Raigad News: विजय निश्चित असला तरी गाफील राहू नका; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकत्यांना आवाहन
PCMC Election 2026: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक : प्रभाग २५ मधून भाजपकडून श्रुती वाकडकर रिंगणात
पनवेलमधील जनतेने भाजपवर नेहमीच विश्वास टाकला आहे. हा विश्वास कायम राखण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता शेवटच्या घटकापर्यंत प्रामाणिकपणे काम करत आहे. संघटनात्मक ताकद, विकासकामांचा लेखाजोखा आणि जनतेशी थेट संवाद याच्या जोरावर पनवेलमध्ये भाजप महायुती मोठा विजय मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (फोटो सौजन्य – X)
देशाच्या विकासासाठी पंतप्रधान मोदी तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गतीने काम करत आहेत. त्यामुळे गतीमान सरकारला जनतेचा पाठिंबा आहे. मतरदारांचा कौल भाजप महायुतीला आहे. दोघेही सोळा सोळा तास काम करत आहेत. बुथची सर्वात मोठी ताकद असलेला आपला पक्ष आहे. २० प्रभागात होणारी हि निवडणूक आहे, त्यामुळे बूथ रचनेतून काम करा, प्रत्येक मतदार नागरिकापर्यंत पोहचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि भाजप महायुतीने केलेल्या कार्याची माहिती संवादातून द्या, असा मौलिक सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना
भाजपच्या कार्यकर्त्यांला यशाच्या दिशेने नेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली, मागील निवडणूक त्यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी खा. रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लढून ७८ पैकी ५१ जागा जिंकून वर्चस्व सिद्ध केले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निवडणूक कशी लढायची याची शिकवण दिली. राज्याच्या विकासाचा दृष्टिकोनातून काम असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शहरात ग्रामीण भागात विकासाचा झपाटा निर्माण झाला आहे. पनवेल महापालिका निर्माणासाठी शेकापने विरोध केला पण आपण सर्वांनी निर्धार केला आणि महापालिका होऊन महापालिकेच्या प्रत्येक भागात विकास सुरु झाल्याचे यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.






