिंग आणि कॉलिंगवर जास्त फोकस करू शकतील. मेटाच्या मालकीच्या व्हॉट्सअ‍ॅपचे असे म्हणणे आहे की, येणाऱ्या काही महिन्यांमध्ये पॅरेंट-मॅनेज्ड अकाऊंट सुरु करण्याची तयारी आहे. असा दावा केला जात आहे की, हे फीचर कुटूंब आणि सेफ्टी एक्सपर्ट्सने दिलेल्या फिडबॅकच्या आधारावर तयार करण्याच आले आहे. 13 वर्षांखालील मुलांसाठी जे व्हॉट्सअ‍ॅपची मेसेजिंग सेवा वापरण्यास सुरुवात करत आहेत त्यांच्यासाठी अधिक नियंत्रित वातावरण निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे.

  • 13 Mar 2026 11:30 AM (IST)

    13 Mar 2026 11:30 AM (IST)

    ‘Indian Idol’ फेम गायिका सायली कांबळेने जाहीर केले बाळाचे नाव;जाणून घ्या

    ‘इंडियन आयडल’ या लोकप्रिय रिॲलिटी शोमुळे अनेक प्रतिभावान गायक-गायिका प्रकाशझोतात आले. या मंचामुळे नवोदित कलाकारांना आपली कला संपूर्ण देशासमोर सादर करण्याची मोठी संधी मिळाली. अशाच गायकांपैकी एक म्हणजे आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी सायली कांबळे देखील प्रसिद्धीच्या झोतात आली.

  • 13 Mar 2026 11:20 AM (IST)

    13 Mar 2026 11:20 AM (IST)

    ईदच्या तोंडावर पाकिस्तानचा ‘नीच’पणा! अफगाण भूमीवर बॉम्बफेक आणि हवाई हल्ले

    संपूर्ण जगाचे लक्ष इराण आणि अमेरिकेच्या युद्धावर खिळलेले असताना, दुसरीकडे शेजारील देश पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये भीषण (Afghanistan-Pakistan Conflict) युद्धाला सुरुवात झाली आहे. पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवसांत आणि ईदच्या तोंडावर पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करत थेट हवाई हल्ले (Airstrikes) केले आहेत. या हल्ल्यांमुळे अफगाणिस्तानातील कंधार, काबूल आणि पक्तिका यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून दोन्ही देशांमधील संबंध आता टोकाच्या वळणावर पोहोचले आहेत.

  • 13 Mar 2026 11:10 AM (IST)

    13 Mar 2026 11:10 AM (IST)

    ‘मराठा साम्राज्याचे चाणक्य’ मुत्सद्दी नानासाहेब फडणवीस पुण्यतिथी

    मराठा साम्राज्यातील अत्यंत कुशल राजकारणी आणि मुत्सद्दी म्हणून ओळखले जाणारे नानासाहेब फडणवीस यांची आज पुण्यतिथी. अठराव्या शतकात पेशवाईच्या काळात त्यांनी प्रशासन, कूटनीती आणि राज्यकारभार अत्यंत दक्षतेने सांभाळला. त्यांचे पूर्ण नाव बालाजी जनार्दन भानू असे होते, परंतु इतिहासात ते ‘नानासाहेब फडणवीस’ या नावाने प्रसिद्ध झाले. पहिले माधवराव यांच्या काळात त्यांनी राज्यकारभारात महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे पेशवाईतील राजकीय अस्थिरतेच्या काळातही त्यांनी मराठा साम्राज्य टिकवून ठेवण्यासाठी परकीय सत्तांविरुद्ध कुशल कूटनीती वापरली. त्यांच्या बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीमुळे त्यांना त्या काळातील ‘मराठा साम्राज्याचे चाणक्य’ असेही म्हटले जाते

  • 13 Mar 2026 11:00 AM (IST)

    13 Mar 2026 11:00 AM (IST)

    इराणचे शास्त्रज्ञ संपवले, आता Mojtaba Khameneiची पाळी?

    मध्यपूर्वेतील युद्धाला (US-Israel Iran War) आता भयानक वळण मिळाले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या भीषण संघर्षानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) पहिल्यांदाच जगासमोर आले आणि त्यांनी इराणच्या नाड्या आवळल्याचा खळबळजनक दावा केला. एका सविस्तर पत्रकार परिषदेत बोलताना नेतान्याहू यांनी स्पष्ट केले की, इराण आता “पूर्वीसारखा राहिलेला नाही”. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त कारवाईने इराणची कणा असलेली ‘आयआरजीसी’ (IRGC) आणि बासीज दलाचे कंबरडे मोडले आहे.

Web Title: Maharashtra breaking news 13th march live updates maharashtra national international politics crime sports war world war3 us israel iran war updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 08:54 AM

Topics:  

  • international news
  • maharashtra breaking news
  • Maharashtra Politics
  • national news
  • World War 3

संबंधित बातम्या

Sanjay Dina Patil: पत्रकारांना धमकावणारे खासदार संजय दिना पाटील यांचा माफीनामा! अखेर व्हिडिओ जारी करत स्पष्ट केली बाजू; म्हणाले…
1

Sanjay Dina Patil: पत्रकारांना धमकावणारे खासदार संजय दिना पाटील यांचा माफीनामा! अखेर व्हिडिओ जारी करत स्पष्ट केली बाजू; म्हणाले…

Sanjay Raut News: ‘मी याआधी ५ लोकांना ठार केलंय’;  संजय राऊतांचा आरोप कुणावर, थेट पोलीस आयुक्तांना लिहीले पत्र
2

Sanjay Raut News: ‘मी याआधी ५ लोकांना ठार केलंय’; संजय राऊतांचा आरोप कुणावर, थेट पोलीस आयुक्तांना लिहीले पत्र

Maharashtra Politics : राज्यसभेनंतर आता विधान परिषदेतही वाढले भाजपचे संख्याबळ; विधिमंडळात नाही आता मित्रपक्षांची गरज?
3

Maharashtra Politics : राज्यसभेनंतर आता विधान परिषदेतही वाढले भाजपचे संख्याबळ; विधिमंडळात नाही आता मित्रपक्षांची गरज?

MVA Meeting: ठाकरांचे ६ खासदार फुटल्याने खळबळ! महाविकास आघाडी कमालीची सावध; घेतली तातडीची मोठी बैठक
4

MVA Meeting: ठाकरांचे ६ खासदार फुटल्याने खळबळ! महाविकास आघाडी कमालीची सावध; घेतली तातडीची मोठी बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.