Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रत्येक कामात तरुणांचा सहभाग महत्वाचा; पुण्यात स्वच्छता मोहिमेला सतेज पाटील, यशोमती ठाकूर यांची उपस्थिती

नदी व पर्यावरण संवर्धनासाठी तरुणांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे मत माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 11, 2026 | 05:16 PM
प्रत्येक कामात तरुणांचा सहभाग महत्वाचा; पुण्यात स्वच्छता मोहिमेला सतेज पाटील, यशोमती ठाकूर यांची उपस्थिती

प्रत्येक कामात तरुणांचा सहभाग महत्वाचा; पुण्यात स्वच्छता मोहिमेला सतेज पाटील, यशोमती ठाकूर यांची उपस्थिती

Follow Us
Follow Us:

सुनयना सोनवणे/ पुणे : पुणे शहराची जीवनवाहिनी असलेली मुळा-मुठा नदी प्रदूषणामुळे मरणासन्न अवस्थेत पोहोचली असून, भावी पिढीला स्वच्छ पाणी, शुद्ध हवा आणि प्रदूषणमुक्त शहर द्यायचे असेल, तर नदी व पर्यावरण संवर्धनासाठी तरुणांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे मत माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले.

 

शहरातील नदी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी आयोजित मोहिमेअंतर्गत भिडे पुलाजवळ मुठा नदी पात्रात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी तसेच पुणेकर नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

यावेळी माजी मंत्री यशोमती ठाकूर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, माजी महापौर प्रशांत जगताप, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव श्रीनिवास बी.व्ही., नगरसेविका अल्पना वरपे, प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष कुणाल राऊत तसेच मोहिमेचे संयोजक ऋत्विक धनवट उपस्थित होते.

सतेज पाटील म्हणाले, ‘मुळा-मुठा नदी प्रवाहित आणि स्वच्छ ठेवण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. पर्यावरण संवर्धनासाठी युवकांनी पुढे येणे ही काळाची गरज आहे.’

यशोमती ठाकूर म्हणाल्या, ‘नद्यांची स्वच्छता टिकवण्यासाठी केवळ सरकारी योजना पुरेशा नाहीत. लोकसहभाग आणि विशेषतः तरुणांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. पर्यावरण संवर्धनासाठी चर्चेपेक्षा प्रत्यक्ष कृती महत्त्वाची आहे.’

या मोहिमेत विविध सामाजिक संस्था, वैद्यकीय संस्था तसेच शैक्षणिक संस्थांनी सहभाग घेतला. आकुर्डी येथील अभियांत्रिकी महाविद्यालये तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

‘नदीला शब्दांची नाही, कृतीची गरज आहे’ आणि ‘नदी पुन्हा हसावी, यासाठी कारणीभूत बना’ अशा संदेशांद्वारे नदी संवर्धनाचा जागर करण्यात आला. या वेळी नदीकाठ परिसराची स्वच्छता करण्यात आली. सहभागी नागरिकांनी प्लास्टिक आणि इतर कचरा गोळा करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. उपक्रमात सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्र आणि पांढरे टी-शर्ट देण्यात आले.

उपक्रमाचे प्रमुख ऋत्विक धनवट म्हणाले, ‘पुण्याच्या शाश्वत विकासासाठी नदी स्वच्छता, प्लास्टिकमुक्त परिसर आणि प्रदूषण नियंत्रण असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. मुठा नदीचे संवर्धन ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग प्रेरणादायी आहे.’

हे सुद्धा वाचा : सगळा त्याग जनतेने करायचा अन् मोदींनी फक्त…; पंतप्रधानांच्या आवाहनानंतर हर्षवर्धन सपकाळांची टीका

Web Title: Congress leaders satej patil and yashomati thakur were present at the cleanliness drive in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 05:16 PM

Topics:  

  • adv yashomati thakuar
  • MLA Satej Patil
  • pune news

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.